शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा मानला जातो. कारण शेतीवर उपजीविका करणाऱ्या वा बहुसंख्य लोकांचा उदरनिर्वाह शेती व शेतीपूरक व्यवसायावर चालतो. त्यामुळे शेतीला व शेतीतील उत्पादनाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सध्याच्या आधुनिक युगात शेतीचे उत्पन्न दुप्पट करणे हे शेतकऱ्यांसमोर आव्हान निर्माण झालेले आहे. अशाच परिस्थितीत पीक उत्पादन वाढीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान माहीत असणे उत्पादन वाढीच्या दृष्टीने आवश्यक आहे. जेणेकरून या तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकरी त्यांच्या शेतात पीक उत्पादन वाढ होण्‍यास मदत मिळेल.       
सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात मानव जातीला अन्नधान्य पुरवठा करणे दिवसेंदिवस कठीण होत चाललेले आहे. तसेच शेतीचे उत्पादन वारंवार कमी होताना दिसून येत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी ठोस पाऊले उचलत आहे मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना काही प्रमाणात होत आहे. यामुळे शेतकरी बांधव हवालदिल झालेला आहे.   
शेतकरी आपल्या स्वत:च्या शेतात पीक उत्पादन घेतो, मात्र त्या पिकाला भाव ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांकडे नाही. या दुष्टचक्रात  शेतकरी सापडलेला आहे, काही शेतकऱ्यांनी सावकारी कर्जाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे त्यांचे जीवन संपुष्टात येऊन त्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आलेली आहे. यासाठी फक्त दोन आवश्यक आहेत एक म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीमालास हमीभाव देणे आणि दुसरे म्हणजे शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा करणे या दोन गोष्टी जर शेतकऱ्यांना ‍दिल्यातर बऱ्याच प्रमाणात अनर्थ टाळता येऊ शकतो आणि शेतकऱ्यांना काही प्रमाणात आशादायी दिलासा मिळेल. याच पार्श्वभूमीवर शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान हा लेख तमाम शेतकरी बांधवांसाठी तयार करण्याचे कारण घडले आहे.
शेतीचे आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख
  • सर्वच पिकांचे सखोल व सुलभ भाषेत अत्‍याधुनिक तंत्रज्ञान
  • कमीत कमी श्रमात जास्‍तीत जास्‍त उत्‍पादन
  • कमी कालावधीत येणारे पिके लागवड तंत्र
  • हंगामनिहाय पीक लागवडीचे सूत्र व वापर
  • शेतीविषयी अद्यावत व उपयुक्‍त माहिती ऑनलाईन प्रणालीद्वारे उपलब्‍ध
  • कमी कालावधीत येणा-या पिकांच्‍या सुधारित व संकरित जातीचा वापर
  • रासायनिक खत व अन्‍नद्रव्‍ये व्‍यवस्‍थापन
  • पिकांना पाणी देण्‍याच्‍या आधुनिक सिंचन पध्‍दती, महत्त्व, वापर,  हाताळणी  व देखभाल दुरूस्ती इ.   
  • पिकांना विद्राव्‍य खते देण्‍याच्‍या आधुनिक सिंचन पध्‍दती 
  • मुख्‍य व भाजीपाला पिकांना ठिबक सिंचन पध्‍दती वरदान 
  • पीक संरक्षणासाठी रासायनिक, जैविक व नैसर्गिक तत्‍त्‍वांचा अवलंब
  • मानवी आरोग्‍यासाठी सेंद्रिय उत्‍पादने
  • मुख्य पिकाचे काढणीपश्‍चात्‍त नवनवीन तंत्रज्ञान
  • पीक काढणीनंतर हाताळणी, साठवणूकीसाठी नवनवीन तंत्रज्ञान
  • शेतीपूरक उद्योग  व व्‍यवसाय करण्‍यासाठी भागभांडवलाची उपलब्‍धता
  • शेतकरी व शेतमजूर यांचे कल्याण करण्यासाठी शेतीपूरक पशुसंवर्धनाच्या नावीन्यपूर्ण योजना
  • शेतकरी, कामगार व उद्योजकता यांचा सर्वांगीण विकास करण्‍यासाठी कल्‍याणकारी विशेष कृ‍षि योजना 
  • शेतीचा सर्वांगीण विकास करण्‍यासाठी कल्‍याणकारी कृ‍षि योजना
  • आधुनिक सिंचनासाठी विविध शासकीय योजना
  • पशुसंवर्धन, नाबार्ड, जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग यांसारख्या योजनांच्या माध्यमातून शेतकरी व शेतमजूर यांचा विकास करणे.
  • शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शेतमाल तारण योजना, ई-नाम योजना
  • कृषि उत्पन्न बाजार समिती अंतर्गत शेतकऱ्यांना विविध सवलती
अशाप्रकारे शेतकरी बांधवांनी शेती ही पारंपारिक पद्धतीने न करता त्याला आधुनिक शेतीची जोड दिली पाहिजे. कृषि विद्यापीठे व विविध कृषि संशोधन संस्था यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून, शेतीचे उत्पादन वाढवून, स्वत:चा विकास करून देशाच्या उत्पादनात हातभार लावणे आवश्यक आहे.
 
शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर
 

14 thoughts on “शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान”

  1. विद्यार्थी व शेतकरी यांच्यासाठी खूप महत्वाचा पार्ट सरांना घेऊन आला त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद

    Reply

Leave a Reply

Discover more from Modern Agrotech

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading