प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY)
प्रधान मंत्री मुद्रा योजना (PMMY) ही एक योजना आहे जी माननीय पंतप्रधानांनी ८ एप्रिल, २०१५ रोजी बिगर कॉर्पोरेट, बिगर-शेती लघु / सूक्ष्म उद्योगांना १० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्याकरिता सुरू केली होती. या कर्जांचे पीएमएमवाय अंतर्गत मुद्राचे कर्ज म्हणून वर्गीकरण केले जाते. ही कर्जे वाणिज्य बँका, आरआरबी, लघु वित्त बँका, एमएफआय आणि एनबीएफसी दिली आहेत. कर्जदार वर नमूद केलेल्या कोणत्याही कर्ज देणाऱ्या संस्थांकडे जाऊ शकतो किंवा www.udyamimitra.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतो. पीएमएमवाय च्या तत्वाखाली, मुद्राने लाभार्थी सूक्ष्म युनिट / उद्योजकांच्या वाढीची / विकासाची आणि अर्थसहाय्याची आवश्यकता दर्शविणारी ‘शिशु‘, ‘किशोर‘ आणि ‘तरुण‘ अशी तीन उत्पादने तयार केली आहेत आणि पुढील संदर्भांसाठी एक संदर्भ बिंदू देखील प्रदान केला आहे. पदवी / वाढीचा टप्पा.
मुद्रा योजनेत तीन प्रकार असून (१) शिशू कर्ज, रक्कम रु. ५०,०००/- पर्यन्त, (२) किशोर कर्ज रु.५०,०००/- पेक्षा जास्त ते रु. ५ लाखापर्यंत (३) तरुण कर्ज हे ५ लाखापेक्षा जास्त ते १० लाखापर्यंत. त्यामुळे हे मुद्रा कर्ज फायद्याचे आहे. ज्यांचा शेतीपूरक उद्योग वा व्यवसाय उभा करावयाचा आहे अशा तरूणांनी मुद्रा योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपले बचत खाते असलेल्या संबंधित बँकेशी पाठपुरावा करावा. त्यामुळे मुद्रा योजनेसंबंधी आपणास माहिती प्राप्त होईल.
मुद्रा योजनेचा उद्देश
या योजनेचा उद्देश असा आहे की, ज्यांच्याजवळ पुरेसे भांडवल उपलब्ध नाही, अशा व्यक्तींना उद्योग, व्यवसाय उभा करण्यासाठी अथवा आहे त्या व्यवसायात वाढ करण्यासाठी कर्ज पुरवठा करणे.
मुद्रा योजना कोणासाठी ?
मुद्रा योजना कोणासाठी ?
- ग्रामीण व शहरी भागातील लघु व्यावसायिक, प्रोप्रायटर किंवा भागीदारी, उत्पादक फर्म, लघु दुकानदार, भाजीपाला विक्रेते, ट्रक चालक, खाद्य पदार्थ सेवा देणारे, विविध वस्तू दुरुस्त करणारे, यंत्र चालक, लघू उद्योग, बलुतेदार, अन्न व खाद्य पदार्थ बनविणारे इत्यादीसाठी आहे.
- शेतीपूरक व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, मधुमक्षिका पालन, कुक्कुट पालन, पशूपालन, दुग्ध व्यवसाय, AGRO क्लिनिक, AGRI बिझिनेस सेंटर,अन्न व कृषी प्रक्रिया इत्यादीसाठी आहे.
- साखळी (फ्रंचायजी) व्यवसाय, वितरक (डिलर), किरकोळ व्यापारी, वाहतूक चालक, विविध कंपन्यांना सेवा पुरवठा करणारे इत्यादीसाठी आहे.
- या सर्वांना व इतर कृषीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या चालू व्यवसायात वाढीसाठी किंवा नवीन व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला जातो.
मुद्रा कर्ज कसे मिळू शकते ?
मुदत कर्ज आणि / किंवा खेळते भांडवल जास्तीत जास्त रु. १० लाख.
मुद्रा : कर्जाचे प्रकार
- शिशू : रु. ५०,००० पर्यंत
- किशोर : रु. ५०,००० पेक्षा जास्त व रु. ५ लाख पर्यंत
- तरुण : रु. ५ लाखांपेक्षा जास्त व रु. १० लाख पर्यंत
कर्जदाराची स्वत:ची रक्कम / भांडवल (भाग) :
- शिशू काही नाही
- किशोर १५%
- तरुण १५%
मुद्रा कर्ज परतफेड
अल्प मुदतीसाठी : कमाल ३६ महिने.
मुदतीचे कर्ज : कमाल ८४ महिने.
तारण : कर्जातून निर्माण झालेले (Assets) बँकेकडे तारण, इतर कोणतेही अतिरिक्त तारण लागत नाही.
व्याज दर : भारतीय रिजर्व बँक ऑफ इंडिया / बँक यांच्या नियमानुसार.
मुद्रा कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
अर्ज करणाऱ्यांचे वय साधारण १८ वर्ष ते ६५ वर्ष असणे आवश्यक आहे. अर्ज करणारा व्यक्ती हा भारतीय असावा. अर्जदाराचे बँकेत खाते असावे. बँकेच्या नियमात बसल्यानंतर आपल्याला कर्ज मिळते. बँकेसह आधार लिंक असावा आणि मोबाईल नंबरला आधारसह लिंक करणे आवश्यक आहे. मुद्रा कर्जासाठी बँकेत जाऊन अर्ज भरावा लागेल. बँकेला आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतील. तुम्ही सुरु केलेल्या व्यवसायाची माहिती सादर करावी लागेल. यानंतर बँकेने ठरवलेल्या सर्व औपचारिकता पूर्ण कराव्या लागतील. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर मुद्रा बँक योजनेद्वारे आपले कर्ज मंजूर केले जाईल. मुद्रा कर्ज अंतर्गत कोणताही व्याज दर निश्चित केलेला नाही. परंतु सर्वसाधारणपणे मुद्रा कर्जाचा व्याज दर वार्षिक सुमारे १२% आहे.
मुद्रा कर्ज देणाऱ्या बँकांचे नाव
स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India), बँक ऑफ बडौदा (Bank of Baroda ), विजया बँक(Vijaya Bank), बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra ) आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), एक्सिस बँक (Axis Bank ), येस बँक (Yes Bank ), यूनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India), पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank), देना बँक (Dena Bank), आंध्र बँक (Andhra Bank), आयडीबीआय बँक (IDBI Bank ), फेडरल बँक(Federal Bank ).
मुद्रा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी :
आपणास मुद्रा योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरावयाचे असेल तर http://www.mudramitra.in/Login/Register# या संकेत स्थळाला भेट द्यावी.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण https://www.mudra.org.in/ या संकेत स्थळावर भेट देऊन अथवा State Toll Free Numbers for PMMY MAHARASHTRA 18001022636 भ्रमणध्वनीद्वारे फोन करून माहिती प्राप्त करू शकतात. तसेच या योजनेचा लाभ घ्यावायाचा असेल तर योजनेचे नियम व अटीचे तंतोतंत पालन करणे, संबंधित बँक मुद्रा कर्ज देण्यासाठी तत्पर पाहिजे आणि इतर आवश्यक बाबींची पूर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे. या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मुद्रा कर्ज कर्जधारकांना मंजूर होते.
Excellent mudra scheme
Very nice scheme for poor and middle class people.
Thank bhai & share friends