Month: June 2020

हळदीवर प्रक्रिया करण्याची सुधारित पध्दत

हळदीवर प्रक्रिया करण्याची सुधारित पध्दतलेखक : डॉ. सुमठाणे योगेश वाय., दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूरहळद पिकाचे उत्पादन महाराष्ट्रात बहुसंख्य जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. हळदीवर प्रक्रिया सुद्धा चांगल्या प्रकारे करता येते. मात्र हळद प्रक्रियेच्या सुधारित पद्धतीअभावी बरेच प्रमाणात हळदीचे नुकसान होऊन परिणामी आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. यासाठी सुधारित पद्धतीने हळद प्रक्रिया केल्यास तयार होणारी हळद ही उत्तम दर्जेची असते. तसेच हळदीपासून निरनिराळे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात. याला बाजारात विशेष मागणी सुद्धा आहे. आपण…
Read More
शतावरी उत्पादन तंत्रज्ञान

शतावरी उत्पादन तंत्रज्ञान

शतावरीचे उत्पादन घेण्यास भारतामध्ये खूप मोठा वाव असून लागवडीसाठी पोषक हवामान व भौगोलिक परिस्थिती अतिशय अनुकूल आहे. यामुळे शतावरीचे दर्जेदार उत्पन्न घेता येऊ शकते. शतावरीच्या दोन प्रजातींचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन घेतले जाते. त्यातील पहिली औषधीसाठीची शतावरी (Asparagus racemosus) व भाजीसाठीची शतावरी (Asparagus officinalis). याशिवाय शतावरीच्या शोभेची शतावरी, महाशतावरी, इत्यादी 22प्रजाती आहेत. शतावरी हे भाजीपाला वर्गातील महत्त्वाचे पीक असून शतावरी वनस्पतीच्या कुळातील अॅस्परागस (Asparagus) ही भाजीची जात आहे. शतावरी अॅस्परागस ऑफिसिनॅलिस (Asparagus- officinalis) या शास्त्रीय नावाने…
Read More
हळद उत्पादनाचे शास्त्रोक्त तंत्रज्ञान

हळद उत्पादनाचे शास्त्रोक्त तंत्रज्ञान

हळद हे महत्त्वाचे व्यापारी पीक आहे. हळदीचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनात सतत होत असतो. हळदीपासून निरनिराळे प्रक्रियायुक्त पदार्थ सुद्धा मोठ्या प्रमाणावर तयार केले जातात. त्यामुळे हळद पिकाला दुहेरी महत्त्व प्राप्त झालेले आहे. शेतकऱ्यांना इतर हंगामी पिकाच्या तुलनेत हळद हे पीक चांगले फायदेशीर उत्पादन देणारे आहे. याकरिता हळद लागवडीचे जास्तीत जास्त उत्पादन घेऊन  देशाच्या आर्थिक उत्पन्नात आपला हातभार अगत्याचे आहे. याच उद्देशाने हळद उत्पादनाचे शास्त्रोक्त तंत्रज्ञान हा लेख महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त व महत्त्वपूर्ण ठरणार…
Read More

करोना महामारी पश्चात उद्योजकांसमोरील आव्हाने

करोना महामारी पश्चात उद्योजकांसमोरील आव्हानेलेखक : प्रा. गोविंद श्री. अंकुश, सहयोगी प्राध्यापक, आदित्य कृषि महाविद्यालय, बीडडॉ. सुमठाणे योगेश वाय., दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूरकरोना महामारी (कोवीड-19) या रोगाने जागतिक स्तरावर अतिशय वेगाने थैमान घातले आहे. यामुळे लाखो व्यक्तींचा मृत्यू झालेला असून मोठ्या प्रमाणावर लोक या आजाराने मूत्यूशी झुंज देत आहेत. यामुळे विकसित व विकसनशील राष्ट्रांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली असून परिणामी शेती, उद्योजक, व्यवसाय, कंपन्या ह्या मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. ही जागतिक व देशातील सद्य:परिस्थिती आहे.…
Read More
तूर लागवडीचे सुधारित तंत्र

तूर लागवडीचे सुधारित तंत्र

तूर हे महत्त्वाचे डाळवर्गीय पीक असून तूर डाळ मानवी आरोग्याला प्रथिने पुरविणारा महत्त्वाचा घटक मानला जातो. यामुळे महाराष्ट्रातील बहुसंख्य जिल्ह्यात तूरीचे व्यापारी तत्त्वावर उत्‍पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तसेच तूरीचे पीक कोरडवाहू भागात, अवर्षणग्रस्त परिस्थितीत तग धरू शकत असल्यामुळे तूरीची लागवड प्राधान्यक्रमाने शेतकरी बांधव करत आहेत. तूरीचे पीक विविध पीक पद्धतीमध्ये आंतरपीक पीक म्हणून घेण्‍याकडे शेतकऱ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत जात आहे.   यंदा (2020) महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात विशेषत: मराठवाड्यात पाऊस समाधानकारक झाल्यामुळे शेतकरी बांधव खरीपाची पेरणी करण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर…
Read More
कापूस उत्पादन तंत्रज्ञान

कापूस उत्पादन तंत्रज्ञान

  प्रा. संदीप देशमुख, पीकशास्त्रज्ञ, मांजरा कृषि विज्ञान केंद्र, अतिरिक्त एम.आय.डी.सी., लातूर कापूस हे राज्यातील विशेषत: विदर्भातील महत्‍त्‍वाचे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. राज्‍यात कापूस या पिकाखाली सुमारे 42 लाख हेक्‍टर क्षेत्र असून ते देशाच्‍या एकूण कापूस पिकाखालील क्षेत्रांपैकी एक तृतीयांश पेक्षा अधिक आहे. बहुतांश कापूस लागवड ही मोसमी पावसावर अवलंबून असल्‍याने त्‍याचे उत्‍पादन व उत्‍पादकता कमी येते. याबरोबरच उत्‍पादकता कमी असण्‍याची बरीच कारणे असून यामध्‍ये मुख्‍यतः कीड व रोग, हवामानात सतत होत असलेले बदल…
Read More
खरीप मूग लागवड तंत्र

खरीप मूग लागवड तंत्र

खरीप हंगामतील मूग हे महत्वाची पीक असून या पिकाची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर केली जाते. मुगात प्रथिनांचे प्रमाण अधिक (24%) असून त्‍याची प्रतही उत्तम आहे. मूग पचनास हलका असल्‍याने त्‍यातील प्रथिने अधिक सुलभतेने शरीराच्‍या वाढीसाठी आणि आरोग्‍यासाठी वापरली जातात. या शिवाय मुगामध्‍ये खनिजे आणि जीवनसत्‍वे पुरेशा प्रमाणात असल्‍यास आहारात मूग अथवा त्‍यापासून केलेली डाळ अंतर्भूत केल्‍यास समतोल आणि पौष्‍टिक आहार म्‍हणून उपयोग होऊ शकतो. महाराष्ट्रात मूगाचे पिकाचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता ही दिवसेंदिवस कमी होत…
Read More
उद्योजकता विकास व सबलीकरण

उद्योजकता विकास व सबलीकरण

देशातील बहुसंख्‍य लोक शेती व शेतीपूरक उद्योगधंद्यावर अवलंबून आहेत. कुटुंबाची वेळोवेळी प्राथमिक गरजा आणि उदरनिर्वाह भागवण्‍यासाठी पैशाची नितांत गरज भासते. शिवाय शेतीतील उत्‍पन्‍न अल्प प्रमाणात मिळत असल्‍यामुळे शेतकरी रोजगाराच्‍या शोधात स्थलांतरीत व्हावे लागत आहे. याकरिता उद्योजकता विकासाद्वारे शेतकऱ्यांचे सबलीकरण करणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. याच पार्श्वभूमीवर शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी कुटुंबाला शेतीपूरक उद्योग व व्यवसाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध झालेली असून त्याद्वारे त्यांचे सामाजिक व आर्थिक सबलीकरण होणे आवश्यक आहे. मागील अनेक वर्षांपासून रोजगार…
Read More