बियाणे साठवणूकीचे महत्वपूर्ण साधने

बियाणे साठवणूकीत किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्‍हणून भांडार हे शास्‍त्रीयदृष्‍टया विचार करून बांधावे. सुधारित पद्धतीनुसार बांधलेल्‍या भांडारात साठविलेल्‍या अंकुरक्षमता व जोम अधिक काळपर्यंत टिकून राहू शकतो. देशातील वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी अन्नधान्य उत्पादन खूप महत्वाचे आहे. त्यासाठी धान्य उत्पादन वाढणे गरजेचे आहे. बियाणे जर चांगल्या प्रतीचे असेल तर उत्पादन ही भरघोस मिळते, तेव्हा बियाणे साठवण करून ठेवणे, त्याची किंडी व रोगांपासून काळजी घेणे गरजेचे झाले आहे.
धान्याचे साठवण काळात 10 टक्के नुकसान होते, तेव्हा ते नुकसान होऊ नये म्हणून धान्ये सुरक्षित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. पावसाळ्यात बियाण्यांना कीड व रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. त्यासाठी बियाणे सुरक्षित व चांगल्या उगवण क्षमतेचे ठेवण्यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
याच उद्देशाने लेखकांनी प्रस्तुत लेख बियाणे साठवणूकीचे महत्वपूर्ण साधने यावर आधारित तयार करण्यात येत असून या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणे साठवणूकीचे होणारे नुकसान, बियाणे साठवणुकीचे महत्त्वाचे साधने कोणती आहेत या संबंधी अद्यावत माहिती प्राप्त होणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचे बियाणे  व अन्नधान्य यांचे साठवण कालवधीत होणारे नुकसान कमी होणार आहे. याचा फायदा शेतकरी, बियाणे महामंडळे, बियाणे उत्पादक कंपन्या यांना ही माहिती महत्त्वपूर्ण व उपयुक्त ठरणार आहे.

बियाण्याचे 10 टक्के नुकसान कशामुळे होते

 • बियाण्यातील ओलावा व कुबट वास 2 ते 3 टक्के
 • बियाण्यातील विविध किंडी 2.5 टक्के
 • उंदीर 2.5 टक्के
 • बुरशीजन्य रोग 2 ते 3 टक्के
बियाणे साठवणुकीचे महत्त्वाचे साधने
1) हापूरकोठी – Hapurkothi
हापूर कोठी ही वर्तुळकार आकाराची, पत्र्यापासून बनवली जाते. या कोठीमध्‍ये 2 ते 10 क्विंटपर्यंत बियाण्‍याची साठवणूक होऊ शकते.
2) बांबूपासून तयार केलेली कोठी /कणगी – Kothi / Kanagi made from bamboo
ही कणगी बांबूच्‍या चटयांपासून तयार केली जाते. बियाणे सुरक्षित राहावे म्‍हणून आतील बाजूस पॉलिथिनच्‍या कागदाचे अस्‍तर लावले जाते. कमी कालावधीसाठी व थोडया प्रमाणात बियाणे साठवणुकीसाठी या कणगीचा उपयोग होतो.
3) मातीपासून तयार केलेली कोठी – Kothi made of clay
या कोठीची उपयोग बियाणे जास्‍त प्रमाणात (5 ते 10 क्विंटल) धान्‍य साठवण्‍यासाठी होतो. ही कोठी चिकण माती, भाताचा पेंढा आणि गायीचे शेण 3 : 3 : 1 या प्रमाणात घेऊन बनवली जात व नंतर ती भाजली जाते.
4) भाजलेले मडके किंवा कोठार – Bhajalele madhake kiva kothar 
बियाणे कमी प्रमाणात  व थोडया कालावधीसाठी साठवयाचे असल्‍यास या कोठाराचा उपयोग होतो.
5) पत्र्याची कोठी – Patryachi Kothi
लोखंडी किंवा अॅल्‍युमिनिअमच्‍या पत्र्यापासून ही कोठी तयार केली जाते. बियाणे सहा महिन्‍यांपेक्षा आधिक कालावधीसाठी साठवयाचे असल्‍यास या कोठीचा उपयोग होतो. पूर्वी ज्वालाग्राही पदार्थ साठवण्‍यासाठी पत्र्याचा टाकीचा उपयोग झाल्‍यानंतर रिकाम्‍या टाकीत बियाणे साठवले जात असते.
6) पेव – Pew 
जमिनीत किंवा तळघरात पेवातून मोकळ्या, बियाण्‍याची एक वर्षांपेक्षा जास्‍त कालावधीसाठी साठवणूक करता येते. परंतु तळघर किंवा पेवामध्‍ये जमिनीवरील पाणी शिरणार नाही, याची काळजी घ्‍यावी लागते.
7) पुसा कोठी – Pusa Kothi 
ही कोठी भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्‍ली यांनी तयार केलेली आहे. कोठीचा आकार आयताकृती असून ही जमिनीपासून 4 सें.मी. उंच ओट्यावर कच्‍च्‍या विटाच्‍या सहाय्याने तयार केली जाते. या कोठीमध्‍ये 1 ते 3 टनापर्यंत बियाण्‍याची साठवणूक करू शकतो. कोठाराच्‍या तळाकडील, छताकडील व दोन्‍ही बाजूस 700 मायक्रॉन गेजच्‍या पॉलिथीनचे अस्‍तर लावलेले असते. कोठाराच्‍या खालील बाजूस 15 सें.मी. व्‍यासाची नळी बियाणे बाहेर काढण्‍यासाठी असते. तसेच कोठारात बियाणे भरण्‍यासाठी समोरील बाजूस 60 x 60 सें.मी. ची जागा असते.
8) हेसनबॅग (पोते) – Hessenbaug (Pothe) 
बियाणे मोठ्या प्रमाणावर साठवावयाचे असल्‍यास पोत्‍यात साठविले जाते. व्‍यापाराच्‍या दृष्‍टीने पोत्‍यात साठविले जाते. व्‍यापाराच्‍या दृष्‍टीने साठवण करण्‍यासाठी सोयीचे ठरते.
9) एच.डी.पी.ई बॅग – HDPE bag
30 ते 50 किलो बियाणे साठवणुकीसाठी या बॅग (गोणी) चा उपयोग होतो.
10) प्‍लॅस्टिक ड्रम (टाकी)/पत्र्याचा टीप :
सर्वसाधारणपणे 50 ते 100 किलो बियाणे एका टाकीत साठवले जाते. बियाणे साठवताना टाकीमध्‍ये पॉलिथीनची बॅग वापरल्‍यास बियाणे जास्‍त दिवसांपर्यंत अंकुरणक्षम राहते.
11) तिहेरी थर वातभेद्य साठवणूक- Triple layer airtight storage 
रिकाम्‍या गोणीत 80 मायक्रॉन गेजच्‍या दोन पॉलिथिनच्‍या पिशव्‍या ठेवल्‍या जातात. साठवणुकीचे बियाणे पहिल्‍या पिशवीत भरून त्‍याची चूड घट्ट बांधली जाते व त्‍यानंतर दुसऱ्या पिशवीचीही चूड घट्ट बांधली जाते. शेवटी गोणी काळजीपूर्वक शिवून घेतात. त्‍यामुळे ने-आण करणे सोपे होते. त्‍यामुळे बियाण्‍यातील आवश्‍यक प्राणवायू कमी होऊन कार्बन डायऑक्‍साईडचे प्रमाण वाढते आणि कीटकांच्‍या श्‍वासोच्‍छवास अडथळा निर्माण होऊन किडीचे नियंत्रण होते.
आधुनिक साठवणगृहाची मूलभूत तत्त्वे- Fundamentals of modern storage
 • साठवणगृहाची फरसबंदी (तळ) आर्द्रतारोधक असावी. भिंती, विटा सिमेंटच्‍या व छत सिमेंट काँक्रीटचे व आर्द्रतारोधक असावे.
 • साठवणगृहात हवा सतत खेळती असावी.
 • पक्षी व किडींचा प्रादुर्भाव टाळण्‍यासाठी खिडक्‍यांना जाळी लावावी.
 • साठवणगृहाचा तळ जमिनीपासून 1 मीटर उंच असावा.
 • बियाण्‍याच्‍या बॅगा (पिशव्या) लाकडी रॅकवर ठेवाव्‍यात.
 • साठवणगृहाच्या बाहेरील भिंतीना पांढरा रंग द्यावा.
 • छताला फॉल्‍स सिलिंग असावे, त्‍यामुळे आतील तापमान थंड राहील.

अशाप्रकारे बियाणे साठवणुकीत पारंपारिक व आधुनिक साधनांना विशेष महत्व आहे. कारण बियाणे साठवणुकी अभावी बियाणे व धान्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे बियाणे उत्पादक शेतकरी तथा कंपन्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. या बाबींचा विचार बियाणे साठवुणकीसाठी योग्य साधनाचा वापर करून बियाणे कीड व रोगांपासून संरक्षण करावे. त्यामुळे बियाणे जास्तीत जास्त काळ टिकवून वापर करता येते. यामुळे शेतकरी बांधवांनी शेतातील धान्य मळणी केल्यानंतर उपरोक्त बियाणे साठवणुकीचे साधने यामधील आवश्यक असणाऱ्या बियाणे साठवणूक साधनांचा वापर करून बियाणे साठवणूक करावे, जेणेकरून शेतकऱ्यांना बियाणे व धान्य दीर्घकाळ टिकवता येतील.  

सदर लेख बियाणे साठवणूकीचे महत्वपूर्ण साधने यावर आधरित करण्यात येत असून या लेखामुळे बियाणे साठवणुकीच्या निरनिराळ्या साधनांची आपणास  माहिती मिळेल तसेच त्यांचे महत्त्व आपल्या बियाणे साठवणुकीच्या प्रकारानुसार आपणास त्याचा अवलंब करता येईल. त्यामुळे बियाणे वेअरहाऊस किंवा धान्य गोदामात साठवण्याची गरज भासणार नाही आणि बियाणे किंवा धान्य स्थलांतरीत करताना बिण्याचे नुकसान होण्याची भीती असते. त्यामुळे या साधनांचा उपयोग करून शेतकऱ्यांनी स्वत:च्या घरी बियाणे चांगल्या प्रकारे साठवणूक करावे. ज्या वेळेस बियाणे किंवा धान्यास बाजारपेठेत भाव मिळेल त्या वेळेस त्याची विक्री करून किफायतशीर उत्पादन घेता येऊ शकते. म्हणून बियाणे साठवणुकीच्या साधनांना अनन्यसाधारण महत्त्व आले आहे.  
संदर्भ :
 1. डॉ. विजय शेलार व इतर (2018) : बियाणे तंत्रज्ञान आणि व्‍यवस्‍थापन, सकाळ प्रकाशन, पुणे
 2. बावीस्कर व्ही. एस. व इतर, अनुवांशिक आणि वनस्पती पैदास विभाग, आघारकर संशोधन संस्था, पुणे

– शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर

**** बियाणे साठवणूकीचे महत्वपूर्ण साधने *****

Please like, share & Comments 

Prajwal Digital

1 thought on “बियाणे साठवणूकीचे महत्वपूर्ण साधने”

Leave a Reply