दुग्धजन्य पदार्थ नावीन्यपूर्ण पॅकेजिंग

दुग्धजन्य पदार्थांसाठी नावीन्यपूर्ण पॅकेजिंग सध्याच्या परिस्थितीत देशातील दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यापासून निरनिराळे दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात. मात्र अत्याधुनिक व नावीन्यपूर्ण पॅकेजिंगबद्दल माहिती नसल्यामुळे, हाताळणी व साठवणूकीचा अभाव असल्याचे दिसून येतो.

अशा परिस्थितीत ग्राहकांना चांगल्या गुणवत्तेचे पदार्थ वितरित करणे अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे उत्पादक व ग्राहकांमध्ये विश्वासार्हता टिकून राहते. यासाठीदुग्धजन्य पदार्थ टिकवण्यासाठी पॅकेजिंग महत्त्वाची मानली जाते. दुग्ध उत्पादन पदार्थ टिकविण्यासाठी मदत होते व ग्राहकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्यासाठी पॅकेजिंग हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. बाजारात ब्रॅन्ड तयार करण्यासाठीहीपॅकेजिंग महत्त्वाचे कार्य पार पाडते.

आपल्या देशात दुग्धपदार्थांचे उत्पादन हे लहान स्तरावर जास्त प्रमाणात केले जाते. आरोग्याच्या दृष्टीने हे पदार्थ व्यवस्थित न हाताळलेले व पॅकिंगकडे दुर्लक्ष केलेले असतात हे सर्वज्ञात आहे. अपूर्ण पॅकेजिंग असलेले किंवा पॅकिंग नसलेले पदार्थ हे त्यांच्या गुणधर्मात अनेक बदल दर्शवतात त्यामुळे याचा परिणाम वितरणावर होतो.

उत्तम पॅकेजिंगचा वापर करून दुग्धजन्य पदार्थ जास्तीतजास्त काळ टिकवण्यास मदत होते. पॅकेजिंगसाठी ग्रीस प्रूफ पेपर, व्हेजिटेबल पार्चमेंट पेपर (बटर पेपर), प्लॅस्टिक कोटेड पेपर, पेपर बोर्ड इत्यादी अनेक कागद आणि त्यापासूनच्या पॅकेजिंगचा समावेश होतो. पॅकेजिंगसाठी काचेचादेखील उपयोग होतो. काच रंगीत किंवा रंगहीन असते; परंतु यात प्रकाशामुळे पदार्थ लवकर खराब होतो. सुगंधी दुधासाठी कमी वजनाच्या काचेच्या बाटल्या बाजारात उपलब्धआहेत.

प्लॅस्टिकमध्ये अनेक प्रकारचे प्लॅस्टिक पॅकेजिंग उपलब्ध असून, आधुनिक तंत्राने ते वापरले जाते. प्लॅस्टिक हे वेगळया कागदांबरोबर किंवा वेगवेगळया प्रकारचे प्लॅस्टिक एकत्र करून लॅमिनेट तयार करतात.

1) खवा (Khava)

FSSAI कायद्यानुसार खवा टिकवण्यासाठी कुठलाही पदार्थ वापरण्यास बंदी आहे. यामुळे खवा पॅकिंगला महत्त्व आहे. ॲल्युमिनियम फॉईल आणि एलडीपीई प्रकारच्या पॉलिथिनमध्ये खवा पॅक करून तो 13-15 अंश से. तापमानास ठेवल्यास 14 दिवसांपर्यंत टिकवता येतो.

खवा गरम असताना (90 अंश से.) टिन कॅन्स (लॅकर्ड असलेले म्हणजे कॅन्सचा आतील भाग हा रेझीन किंवा रंझीन ड्रायिंग ऑइल कॉम्लेक्स जे आतून लावून सुकल्यानंतर आत फिल्मसारखे तयार होईल) मध्ये भरल्यास या कॅन्समध्ये खवा14 दिवसांपर्यंत चांगल्या (37 अंश से. तापमान असल्यास) स्थितीत टिकतो.

लॅमिनेट्सचा वापरही खवा पॅकिंगसाठी करतात. दोनपेक्षा जास्त किंवा तीन ते सात थर (वेगवेगळया पॅकेजिंग मटेरिअलचे) मिळून लॅमिनेट्स तयार होत असतात. पेपर / ॲल्युमिनियम फॉईल/ एलडीपीई (लो डेन्सिटी पॅालिइथिलीन) फिल्म अशा प्रकारच्या लॅमिनेमध्ये खवा पॅक केल्यास ते पॅकेट 37 अंश से. तापमानास ठेवल्यास दहा दिवसांपर्यंत, तर हेच पॅकज रेफ्रिजरेटरला ठेवल्यास 60 दिवसांपर्यंत खवा आपले गुणधर्म उत्तम राखेल. पॉलिइथिलीनमध्ये खवा पॅक करून 7+1 अंश से. तापमानास ठेवल्यास टिकवण्याची क्षमता 25 दिवसांपर्यंत असते.

2) बर्फी, पेढा (Barfi, pedha)

बफी गरम अवस्थेत निर्जंतुक केलेल्या पॉलिस्टर टब (150 ग्रॅम) मध्ये भरून मल्टिलेअर नायलॉन पाऊचमध्ये हवाबंद पॅक केल्यास 30 अंश से. तापमानास 52 दिवसांपर्यंत टिकते. यामध्ये हवाबंद पॅकिंग न करता 30 अंश से. तापमानास साठवल्यास बर्फी 16 दिवसांपर्यंत चांगल्या स्थितीत राहते.

सर्वसाधारण पॅकेजमध्ये साधारण तापमानाला पेढा (25-30 अंश से.) दोन आठवड्यांपर्यंत टिकू शकतो. निर्जंतुक केलेल्या श्रिंक रॅपमध्ये तीन आठवड्यांपर्यंत पेढे टिकतात. कार्ड बोर्डमध्ये (आतून पर्ल फिल्म) 5 अंश से. तापमानास पेढे 30 दिवसांपर्यंत टिकवता येतील.

तक्ताक्र. 1 : दुग्धपदार्थांसाठीचे पॅकेजेस प्रकार

.क्रदुग्धपदार्थपॅकेजचा प्रकार
1सुगंधी दूध, लस्सीएलडीपीई, एचडीपीई, टिन कॅन, काचेच्या बाटल्या
2तूप, आटवलेले दूध, दही, श्रीखंडपॉलिप्रोपॅलिन, पॅालिस्टरीन
3पेढा, बर्फी, कलाकंद, चीज, चोकोबारकार्ड बोर्ड बॉक्स, वॅक्स कोटेड पेपर इ.
4गुलाबजामून, रसगुल्ला, तूप, पनीरटिन कॅन, लॅमिनेटेड पाऊच, एचडीपीई इत्यादी.

संदर्भ: डॉ. धीरजकंखरे,सोमनाथ माने, दुग्धप्रक्रियातंत्र, 2017,सकाळ प्रकाशन, पुणे

3) रसगुल्ला, गुलाबजामुन (Rasgulla, Gulabjamun)

दोन्ही पदार्थ बाजारातटिन कॅन्समध्ये मिळतात; परंतु हे कॅन्स आतून लॅकर्ड असायला हवेत. यामुळे अत्रपदार्थ व कॅनचा थेट संपर्क न होता पदार्थ खराब होणार नाही. गुलाबजामुन, रसगुल्ला या प्रकारच्या कॅन्समध्ये साधारण तापमानाला 180 दिवसांपर्यंत टिकतात.

पॅालिस्टरीन कपमध्ये पॅक केलेले गुलाबजामुन 5 अंश तापमानास 30 दिवसांपर्यंत राहू शकतील. रसगुल्ले टिनमध्ये पॅक करताना रसगुल्ला व साखरेच्या पाकाचे प्रमाण 40 : 60 ठेवल्यास व पदार्थ गरम अवस्थेत टिन (निर्जंतुक) मध्ये भरल्यास (पदार्थ तापमान 90 अंश से.) तो सहा महिन्यांपर्यंत अंगभूत गुणधर्म टिकवून ठेवू शकतो. गुलाबजामुन साखरेच्या पाकात सर्वसाधारण तापमानास 5-7 दिवस भरल्यास टिकवण्याच्या क्षमतेत वाढ करता येईल.

4) बासुंदी (Basundi)

बासुंदीची सर्वसाधारणपणे टिकवण्याची क्षमता ही37 अंश से. तापमानास दोन ते तीन दिवस आहे 4 अंश सेंटिग्रेड तापमानास बासुंदी 10-15 दिवसांपर्यंत टिकते. ॲल्युमिनियम फॉईलमध्ये 5 अंश से. तापमानास ठेवलेली बासुंदी 30 दिवसांपर्यंत उत्तम स्थितीत राहील.

काचेच्या बाटलीत किंवा पॉलिप्रोपॅलीन कपमध्ये पॅक केलेली बासुंदी 7 अंश तापमानास 25 दिवसांपर्यंत टिकते. याच प्रकारात पॅकिंग करून 90 अंश से. तापमानास 10 मिनिटे ठेवल्यास टिकण्यासाची क्षमता 15 दिवसांनी वाढवता येईल.

5) श्रीखंड (Shrikhand)

30 अंश सेल्सिअस तापमानाला ठेवलेले श्रीखंड दोन-तीन दिवसांत खराब होते. परंतु रेफ्रिजरेशनला (40 अंश से.) ठेवलेले श्रीखंड 40 दिवसांपर्यंत रंग, चव इत्यादी टिकवून ठेवते. श्रीखंडासाठी पॉलिस्टरीन आणि पॉलिप्रोपॅलिनमध्ये पॅक करून 10 अंश सें. ग्रे. ला. ठेवलेले श्रीखंड 180 दिवसांपर्यंत टिकवता येते.

6) पनीर (Cheese)

साधारण तापमानास (30 + 3 अंश से.) पनीर एक दिवस किंवा त्याहीपेक्षा कमी टिकते. रेफ्रिजरेटर (पाच ते सात अंश सें.) तापमानास पनीर सहा दिवस टिकत असले तरी त्याचा पृष्ठभाग तीन दिवसांनीपिवळा पडण्यास व पनीर थोडे कडक होण्यास सुरुवात होते. हे टाळण्यासाठी पनीर ॲल्युमिनिअम फॅाईलमध्ये पॅक केल्यास रेफ्रिजरेशन तापमानास सहा दिवसांपर्यंत उत्तम स्थितीत टिकते.

स्वच्छ उत्पादनाचे तंत्र वापरून तयार केलेले पनीर बाजारात सहज मिळणाऱ्या क्लिंग फिल्मध्ये पॅक केल्यास ते एक आठवडा ते बारा दिवसांपर्यंत (रेफ्रिजरेशन तापमानाला) चांगले राहते. श्रिंक फिल्मध्ये पॅक केलेले पनीर रेफ्रिजरेटर तापमानाला 16 दिवसांपर्यंत टिकते.

पनीरचे छोटे तुकडे करूनते टीन कॅनमध्ये पॅक करून टिन कॅनना 15 मिनिटांसाठी ऑटोक्लेव्हिंग केले (प्रेशर कुकरसारखे), तर 25-30 अंश से. तापमानास सदर टिन कॅन्समधले पनीर50 दिवसांपर्यंत टिकते. पनीर 5% मिठाच्या द्रावणात बुडवून ठेवल्यास ते6 अंश से. तापमानास 12 दिवसांपर्यंत टिकेल. इव्हीए / इव्हीए / इव्हीडीडीसी / एव्हीए अशा प्रकारच्या चार विशिष्टफिल्मच्या थरामध्ये पॅक केल्यास रेफ्रिजरेशन तापमानाला 90 दिवसांपर्यंत पनीर टिकवता येते.

7) दही (Yogurt)

दह्यासाठी पॉलिस्टरीनचे कप बऱ्याच ठिकाणी वापरतात. पॉलिप्रोपॅलीन, पीव्हीसी यांचाही वापर करता येईल. पॉलिस्टरीन किंवा पॉलिप्रोपॅलिनच्या कपात दहीपॅककरून 5 अंश से. तापमानास फ्रिजला ठेवल्यास, ते सात दिवसांपर्यंत टिकू शकते

8) लस्सी (Lassi)

एलडीपीई (60-80 मायक्रॉन) पाऊचमध्ये पॅकिंग करून 5 अंश से. तापमानास ठेवलेली लस्सी सात दिवसांपर्यंत टिकवता येईल.

दुग्धजन्य पदार्थांसाठी साठवण्यासाठी नावीन्यपूर्ण पॅकेजिंग

पदार्थ टिकवण्यामध्ये पॅकेजिंगचा महत्त्वाचा वाटा आहे. बाजारातील नवनवीन पॅकेजिंग टिरिअल, तसेच नावीन्य, उपयुक्त अशा उपलब्ध पद्धतींचा वापर करून दुग्धपदार्थ टिकवण्याची क्षमता निश्चितच काही दिवस वाढवता येईल. या सर्व नावीन्यपूर्ण बाबी वापरताना, निवडताना दुग्धपदार्थ, त्यातील विविध घटक जसे स्निग्धांश, प्रथिने, आम्लता एकूण घनता(TS) इत्यादीविचारात घ्यावी. नवीन पद्धतींचा वापर केल्यास अन् त्याचबरोबर योग्यते पॅकेजिंग मटेरिअल न निवडल्यास पदार्थ टिकवण्यास, चांगल्या स्थितीत ठेवण्यास अडचणी येतात.

पॅकेजिंगमटेरिअल्स (Packaging materials)

कागद आणि कागदापासून चीवष्टने : यात क्राफट पेपर, ग्रीस पेपर, व्हेजिटेबल पार्चमेंट पेपर (बटर पेपर), व्हॅक्स कोटेड पेपर, प्लॅस्टिक कोटेड पेपर बोर्ड इत्यादींचा समावेश होतो. कार्टन बॉक्स, पिशव्या व कप तयार करण्यासाठी आणि गुंडाळण्यासाठी कागद वारतात.

ग्लास –काच (Glass) : काच पारदर्शक व अपारदर्शक असते. पारदर्शक काचेचे फायदेही आहेत व तोटेही. पारदर्शकतेमुळे पदार्थ दिसू शकतो; परंतु सूर्यप्रकाशामुळे पदार्थ खराबही होऊ शकतो. काचेच्या पॅकिंगमध्ये पदार्थ साठवणुकीचे काम चांगल्याप्रकारे जरी पार पाडत असले, तरी ते जड व वाहतुकीत अडथळा निर्माण करणारे असते.

टीनप्लेट / टीनकॅन्स (Tin plate / tin cans) : यात 0.025 मि. मी. जाडीच्या पत्र्यावर इलेक्ट्रोलइटिंग प्लेटिंग करून शुद्ध टीनचा मुलामाआतून व बाहेरून दिला जातो. सर्वसाधारणपणे टीन कंटेनरची रचना ही प्रथम एम एस प्लेट, नंतर टीन कोटिंग व त्यावर लॅकर अशी असते. टीन हे मजबूत व पदार्थ साठवणुकीसाठी चांगले गुणधर्म असलेले आहे. परंतु, टीन हे वजनास थोडे जड व जास्तकिमतीचे आहे.

ॲल्युमिनिअम फॉईल (Aluminum foil) : अन्न्पदार्थांसाठी वापरल्या जाणाऱ्या फॉईलची जाडी ही 0.012 ते 0.015 मिमी असते. गंजविरोधी म्हणून काही वेळेस याला प्लॅस्टिकचे आवरण देतात. वेष्टने, कार्टन बॉक्स यासाठी याचा उपयोग होतो. लॅमिनेटमध्येही ॲल्युमिनिअमचा वापर होतो.

प्लॅस्टिक (Plastic) : पॅकेजिंगसाठी प्लॅस्टिक हे सर्वांत जास्त वापरले जाते. बॅग, पाऊचेस, लॅमिनेटस इत्यादींमध्ये याचा वापर होतो. सर्वसाधारणपणे पॉलिइथिलीन, पॅालिप्रोपॅलीन, पॅालिस्टरीन, नायलॉन, पॉलिस्टर, पॉलिव्हिनिल क्लोराईड (PVC), पॉलिव्हिडिलीन क्लोराईड (PVDC), सेलोफॅन, सरान, पॉलिइथिलीन टेरापथॅलेट (PET) हे अन्नपदार्थांच्या पॅकेजसाठी वापरतात. या अनेक प्रकारच्या प्लॅस्टिकमध्ये घनता, तणावाचे शक्तिसामर्थ्य, फाटण्याची क्षमता, ऑक्सिजनची प्रवेश क्षमता इत्यादी फरक असतो. या प्रकारच्या क्षमता तपासून घेऊन त्या-त्या प्लॅस्टिकसंबंधी खात्री पटवता येते.

पॅकेजिंगच्या आधुनिक पद्धती (Modern methods of packaging)

1) व्हॅक्युमपॅकिंग (Vacuum packing)

साधारण तापमानास फार कमी काळ टिकणारे दुग्धपदार्थ कुठलेही प्रिझर्व्हेटिव न टाकता व्हॅक्यूम पॅकेजिंगने टिकवण्याच्या क्षमतेत वाढ करता येते. या दद्धतीत चांगल्या प्रकारची प्लॅस्टिक फिल्म ज्याची बाहेरील ऑक्सिजन परावर्तीत करण्याची क्षमता, पाण्याच्या वाफेचा स्थानांतरणाचा दर, दाबाने फुटण्याची क्षमता इत्यादी क्षमता योग्य हव्यात. फुटण्याची क्षमता इत्यादी क्षमता योग्य हव्यात. अशा प्रकारच्या फिल्म किंवा लॅमिनेट्स निवडून घ्याव्यात.

अशा प्रकारच्या निवडलेल्या फिल्ममध्ये दुग्धपदार्थ टाकून तो व्हॅक्यूम पॅक यंत्रामध्ये ठेवावा. या यंत्रामध्ये हवा काढून घेण्यात येते. यामुळे पदार्थ व पॅकेज एकमेकास घट्ट असे चिकटतात. हवा संपूर्णणे काढल्यामुळे सूक्ष्मजीवजंतूंची वाढ थोडयाफार प्रमाणा कमी होते. परंतु, यात वर उल्लेख केल्याप्रमाणे पॅकेज किंवा फिल्म चांगली हवी, यामुळे पदार्थ टिकवण्याच्या क्षमतेत अपोआप वाढ होते.

व्हॅक्यूम पॅकेजिंग यंत्राचे प्रकार (Types of vacuum packaging devices)

बेल्टटाइप कंटिन्यूअसव्हॅक्यूम पॅकिंग यंत्र, काउंटरटॉप व्हॅक्यूम पॅकिंग यंत्र, उभट प्रकारची व्हॅक्यूम पॅकिंग यंत्र, डबल चेंबर, सिंगल चेंबर (ट्रॉलीसह), ब्रिक पॅकिंग (उभट) प्रकारानुसार यंत्राच्या क्षमताही बदलतात. यंत्राच्या किंमती साधारण पन्नास हजार ते दोन-तीन लाखांपर्यंत आहेत. यात वरती झाकण उघडून खोलगट भागात पॅक केलेला पदार्थ ठेवायचा. काही सेकंदांत पॅकेजमधील हवा काढून टाकली जाते. पनीर, खवा, छत्रा, मिठाई इत्यादींसाठी व्हॅक्यूम पॅकिंग चालू शकेल.

1) मॉडिफाइड ॲटमॉसफिअर पॅकेजिंग (Modified Atmosphere Packaging)

या पॅकेजिंगला कंट्रोल ॲटमॉसफिअर पॅकेजिंग (CAP) असेही म्हणतात. यात पॅकेज (पदार्थ असलेले) मधील हवा बाहेर काढून त्याजागी गॅस किंवा गॅसेसचे मिश्रण भरतात. या प्रकारात पदार्थ पॅक केल्यानंतर पॅकेज पदार्थास घट्ट चिकटत नाही. या पॅकेजिंगमध्ये हवेच्या जागी कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, नायट्रोजन हे गॅसेस गरजेनुसार भरले जातात. पनीर किवां पनीरसारख्या पदार्थासह पद्धत वापरतात. यामध्ये (80% नायट्रोजन आणि 20 % कार्बन डायऑक्साईड असे गॅसेसचे प्रमाण) पेढा पॅक केल्यास तो 37 अंश सें. तापमानास 30 दिवसांपर्यंत टिकू शकतो.

वेगळ चव, खासियत असलेले दुग्धपदार्थ, उदाहरणार्थ,कंदी पेढा, बर्फी ( आंबा बर्फी, ऑरेंज बर्फी इत्यादी) अशा तऱ्हेने पॅकिंग करून निर्यात करता येतात. या पॅकेजमध्ये पदार्थ भरल्यानंतर पॅकेजमधील वरच्या भागातील हवा काढून त्याजागी फूड ग्रेड गॅस किंवा गॅसेसचे मिश्रण भरले जाते. या पॅकेजमुळे ऑक्झिडेशन रिॲक्शन आणि जीवजंतू वाढवण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते.

2) ऑक्सिजन ॲबसॉर्बर, स्कॅवेंजर (Oxygen Absorber, Scavenger)

ऑक्सिजन ॲबसॉर्बर, स्कॅवेंजर म्हणजे पदार्थ पॅकेजमध्ये भरल्यानंतर पॅकेजमधील वरच्या भागात (रिकाम्या) असलेला ऑक्सिजन काढून टाकणे किंवा शोधून घेणे होय. यात छोटया पाऊचमध्ये रिडयूस आयर्न, रिॲक्टिवडाय, ॲसकॉर्बिक ॲसिड इत्यादी भरले जातात. हे ॲबसॉर्बर, स्कॅवेंजर आतील अन्नपदार्थांबरोबर एकरूप न होता पदार्थास ऑक्सिजन किंवा हवेतील इतर घटकांपासून होणाऱ्या हानीपासून वाचवते. हे स्कॅवेंजर पदार्थ टिकवताना कमी होणाऱ्या जवनसत्त्व सी, ई आणि अ यांनाही संरक्षण देते.

काही पॅकेज, कंटेनर हे विविध घटकांनी खास बनवतात. यामुळे कंटेनरमधील ऑक्सिजनचे प्रमाण शून्य टक्क्यांपर्यंत (दोन वर्षापर्यंत) राहते. यामुळे ऑक्सिजन शोषून घेण्यासाठी वेगळे असे घटक कंटेनर किंवा बॉटलच्या वरच्या भागात ठेवण्याची गरज नाही.

अशा प्रकारे दुग्धजन्य पदार्थांसाठी नावीन्यपूर्ण पॅकेजिंग तंत्राचा उपयोग करून दुग्धजन्य पदार्थांची चांगल्या प्रकारे साठवणूक व पॅकेजिंग करता येऊ शकतो. त्यामुळे दुग्धोत्पादक तथा दूध प्रक्रिया उद्योगांना दुग्धजन्य पदार्थांसाठी नावीन्यपूर्ण पॅकेजिंगची सखोल व अद्यावत माहिती सुलभपणे देण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे.

सदरील दुग्धजन्य पदार्थ नावीन्यपूर्ण पॅकेजिंग लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकरी, प्रक्रिया उद्योग, डेअरी उत्पादक कंपन्या व इतर घटकांपर्यंत ही माहिती शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर घटकांतील माहिती आपल्यापर्यंत लेखाद्वारे देण्यासाठी लेखकाला प्रेरणा मिळेल.

शब्दांकन: आकाश बानाटे, बी. एस्सी.ॲग्री विद्यार्थी, मांजरा कृषि विज्ञान केंद्र, लातूर

Prajwal Digital

Leave a Reply