अटल बिमित व्यक्ती कल्याण योजना

जर आपण खासगी क्षेत्रातील कंपनीत काम करत आहात आणि जर नोकरी जाण्याची चिंता भेडसावत असेल तरी काळजी करू नका. आपणास अटल बिमित व्यक्ती कल्याणया योजनेचा लाभ घेता येईल. जर तुमची कंपनी तुमच्या वेतनातून पीएफ किंवा ईएसची रक्कम कपात करत असेल तर या योजनेअंतर्गत तुम्हाला २४ महिन्यांकरिता सरकारकडून पैसे मिळत राहणार आहेत. (Officially Website https://www.esic.nic.in/)
कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) अटल बिमित व्यक्ती कल्याणयोजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे. परंतु यासाठी आधी नोंदणी करणे आवश्यक आहे. ईएसआयसीच्या संकेतस्थळावर याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. अटल बिमित व्यक्ती कल्याणया योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीची नोकरी गेल्यास सरकार त्याला दोन वर्षांपर्यंत आर्थिक मदत करणार आहे. ही मदत दोन वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला केली जाणार आहे. बेरोजगार व्यक्तीच्या गेल्या ९० दिवसांच्या  २५ टक्के इतकी रक्कम त्याला मदत म्हणून देण्यात येणार आहे. जे लोक ईएसआयसीशी जोडले गेले आणि ज्यांनी दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी नोकरी केली आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याव्यरिक्त आधार क्रमांक आणि बँक अकाऊंटही डेटाबेसशी जोडलेला असणे आवश्यक आहे.
अशी करावी नाव नोंदणी?
अटल बिमित व्यक्ती कल्याणयोजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. तुम्ही ईएसआयसीच्या संकेतस्थळावर जाऊन या योजनेचा फॉर्म डाऊनलोड करू शकता. फॉर्म डाऊनलोड Officially Website https://www.esic.nic.in/ करण्यासाठी https://www.esic.nic.in/attachments/circularfile/93e904d2e3084d65fdf7793e9098d125.pdf या लिंकचा वापर करावा. हा फॉर्म भरल्यानंतर तो नजीकच्या ईएसआयसी कार्यालयात जमा करावा लागणार आहे. तसेच यासोबत २० रूपयाचा नॉन ज्युडिशिअल स्टँप पेपरवर नोटरीद्वारे अॅफिडेव्हिट (शपथपत्र) द्यावे लागणार आहे.
यामध्ये AB-1 पासून AB-4 पर्यंत फॉर्म जमा करून घेतला जाईल. सध्या यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध नसली तरी लवकरच ती सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या योजनेचा फायदा केवळ एकदाच घेता येऊ शकतो.  जर एखाद्या व्यक्तीला चुकीच्या कामामुळे कंपनीतून काढून टाकले असेल, तसेच एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.  जर तुम्ही स्वेच्छा निवृत्ती घेतली असेल तरीही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
अशाप्रकारे आपण, आपले मित्र, नातेवाईक पुणे, मुंबई व इतर शहरातील खाजगी कंपनीमध्‍ये कार्यरत असतील अथवा त्‍यांचा जॉब / नोकरी गेली असेल तर घाबरून जाण्‍याची गरज नाही. आपण अटल बिमित व्यक्ती कल्याण या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यासाठी Officially Website https://www.esic.nic.in/  या दिलेल्‍या लिंकवर क्लिक करून अधिक माहिती जाणून घ्‍यावी. आणि ही बातमी आपलया सर्व मित्रांपर्यंत पोहोचवून, शेअर करून सहकार्य करावे.
Prajwal Digital

Leave a Reply