बांबू लागवडीचे महत्त्वपूर्ण पैलू

शाश्वत जीवनशैलीसाठी अष्टपैलू साहित्य म्हणून बांबूच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक बांबू दिन साजरा केला जातो. जागतिक बांबू दिन २०१८ ची थीम अशी आहे: आर्थिक आणि सामाजिक टिकाव साधण्यासाठी साधन म्हणून बांबूचा उपयोग केला जातो.
बांबू हा अनेक देशांतील ग्रामीण जीवनाचा भाग आहे, विशेषत: भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये त्याच्या अष्टपैलू स्वभावामुळे आणि एकाधिक वापरामुळे त्याला गरीब माणसाचे लाकूडदेखील म्हटले जाते. जरी ते झाडासारखे उंच वाढले असले तरी ते गवत कुटुंबातील आहे. हे दुष्काळ तसेच पुराचा सामना करू शकते.
बांबूच्या विविधतेच्या बाबतीत भारत चीनपेक्षा दुसऱ्या क्रमांकावर आहे. ईशान्य राज्ये बांबूच्या विविधतेचे भांडार आहेत आणि बांबूच्या ५८ प्रकार आहेत. बांबू हे भारतातील १० दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर पीक घेतले जाते आणि एकूण वनक्षेत्राच्या जवळपास १ टक्के क्षेत्रावर ते बांबू आहे. बांबूचे एकूण उत्पादन दर वर्षी पाच दशलक्ष टन आहे. सुमारे ८. दशलक्ष लोक रोजीरोटीसाठी बांबूवर अवलंबून असतात. भारतातील बांबूचे मूल्य अंदाजे ४.४ अब्ज डॉलर्स इतके आहे. त्यामुळे भारतात बांबू लागवडीचा चांगला वाव आहे. त्यामुळे बांबू शेतीपासून जास्तीत जास्त उत्पादन घेणे शक्य होणार आहे. 
बांबू लागवडीचे महत्त्वपूर्ण पैलू :
सर्वसाधारणपणे आपल्याकडे बांबूची शेती ही फक्त लागवडीअयोग्य जमिनीमध्येच करतात. मात्र काही ठिकाणी बांबूची शेती ही व्यवसायिक स्तरावर प्रमुख पीक म्हणून केली जाते. कारण भारतात बांबूचे अंदाजे क्षेत्र१ टक्के असून प्रत्येक वर्षी यामध्ये वाढ होत आहे. बांबू लागवड– Bamboo lagwadयामुळे बांबू लागवडीचे महत्त्वपूर्ण पैलू जाणून घेण्यासाठी सदर लेख तयार करून बांबू उत्पादक शेतकऱ्यांना सखोल व अद्यावत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांचे बांबू उत्पादन वाढविण्यासाठी, बांबू उत्पादनासंबंधी असणारे समज व गैरसमज दूर होण्यासाठी या लेखाच्या माध्यमातून सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे.
आपल्याकडे असलेल्या बांबूची जात कुली असेल? बांबू कसा ओळखता येतो?
आपल्याकडे महाराष्ट्रात बांबूच्या नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या साधारणपणे ६ जाती आहेत. त्यातल्या मेस आणि माणगा या जाती मुळच्या कोकण आणि सह्याद्रीतील आहेत. तसेच टूल्डा आणि परी बांस (नोडल बांस) या जाती गडचिरोली जिल्ह्यात आढळतात. मानवेल, काटेकळक/कतांग/काष्टी या दोन जाती महाराष्ट्रात सर्वत्र आढळतात. या व्यतिरिक्त जर कुल्या इतर राज्यांतून किंवा एखाद्या नर्सरीतून एखादा अनोळखी बांबू आणून लावला असेल तर त्याची पूर्ण वाढ झाल्याशिवाय तोओळखता येणे अवघड असते. बांबूची जात ओळखायला त्याची फुले, पाने, Culm Sheath, कायांची जाडी, उंची, पेरांचा आकार, रंग, पेरांवरील रोमांची रचना ई. या गोष्टी लागतात. या सर्व बाबींचा विचार करून बांबू ओळखता येतो
आपल्याकडे कुठला बांबू लावता येईल?
महाराष्ट्रात साधारणपणे ८-१० जातींच्या बांबूचीव्यावसायिक तत्वांवर लागवड करता येते. त्यासाठी पावसाळा सोडता ६-८ महीने पाण्याची व्यवस्था, जमिनीचा पोत, पर्जन्यमान, जमिनीवर असलेली इतर झाडे, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि महत्वाचे म्हणजे बांबू विक्रीसाठी आवश्यक असणारी बाजारपेठ (किंवा भविष्यात येऊ घातलेली बाजारपेठ) या सर्व गोष्टींचा विचार होणे अतिशय आवश्यक असते. या शिवाय बांबू लागवड व्यवस्थापनासाठी मजूर लागतातच त्यांची उपलब्धता, हा ही महत्वाचा विषय आहे. या सर्व बाबींबर आपण कुल्या जातीच्या बांबूची लागवड करणार हे रतं.
बांबूला पाणी किती लागतं? बोरवेलच्या पाण्यावर येईल काय?
कुठल्या जातीचा बांबू, कुठल्या वातावरणात, काय उद्देशानेलावला आहे यावर त्या बांबूला किती पाणी लागेल हे रतं. बोरवेलच्या पाण्यावर बांबू ठिबक सिंचन करून नक्कीच लावता येतो.
बांबूचे एकरी उत्पन्न किती येते? लागवड कशी करतात?
बांबूचे एकरी उत्पन्न साधारणपणे रु ४५००० रु १००००० प्रती वर्षं एव्हडे येऊ शकते. यापेक्षा जास्त उत्पन्नसुद्धा घेता येते पण त्यासाठी बांबूचा आणि बांबू व्यापाराचा सखोल अभ्यास लागतो. बांबू लागवड रोपांपासून, किंवा खुंटा पासून करता येते.
किती वर्षांत बांबूचे उत्पन्न येते?
जर योग्य व्यवस्थापन असेल तर साधारणपणे ४-५ वर्षांत उत्पन्न सुरु होऊ शकते. जर पिकाची योग्य काळजी घेतली नाही तर ८-१० वर्षांनी उत्पन्न सुरु होऊ शकते आणि कमी पण येते. ज्या लागवडी BIO-CNG तसेच जैव इंधनासाठी केल्या जातात त्याचं उत्पन्न जर बाजार असेल तर ३ वर्षांत सुरु होते.
बांबू लागवडीला मेहनत काय काय लागते?
खड्डे खोदणे, रोपे लावणे, पाणी देणे, वर्षांतून एकदा किंवा दोनदा वेड्या वाकड्या फांद्या तसेच काठ्या तोडणे, रोपांना तसेच बेटांना दरवर्षी गरजेनुसार मातीची भर घालणे, जैविक आच्छादन करणे, ई.
व्यावसायिक लागवडीसाठी वरील सर्व गोष्टींची योग्य वेळी काळजी घ्यावी लागते.
बांबूला खते कुठली द्यायची असतात? फवारणी कुठली लागते काय?
चांगलं कुजलेलं शेणखत भरपूर प्रमाणात असणे चांगले असते. रासायनिक खतांची गरज ही मातीच्या गुणधर्मांवर अवलंबून असते. बांबूला तशी औषधांची गरज पडत नाही. अगदीच सुरुवातीच्या काळात एखादी बुरशी किंवा पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यावेळी रोगाच्या प्रमाणानुसार योग्य ती फवारणी करावी लागू शकते. अन्यथा एकदा का बांबूचे बेट तयार झाले की कुठल्याही प्रकारची फवारणी लागत नाही.
माकडांचा काही त्रास होतो का?
हो. नवीन आलेले कोंब माकडे खातात.
बांबूच्या फांद्या कापाव्या लागतात का?
हो. दाट आलेल्या तसेच वेड्या वाकड्या फांद्या पानगळी नंतर कापाव्या लागतात.
बांबू लागवडीने जमीन नापीक होते का?
नाही. उलट बांबू लागवडीचे योग्य नियोजन व व्यवस्थापन असल्यास जमिनीचा पोत सुधारतो.
क्षारपड जमिनीमध्ये बांबू लागवड करता येते का?
हो. बाम्बुसा नुतन्स तसेच बाम्बुसा वल्गारीस (हिरवा वल्गारीस बांबू) हे बांबू क्षारपड जमिनीत लागवडीस योग्य आहेत. या तसेच इतरही जातींची प्रायोगिक तत्वावर क्षारपड जमिनीत लागवड होणे गरजेचे आहे.
चांगली काठी कुठल्या बांबूची होते?
आपल्याला नक्की काय उपयोग करायचा आहे यावरच चांगली काठी म्हणजे नक्की काय ते ठरते. सरळ काठी ही मेस, माणगा, टूल्डा या जाती पासून मिळते.
लागवड किती अंतरावर करतात?
कुठल्या जातीचा बांबू काय उद्देशाने निवडलेला आहे यावर लागवडीचे अंतर ठरते. जातीनुसार प्रती एकर २०० ते ३३० बांबू लावणे योग्य राहते. यापेक्षा जास्त दाट लागवड करायची असेल तर व्यवस्थापन फार काटेकोर असणे गरजेचे आहे.
आंतरपीक घेता येईल काय? कुले? किती वर्षं?
लागवडीनंतर पहिले ३ वर्षे पिके घेता येऊ शकतात. पहिल्या वर्षी कुलेही आंतरपीक घेता येते. त्यानंतर मात्र सूर्यप्रकाशाचा विचार करून पीक नियोजन करावे लागते. शेवगा तसेच बहुवार्षिक तूर, पपई, ई . ३-४ वर्षांची पिके योग्य राहतात.
ठिबक सिंचन करावे लागते का? त्यासाठी सबसिडी मिळते का?
बांबू लागवडीला पाणी लागते हे नक्की, ठिबक असेल तर फारच चांगले पीक येऊ शकते. बक सिंचनासाठी कृषी खात्याकडे सबसीडी मिळू शकते.
बेननी करावी लागते का?
होय. लागवडीची पहिली २ वर्षे बेणनी करणे फायद्याचे असते. बेणनी केलेली वनस्पती आपण अच्छादनसाठी वापरू शकतो.
बांबू तोडणी कशी करतात?
साधारणपणे ४-५ वर्षांनी एकदा बांबूचे बेट तयार झाले की, त्यातील ज्या काठ्यांना ३ वर्षे पूर्ण झाली आहेत अशाच काठ्या निवडून तोडाव्यात. त्यासाठी योग्य व्यस्थापन असणे गरजेचे असते.
तोडलेला बांबू सा वून ठेवता येतो काय? कशा प्रकारे?
तोडून ठेवलेला बांबू पाऊस पडेस्तोवर सावलीत रचून ठेवता येतो. तोडलेला बांबू हा कधीही प्रखर सूर्यप्रकाशात किंवा पावसात राहू देऊ नये. मुळात जर बांबू तोडून सा वायचा असेल तर शेतकऱ्याने बांबू तोडूच नये. तसाच बेटात तो एखादा वर्षं उभा राहिला तरी चालेल.
कमीतकमी किती क्षेत्रावर बांबू लावता येईल?
जर शेतकरी स्वतः मेहनत घेणार असेल तर कमीतकमी कितीही क्षेत्रावर बांबू लागवड करता येते. जर मजूर लावणार असेल तर ३ एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड करणे योग्य रते
बांधावर लागवड करता येते का?
होय आणि चांगलं पीक बांधावर येऊ शकते. बांधावर लागवड करताना सूर्यप्रकाशाची दिशा आणि शेतातील अस्तित्वातील पिके यांचा नीट विचार करणे गरजेचे आहे.
बांबू कापल्यावर चिरा पडतात त्या कशा टाळता येतील?
बांबू नीट वाढविला आणि योग्य प्रकारे कापून सुकविला तर बांबूला चिरा जात नाहीत. प्रखर सूर्यप्रकाशात बांबू तडकतो.
लागवडीसाठी किती वर्षांचे रोप घ्यावे?
लागवडीसाठी साधारणपणे १ वर्षाचे रोप असावे. त्या पेक्षा कमी वयाचे रोप घायचे असेल किंवा घ्यावे लागत असेल तर त्या रोपाची लागवडी नंतरची काळजी खूप जास्त प्रमाणात घ्यावी लागते. शक्यतो कमी वयाची रोपे घेणे टाळावे
टिशू कल्चर ची रोपे लावणे गरजेचे आहे का?
काही जातींच्या बाबतीत गरजेचे आहे उदा. बाल्कोवा . टिशू कल्चर चा फायदा असा की रोपे केव्हाही मिळू शकतात, बिया मिळण्याची वाट बघायची गरज नसते आणि मोठ्या प्रमाणात रोपे मिळू शकतात.
रोपे कुठे मिळतील?
महाराष्ट्र बांबू विकास मंडळाने काही टिशू कल्चर प्रयोगशाळा निवडलेल्या आहेत, त्यांच्या कडे रोपे मिळू शकतील. त्यांची माहिती मंडळाच्या वेब साईट वर मिळेल.
रोपे फुलावर येऊन मरतात का?
माणगा, मेस, तसेच बाल्कोवा या जातीत असा प्रकार घडू शकतो.
रोपांचा दर काय असतो?
रोपांचा दर जातींवर, अवलंबून असतो. तसेच रोप कुठल्या पद्धतीने तयार केले आहे यावरही रोपांचा दर रतो
लागवड केल्यावर दर वर्षी उत्पन्न मिळेल काय? किती वर्षं मिळत राहील?
लागवडी नंतर ५ वर्षांनी उत्पन्न मिळायला सुरुवात होते. जैव इंधनासाठी केलेल्या लागवडीला ग्राहक असतील तर ३ वर्षांनीही उत्पन्न सुरु होऊ शकते. त्यापुढे दर वर्षी उत्पन्न घेता येते, परंतु त्यासाठी पिकाचे व्यवस्थापन योग्य असावे लागते.
पाणथळ जागी आणि क्षारपड जागी बांबू येतो का?
पाणथळ जागी येणे अवघड असते. क्षारपड क्षेत्रांवर बांबू येऊ शकतो. वेगवेगळ्या जातींची प्रायोगिक तत्वांवर लागवड होणे गरजेचे आहे.
लागवडीसाठी योग्य जमीन कुली?
पाण्याचा निचरा होणारी, माती असणारी जमीन सर्वोत्तम. बांबू जरी वनस्पती म्हणून कुठेही येत असला तरी पीक म्हणून कुठेही लावता येत नाही. त्याच्या योग्य वाढीसाठी चांगली जमीन, पाणी, वातावरण आणि व्यवस्थापन हे लागतेच.
मोकळ्या पठारांवर जिथे झाडे नाहीत, वारा भरपूर आहे अशा जागी लागवड करता येते का?
अशा जागांवर बांबूच्या वाढीचा वेग कमी असतो. लागवड नक्की करता येते पण बांबूची बेटं तयार होण्यास वेळ लागतो. अशा ठिकाणी आधी वेगाने वाढणारी झाडे लाऊन त्या झाडांच्या आधारे बांबू पीक चांगले येते.
बांबू तोडणी /छाटणी कधी करावी?
थंडीचा काळ सर्वोत्तम. साधारणपणे नोवेंबर ते मार्च हा काळ चांगला.
तोडणीला मजूर किती लागतात?
कुठली जात लावली आहे त्यावर हे रते. तसेच डोंगर उतारांवर लागवड असेल तर मजूर जास्त लागतात.
तीन वर्षानंतर पुन्हा नवीन रोपे लावावी लागतात का?
नाही.
लागवडीचा सुरुवातीचा खर्च किती?
खर्च हा अनेक बाबींवर रतो. जसे की जातींची निवड, जमिनीचा पोत , उतार, रोड पासून चे अंतर, पाण्याच्या स्रोतपासून चे अंतर, मजुरीची पद्धत/दर, ई.
बांबू तोडणीला मजूर कुठे मिळतील?
बांबू तोडणीचे मजूर हे शक्यतोवर व्यापाऱ्याकडे असतात. जर शेतकऱ्याला स्वतः बाजारात विक्री करायची असेल तर तर बांबू एकतर स्वतः तोडून साफ करावे लागतील किंवा स्वतःचे मजूर तयार करावे लागतील.
बांबू लागवडीचे वेळापत्रक काय असते?
पाण्याची उपलब्धता असेल तर थंडीचा काल वगळता बांबू लागवड केव्हाही करता येईल.
महाराष्ट्रातील रोपवाटीकांची यादी मिळेल काय?
ही यादी वेब साईट वर मिळेल.
बांबूला कीड लागते का?
होय बांबूला लहानपणी पणे गुंडाळनाऱ्या अळ्या, तसेच कोंब खाणाऱ्या अळ्या लागतात. पण त्यामुळे पिकाचे मोठे नुकसान होते असे कुठेही आढळून आलेले नाही.
बांबूलाबांडगुळ येते काय?
होय असे बांबू लगेच बेटातून काढून तत्काळ जाळून टाकावेत.
कुठल्या ऋतूत जास्त काळजी घ्यावी लागते?
स्थानिक वातावरणानुसार हे बदलते.
बांबू लागवडी मुळे साप येतात का?
नाही. परंतु जर योग्य व्यवस्थापन नसेल तर आश्रयासाठी साप येऊ शकतात.
बांबूचे काडी कलम करता येते का?
होय. काही जातींचे करता येते.
बांबूला खत किती द्यावे लागते?
हे जमिनीचा पोत आणि निवडलेली जात यावर ठरते. जैवइंधनासाठी जर बांबू लावला असेल तर जास्त प्रमाणात खते द्यावी लागतात.
बांबूला सेंद्रिय खते द्यावीत का?
जर खर्चाचा ताळमेळ बसत असेल तर नक्कीच द्यावी.
बांबू लागवडीची नोंद ७/१२ वर करणे आवश्यक आहे का?
होय.
बांबू लागवडीला वन खात्याची परवानगी लागते का?
नाही.
बांबू लागवडीला लोन मिळते का?
होय.
बांबू लागवडीचे आदर्श प्रयोग कुठे आहेत? ते बघायला मिळतील का?
होय. अशा प्रयोगांची यादी वेब साईट वर आहे.
बांबू या विषयावरील पुस्तके कोठे मिळतील?
INBAR तसेच NBM च्या वेब साईट वर ही पुस्तके मिळतील.
लागवडीमध्ये मर आली तर टी भरण्यासाठी पुढी वर्षी रोपे मिळतील काय?
रोपे कुठून घेतली आहेत त्यावर ते रेल. जर महाराष्ट्र बांबूविकास मंडळाच्या एखाद्या Scheme मधून रोपे घेत असाल तर मरीची रोपे तुम्हाला आधीच मिळतील.
खाण्यासाठी कुठला बांबू वापरतात?
अस्पर हा बांबू खाण्यासाठी सर्वोत्तम समजल्या जातो. तसे महाराष्ट्र बांबूविकास मंडळाने निवडलेल्या सर्वच जाती खाण्या योग्य आहेत परंतु खाण्याआधी त्या कोम्बांवर नीट प्रक्रिया करणे गरजेचे आहे.
बासरीचा बांबू कुठला?
शास्त्रीय पद्धतीने बासरी बनविण्यासाठी लागणारा बांबू महाराष्ट्रात येत नाही. तसे मानवेल तसेच मेस या बांबू पासून स्थानिक लोकं बासरी/पावा बनवितातच.
बांबू पीक म्हणून घेतल्यावर त्याला अच्छादन लागते का? कशाचे आणि कधी करावे ?
होय. बांबू पीक चांगले येण्यासाठी अच्छादन हे अत्यावश्यक आहे. कुठल्याही विघटन होऊ शकणाऱ्या गोष्टीचे अच्छादन करता येते. हिवाळ्या नंतर तसेच पावसानंतर असे दोनदा अच्छादन करणे गरजेचे असते.
डॉ. योगेश वाय. सुमठाणे, (एम. एस्सी. (कृषि) व पीएच.डी.), बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चंद्रपूर, मो.नं. 7588692447
बांबू लागवडीचे महत्त्वपूर्ण पैलू हा लेख आपणास आवडला असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि कंमेटस्‍ करून आपली प्रतिक्रिया नोंदवावी. यानंतर आपणास याव्यतिरिक्त कृषि क्षेत्राशी संबंधित माहिती हवी असल्यास आपण कंमेट्स करून कळवावे. यानंतर आगामी काळात काही दिवसात त्यावर लेख तयार करून वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल.
Prajwal Digital

Leave a Reply