बांबू लागवड

आपल्‍या देशात एकूण 14 करोड हेक्‍टर कृषि क्षेत्र आहे. त्‍यामध्‍ये डोंगराळ जमिनीचे क्षेत्र 14 कोटी हेक्‍टर म्‍हणजेच 10 टकके आहे. यातील 10 टक्‍के जमीन बांबूची आवश्‍यकता पूर्ण करण्‍यासाठी पुरेशी आहे. हेच चित्र महाराष्‍ट्रासाठी ही लागू आहे. ही गरज पूर्ण करण्‍यासाठी जल, जमीन, वायू व पाऊस बांबूच्‍या उत्‍पादनासाठी योग्‍य आहे.
येथे वेगवेगळया स्‍थानावर वेगवेगळा पाऊस पडतो तो बांबूच्‍या विविध जाती व उपजातीसाठी उपयुक्‍त आहे. बांबूची लागवड केल्‍यानंतर दोन ते तीन वर्ष पाण्‍याची व्‍यवस्‍था केली तर बांबूचे उत्‍पादन 6 ते 7 वर्षांत केलेला खर्च परत मिळून उत्‍पादन वाढ होण्‍यास सुरुवात होते. पाण्‍याची व्‍यवस्‍था नसेल तर उत्‍पादन मिळण्‍याकरिता अधिकच दोन वर्षांचा कालावधी लागतो.
बांबू लागवडीचा खर्च
एका हेक्‍टर मध्‍ये 1500 बांबू या प्रमाणे तीन हेक्‍टर मध्‍ये 4500 बांबू लावण्‍यात आल्‍यास त्‍याच्‍या लागवडीचा प्रथम वर्षांचा संपूर्ण खर्च रू. एक लाख सवीस हजार होईल. दुसऱ्या वर्षी पाणी, वीज व निरीक्षक यांचा खर्च मिळून रू. 80,500/- होतो. तिसऱ्या वर्षांपासून कवेळ रात्रीच्‍या सुरक्षतेचाच खर्च होतो तो प्रतिबंध प्रति हेक्‍टर पाच हजार रुपये लागवडीकरिता बांबूच्‍या योग्‍य जातीची निवड बांबूीची शेती करावयाची असल्‍यास योग्‍य जातींच्‍या बांबूची निवड करण्‍याकरिता खालील बाबींचा विचार करावा लागेल.
  • मातीची उर्वराशक्‍ती व त्‍यांतील सूक्ष्‍म
  • पाऊस, तापमान, आर्द्रता
  • पाण्‍याची व्‍यवस्‍था
  • बाजार व्‍यवस्‍था
बांबूच्‍या विविध जाती व उपजातींचा अभ्‍यास केल्‍यास प्रति हेक्‍टर तीनशे ते तीन हजार झाडे लागू शकतात. सर्वसाधारणपणे 1500 झाडे एका हेक्‍टरमध्‍ये लावता येतील.
बांबू लागवडीसाठी उपयुक्‍त जमीन
  • बांबू लागवडीकरिता खालील प्रकारची जमीन उपयुक्‍त आहे.
  • पाण्‍याचा निचरा होणारी जमीन
  • मातीचा थर कमीत कमी 10 सेंमी. असावा.
  • समुद्र सपाटीपासून अधिकतम 1000 मीटर उंचीवर
  • खडकाळ जमीन असेल तर उत्‍तम
बांबू उत्‍पादन
लागवडीचे नंतरचे पहिले पाच वर्ष उत्‍पादन मिळत नाही. त्‍यानंतर मात्र प्रत्‍येक बागेतून किमान 10 ते 12 बांबू 30 वर्षांपर्यंत शेत मालकांस मिळतात. एका बांबूची किंमत अंदाजे 18 ते 20 रूपये धरल्‍यास 30 वर्षांपर्यंत बांबूचे उत्‍पन्‍नाचे गणित लांबवर जाते.
बांबूचे नैसर्गिक स्‍थान व विस्‍तार
बांबू साधारणपणे उष्‍ण कटिबंधीय प्रदेशात समुद्रसपाटीपासून 4000 मीटर उंचीपर्यंत आढळतो. तरी बांबू उष्‍ण प्रदेशात सर्वत्र आढळत असला तरी युरोप व्‍यतिरिक्‍त उष्‍ण कटिबंधाच्‍या सीमेवरील व समशीतोष्‍ण प्रदेशातही तो नैसर्गिकरित्‍या आढळतो. पर्जन्‍यमान, तापमान, समुद्रसपाटीपासूनची उंची व मातीचा प्रकार या गोष्‍टींवर बांबूची भौगोलिक व्‍याप्‍ती अवलंबून असते. बहुसंख्‍य बांबू प्रजातींना 8 अंश सेल्सिअस ते 36 अंश सेल्सिअस तापमान, कमीत कमी 1000 मि.मी. वार्ष‍िक पर्जन्‍यमान व मोठ्या प्रमाणावर हवामानातील आर्द्रता या गोष्‍टींची चांगल्‍या वाढीसाठी आवश्‍यकता असते.
बांबू हा पानझडी, तसेच सदाहरित जंगलाचा महत्‍त्‍वाचा घटक आहे. निसर्गात बांबू क्‍वचितच स्‍वतंत्रपणे आढळून येतो. मुख्‍यत्‍वे तो उष्‍ण प्रदेशातील व सदाहरित, उष्‍ण आर्द्र, पानझडी वने, डोंगराळ समशीतोष्‍ण, हिमालयीन आर्द्र समशीतोष्‍ण वनांत आंतरवृक्ष म्‍हणून वाढतो. सामान्‍यपणे बांबूसा व डेंड्रोकॅलॅमस या प्रजाती उष्‍ण हवामानात वाढतात तर अखंडीनेरिया व तत्‍सम प्रजाती समशीतोष्‍ण हवामानात वाढतात. हिमालयाच्‍या पूर्व व परिचय रांगामध्‍ये जास्‍त उंचीच्‍या प्रदेशात प्रामुख्‍याने या आढळतात.
डेंड्रोकॅलॅमस स्‍ट्रीक्‍स ही प्रजाती शुष्‍क पानझडी जंगलात ठळकपणे आढळून येते. तर बांबूचा बांबू ही प्रजाती आर्द्र पानझडी जंगलात उत्‍तम प्रकारे वाढते. प्रामुख्‍याने जायगॅटोक्‍लोसा रोस्‍ट्राटा ही प्रजाती अंदमानच्‍या निमसदाहरित जंगलात आढळते. पूर्व भारतातील पश्चिम बंगाल, आसाम व उत्‍तर पूर्व हिमालयात आढळणाऱ्या व्‍यापारीदृष्‍टया महत्‍त्‍वाच्‍या प्रजाती म्‍हणजे बांबूसा टुल्‍डज्ञ, डेंड्रोकॅलॅमस हॅमिलशेती, मॅलोकॅना व सिफेरा. 
व्‍यवसायिक दृष्‍टया बांबूच्‍या महत्‍त्‍वाचया जाती
1.  बांबूसा बांबोस सरांग
अधिवाससंपूर्ण देशभर
2.  डेंड्रोकॅलॅमस स्ट्रिक्‍स भरीव बांबू
अधिवाससंपूर्ण देशभर
3.  ऑक्सिटेनाथेर स्‍टॉक्‍सई संपूर्ण भरीव बांबू
अधिवास गोवा, कर्नाटक, कोकण, किनारपट्टी केरळ 
4.  बांबूसा बल्‍कूभा
अधिवास बिहार, झारखंड, ईशान्‍य भारत 
5.   बांबूसा तुल्‍सा
अधिवास बिहार, झारखंड, केरळ ‍
6.  बांबूसा पॉलिमॉर्का
अधिवास आसाम, अरूणांचल प्रेदश, मध्‍य प्रदेश, मेघालय, पश्चिम बंगाल
7.  बांबूसा व्‍हसगॅरिस (पिवळा बांबू)
अधिवास अरूणांचल प्रेदश, आसाम, मध्‍य प्रदेश, मणिपूर, मिझोरम
8.  डेंडोकॅलामस एस्‍पर
अधिवास आसाम, अरूणांचल प्रेदश, मेघालय
बांबू लागवडीसाठी जमीन व पाणी व्‍यवस्‍थापन
जमीन व हवामान
बांबू या पिकाला कोणतेही हवामान मानवते. तसेच बांबूच्‍या लागवडीसाठी सर्व प्रकारच्‍या जमिनी उपयुक्‍त ठरणाऱ्या आहेत. पण, पाण्‍याचा चांगला निचरा होणारी, उत्‍तम गाळाची, ओलसर व दमट व तसेच भुसभुशीत जमीन असल्‍यास उत्‍तम.
लागवड
लागण करताना देान ओळींमधील अंतर 3 मीटर व 2 रोपांमधील अंतर 1 मीटर इतके ठेवावे. जमीन हलकी, मुरमाड व रेताड असेल तर 30 सेंमी. लांबी, रूंदी व खोलीचे खड्डे घेऊन त्‍यात चांगली माती व कंपोष्‍ट भरून त्‍यात रोपे किंवा कंद लावावेत.  
बांबू हे पीक दीर्घ मुदतीचे असल्‍याने सुरुवातीला त्‍यात कोणतेही पीक घेता येते. 2 ते 3 वर्षांनी बांबू लावून त्‍याची सावली पडू लागली की मग मात्र बांबू पीक घेता येत नाही.
पाणी व्‍यवस्‍थापन
बांबूची लागवड पावसाळयाच्‍या पूर्वी करावी. जरूरत पडल्‍यास पिकाला 1 ते 2 वेळा पाणी द्यावे. वार्षिक पाऊसमान सरासरी 700 ते 1000 मि.मी. च्‍या पुढे असेल तर हे पीक कोरडवाहू पध्‍दतीने घेता येते. कमी पाऊस असल्‍यास सिंचनाची सोय करावी. पण हे पाणी केवळ पावसाळयातच द्यावे. पावसाळी हंगाम संपल्‍यावर बांबू सुप्‍तावस्‍थेत जातो व त्‍याची पाने झडतात. त्‍यामुळे बारमाही पाण्‍याची गरज भासत नाही.
लागवडीसाठी जमीन तयार केल्‍यास आधी खड्डे खोदून त्‍यात बांबू लावणे महत्‍वाचे असते. त्‍यामुळे झाडांची वाढ चांगली होते.  
बांबूची वाढ चांगली होण्‍याची वाढ झालेला बांबूचा आळा 3 वर्षांनी काढून घ्‍यावा. जेणेकरून काटया सरळ व लांब मिळतील.
बांबू शेती ही काळाची गरज असून त्‍यावर आधारित उद्योगासाठी महत्‍त्‍वाचे पीक आहे. हद्याचा शेतक-यांनी जास्‍तीत जास्‍त उपयोग आपल्‍या उत्‍पन्‍न वाढीसाठी करून घ्‍यावा व लागवड करून कार्बनची साठवणूक करावी.
डॉ. सुमठाणे योगेश यादवराव, (पीएच. डी. कृषी,एम. बी. ए.)
शब्दांकन : किशोर ससाणेलातूर 
Prajwal Digital

Leave a Reply