PM-Kisan योजना सुरु झाल्यापासून राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक व महत्त्वाचे कार्य करीत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना वेळोवेळी येणाऱ्या आर्थिक निकडीपोटी व अडचणीवर मात करणे शक्य होत आहे. याद्वारे त्यांच्या कुटुंबाला सहा हजार रुपये थेट बँक खात्यात मिळत असल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने (PM-Kisan) अंतर्गत राज्यात आतापर्यंत एक कोटी दोन लाख 31 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 9491 कोटी 38 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. आज अंदाजे 9 कोटी शेतकऱ्यांना रूपये 18000 कोटी थेट बँक खात्यामध्ये हस्तांतरित (जमा) होणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे PM-Kisan योजनेचे पथक प्रमुख विनयकुमार आवटे यांच्या म्हणण्यानुसार, एक डिसेंबर 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीचा प्रत्येक लाभार्थ्याला दोन हजार रूपयांचा सातवा हप्ता देय आहे.
आज पंतप्रधानांच्या हस्ते देशातील अंदाजे 9 कोटी शेतकऱ्यांना रू. 18000 रूपये कोटी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित (जमा) होणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण राष्ट्रीय दूरचित्रवाहिनीवर तसेच ऑनलाईन https://pmindiawebcast.nic.in/ या लिंकवरून होणार आहे.
केंद्र सरकारच्या PM-Kisan पोर्टलवर ‘फार्मर कॉर्नर’ (Farmer Corner) अंतर्गत नवीन लाभार्थ्यांना या योजनेकरिता थेट नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोंदणी करताना शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव, गाव नाव (Village), तालुका (Taluka), जिल्हा (District), राज्य (State), लिंग (स्त्री-पुरूष), प्रवर्ग (जातनिहाय), आधार क्रमांक (UIDE), बँक खाते (Saving Account) व भ्रमणध्वनी क्रमांक (Mobile Number), जन्मतारीख (Date of birth), 7/12 व 8-अ उतारा आदींचा तपशील नोंदवावा लागतो. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना थेट बँक खात्यामध्ये निधी जमा केला जातो.
PM-Kisan या योजनेतून शेतकरी कुटुंबाला प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपये हप्ता याप्रमाणे एका वर्षांत तीन समान हप्त्यांत सहा हजार रुपये मिळतात. महाराष्ट्र राज्यात त्यासाठी अंमलबजावणीचे काम मसूल प्रशासन, कृषी व ग्रामविकास विभागाकडे देण्यात आलेले आहे.
PM-Kisan योजनेत नाव नोंदणीसाठी संपर्क साधावा :
PM-Kisan योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरत असतांना सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी खात्रीशीर अधिकृत सेंटरमध्ये PM-Kisan योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा चालू आहे किंवा योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या काही समस्या असल्यास त्याचे योग्य निराकरण करण्यात येईल.
श्रद्धा आपले सरकार सेवा केंद्र, कोरे गार्डन कॉर्नर, कन्हेरी रोड, लातूर, चक्रधर
खाडप, मो.नं. 9923762134
PM-Kisan योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी https://pmkisan.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन माहिती घेऊ शकतात.
PM-Kisan योजनेत नाव नोंदणी केल्यामुळे होणारे लाभ :
- PM-Kisan योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रूपये मिळतात.
- वर्षांला PM-Kisan योजनेतून सहा हजार रुपये थेट बँक खात्यात जमा होतात.
- शेतकऱ्यांना या पैशातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविता येतो.
- PM-Kisan योजनेचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारची किचकीट प्रक्रिया नाही.
विशेष संदर्भ :
दैनिक ॲग्रोवन, 25 डिसेंबर, 2020, पीएम-किसान चा आज जमा होणार सातवा हप्ता.
इतर कृषी वार्ता :
करोना महामारी पश्चात उद्योजकांसमोरील आव्हाने
कृषी विज्ञान व उद्यानविद्या पदवीसाठी सूचना
महिला आर्थिक विकासात बचत गटाची गरज
रब्बी हंगाम पीक विमा योजना (2020-21)