सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचे महत्व


सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचे महत्व
वनस्पती, प्राणी व जीवजंतू त्यांच्या अवशेषांपासून कुजवून खते तयार केली जातात त्यांना आपण सर्वसाधारणपणे सेंद्रिय खते असे म्हणतात. सेंद्रिय खताचे काय महत्त्व आहे, असा वापर कसा केला जातो, हे आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम सेंद्रिय खताचे महत्त्व सेंद्रिय खताच्या वापरामुळे घाण कचरा याचा योग्य वापर झाल्यामुळे स्वच्छता राखली जाते. त्याच प्रमाणे प्रदूषण कमी होते, तसेच बऱ्याश्या पर्यावरण समस्या कमी करता येतात.
सेंद्रिय खताच्या वापरामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांमध्ये सुधारणा घडवून, उत्पादन वाढते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, पाण्याचा योग्य निचरा होण्यास मदत होते. जमिनीत हवा खेळती राहते. त्यामुळे जमिनीला अन्नद्रव्याची गरज सेंद्रिय खतांच्या माध्यमातून उपलब्ध होते, परंतु रासायनिक खतांमुळे होणारे दुष्परिणामावर मात करता येते.
सेंद्रिय पदार्थ जमिनीत अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, असे सेंद्रिय पदार्थ म्हणजे शेतीतील काडीकचरा, जनावरांचे मलमूत्र अवशेष इत्यादी शेतात वा शेताबाहेर कुजवून तयार झालेला पदार्थ म्हणजे सेंद्रिय खत होईल. सेंद्रिय खतासाठी लागणारे जमिनीतल्या सेंद्रिय पदार्थाच्या याची सुरुवात ही वनस्पतीची वाढ व कुरणे येथून झाली. वनस्पतीमध्ये पिष्टमय पदार्थ, प्रथिने इत्यादी घटक असतात, तसेच सेंद्रिय खताचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शेतात जास्त प्रमाणात वापरावी लागतात. सेंद्रिय खतांमध्ये शेणखत, कंपोस्ट खत इत्यादीचा समावेश शोध लागण्यापूर्वी पद्धतीने लागवड केली जात असे.
रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत चाललेली आहे व त्याचा परिणाम उत्पादकतेवर होऊ लागला. याचे मुख्य कारण म्हणजे सेंद्रिय खताचा वापर करुन सेंद्रिय खतांमुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मात परिणाम होतो. सेंद्रिय खताचा वापर जमीन म्हणजे मातीत होईल मध्ये पूर्ण कुजलेले पदार्थ जमिनीत राहणारे सजीव त्याच्या विघटनाच्या माध्यमाद्वारे निर्मिती करतात. मूलद्रव्यांचे प्रमाण हे प्राण्याचे अन्न, त्यांची अवस्था, प्राण्याची वय, मलमूत्र, साठवणुकीचा प्रकार इत्यादी बाबीवर अवलंबून असते. जनावरांनी खाल्लेल्या साऱ्यामध्ये 70 ते 80 टक्के नत्र व स्फुरद आणि पालाश हे शेण व मूत्र याच्‍या मधून बाहेर पडतात.
जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी तसेच वाढविण्यासाठी आणि जमिनीतील जैविक क्रिया वाढवण्यासाठी पुरेशा प्रमाणात खुलणारी सूक्ष्मजीव वनस्पती किंवा प्राणीजन्य पदार्थ जमिनीत परत घालून त्यापासून निर्माण होणारे उपयोगी सूक्ष्मजीव वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ हेच खत व्यवस्थापनाचा पाया असला पाहिजे. व्यवस्थापन प्रामुख्याने जैविक विघटनशील वनस्पती व प्राणीजन्य पदार्थ यांच्याशी निगडित असायला हवे यामुळे जमिनीची आरोग्य सेंद्रिय पदार्थ उपयुक्त सूक्ष्मजीव यांचे संतुलन साधले जाते व उत्पादनात भर पडते.
सेंद्रिय खत म्हणजे काय?
सेंद्रिय खत, वनस्पती, प्राणी, जीवजंतू यांच्या वर्षापासून कुजवून जे खते तयार होतात किंवा केली जातात त्या खाताना सेंद्रिय असे म्हणतात.
सेंद्रिय खताचे प्रकार भर खते शेणखत कंपोस्ट खते उसाच्या पाचटाचे कंपोस्ट खत हिरवळीचे खत गांडूळ खत व्हर्मिवॉश सर्व प्रकारच्या पेंडी हाडाचा चुरा मासळी खत पहिला मुद्दा म्हणजे पूर्ण वाढलेल्या हिरव्या वनस्पती वनस्पती नांगरणीच्या वेळी शेतात पूर्ण काढून तयार केली जातात हिरवळीचे खत असे म्हणतात, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण थोडक्यात पाहूया
हिरवळी खतांच्या पिकांची वैशिष्ट्ये
 1. कमी कालावधीत या पिकापासून विपुल प्रमाणात उपलब्ध झाला पाहिजे.
 2. वाढीच्या सुरवातीच्या काळात ही पिके जोमाने वाढणारी असावीत. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करणे सोपे जाईल.
 3. हवेतील नत्र स्थिरीकरण होण्यास मदत होईल.
 4. ही पिके कमी सुपीक वाढण्याची क्षमता अशा पिकांची मुळे जमिनीत खोलवर जाणारी असावीत. त्यामुळे जमिनीच्या खालच्या थरातील अन्नद्रव्ये शोषली जाऊन जमिनीच्या वरच्या थरात आणली जातील व जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होईल .
 5. हिरवळीचे खत तयार करतेवेळी हिरवळीच्या खताचे पीक फुलोऱ्यात आलेले असावेत, शक्यतो ज्या शेतात पिके घेतली आहेत. ती त्याच शेतात गाडावीत हिरवळीच्या खताच्या पिकांची पाने बाहेरून आणले असते.
 6. जमिनीवर पसरून नांगराच्या साह्याने काढून टाकावेत, नुकत्याच आलेल्या हिरवळीच्या खताच्या पिकाची कापणी जमिनीलगत करावी.
 7. कापलेली हिरवळीचे पीक शेतात लोखंडी नांगराने प्रत्येक सरीमध्ये प्रमाणात टाकावे. त्यामुळे त्याच्या दुसऱ्या सत्राच्या वेळी संपूर्ण गाडले जाईल.
 8. हिरवळीचे पीक काढल्यानंतर संपूर्ण काढले जाईल याची काळजी मात्र घ्यायला हवी. यासाठी पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे.
 9. जमिनीत पाणी द्यावे, त्यामुळे व्यवस्थित होईल व गरजेनुसार उपलब्ध होतात.

सेंद्रिय खताचे महत्त्व

 1. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते.
 2. पावसाचे पाणी शोषून घेतल्यामुळे पाण्याबरोबर वाहून जाणारे अन्नद्रव्याचे प्रमाण कमी होते.
 3. ही खते जमिनीची चांगली सुधारणा घडवून आणण्यात उपयोगी पडते.
 4. जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढते व अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध करून देतात.
 5. अन्नद्रव्याची उपलब्धता वाढण्यास मदत करतात.

सेंद्रिय खताचे फायदे

 • सेंद्रिय खताचे फायदे काय आहेत हे खालील प्रमाणे आहेत :
 • जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढते.
 • जमिनीची जलधारणशक्ती वाढते.
 • जमिनीत हवा चांगली खेळती राहते.
 • पाण्याचा निचरा चांगला होतो
 • जमिनीत वाफसा गुणधर्मात सुधारणा होते उपलब्ध होतात.
 • जमिनी ह्या उत्पादनक्षम बनतात.
 
संदर्भ : सेंद्रिय शेतीची मूलतत्वे, महात्मा फुले कृषि  विद्यापीठ, राहुरी

 

Prajwal Digital

Leave a Reply