Month: January 2021

फायदेशीर बायोफ्लॉक तंत्रज्ञान

फायदेशीर बायोफ्लॉक तंत्रज्ञान

सध्‍याच्‍या काळात बायोफ्लॉक तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणावर सक्रिय होत असून मस्‍त्‍य उत्‍पादनासाठी हे तंत्रज्ञान आर्थिकदृष्‍टया किफायतशीर ठरत आहे. त्‍यामुळे हे शेतीला शाश्‍वत उत्‍पादन देणारे महत्‍त्‍वाचे बायोफ्लॉक तंत्रज्ञान आहे.  रुद्रपूर येथे पहिल्यांदाच सुरु असलेल्या उपक्रमात उधमसिंह नगर जिल्हा प्रशासनाने सघन जलचरांना प्रोत्साहन देण्यासाठी बायोफ्लॉक शेती तंत्रज्ञान सादर केले. साडेसात लाख रुपये खर्चून जिल्ह्यात बायोफ्लोक एक्झीबिशन युनिटची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्याचे मुख्य विकास अधिकारी (सीडीओ) हिमांशु खुराना म्हणाले, बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकरी 150 ते 200…
Read More
मशरूम उत्पादन तंत्रज्ञान

मशरूम उत्पादन तंत्रज्ञान

अळिंबी (मशरूम) ही एक बुरशीजन्य हरितद्रव्यरहित वनस्पती असून निसर्गामध्ये अळिंबीच्या अनेक जाती प्रचलित आहे, त्या जातीपैकी काही थोड्या खाण्यायोग्य असून त्यांचीच लागवड करण्यात येते. कृत्रिमरित्या वाढवलेली अळिंबी ही बिनविषारी असल्याने तिची लागवड करून खाण्यासाठी वापरणे धोक्याचे नाही. विपुल जीवनसत्त्वे, भरपूर प्रथिने, उच्च दर्जाची पौष्टिकता आणि विशिष्ट स्वाद यांमुळे मशरूमला भरपूर वाढती मागणी आहे. प्रामुख्याने थंड व आर्द्र हवामानात उत्पादन केल्या जाणाऱ्या मशरूमची लागवड आता इतर भागांतही आवश्यक परिस्थितीची निर्मिती करून केली जात आहे. देशात जवळजवळ…
Read More
शाश्वत विकासात पाणी महत्त्वाचे

शाश्वत विकासात पाणी महत्त्वाचे

- डॉ. पांडुरंग मुंढे, (लोकप्रशासन विभाग प्रमुख) शाश्वत विकास म्हणजे पृथ्वीवरील संसाधनांचा उपयोग करुन आपला विकास करतांना पुढील पिढयांच्या विकासासाठी संसाधनाचा काळजीपूर्वक वापर करणे होय. शाश्वत विकास या शब्दांत नैसर्गिक आणि मानव निर्मित संसाधनाचा कार्यक्षम आणि योग्य वापर करणे अपेक्षीत आहे. जागतिकीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे नैसर्गिक संसाधने आज मोठया प्रमाणात आणि अनियंत्रितपणे वापरली जात आहेत. आपल्या येणाऱ्या पिढयांचा विचार करुन जीमर्यादित संसाधने आहेत, त्यांचा नियंत्रीत वापर शाश्वत विकासात अपेक्षीत आहे. विकास हा मानवी समाजाचा स्थायीभाव आहे.…
Read More
कृषिव्यवसायात ई-कॉमर्सचे महत्त्व

कृषिव्यवसायात ई-कॉमर्सचे महत्त्व

कृषिव्यवसायात ई-कॉमर्सला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून देशात व देशांतर्गत ऑनलाईन प्रणालीद्वारे खरेदी-विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना जास्तीत जास्त प्रमाणात ऑनलाईन खरेदी-विक्री करण्याची आवड निर्माण झाली असून सध्याच्या युगात  ई-कॉमर्स खरेदी-विक्री सर्वोत्तम मानली आहे. सध्या भारतातील ई-कॉमर्स सुमारे दरमहा अंदाजे 20 कोटी रुपये एवढाच आहे. क्रेडिट कार्डच्या वापराने बऱ्याच गोष्टी सवलतीच्या दरात खरेदी करणे शक्य आहे. ई-कॉमर्स म्हणजे इंटरनेटवर व्यापार करणे, त्याला चेहराविरहित व कुंपणविरहित व्यवसायही म्हटले जाते. व्यवसायांशी संबंधित लोकांना…
Read More
कृषी व उद्यानविद्या पदवी प्रकल्प अहवाल सूचना-2021

कृषी व उद्यानविद्या पदवी प्रकल्प अहवाल सूचना-2021

कृषी विज्ञान विद्याशाखा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांनी दि.19/01/2021 रोजी एक पत्र काढून कृषी विज्ञान व उद्यानविद्या पदवी प्रवेश व प्रवर्तन वेळापत्रक सूचना दिल्या आहेत. त्या कृषी विज्ञान पदवी आणि उद्यानविद्या पदवीच्या अंतिम वर्षांत म्हणजेच प्रकल्प अहवालासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. त्यामुळे सदर वेळापत्रकाचे अवलोकन करा. कृषी विज्ञान पदवी आणि उद्यानविद्या पदवी शिक्षणक्रमासाठीच्या प्रकल्प परीक्षा त्याचप्रमाणे संपर्क सत्राचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे. संबंधित विद्यार्थी आणि अभ्यासकेंद्र यांनी याची नोंद घ्यावी. कृषी विज्ञान…
Read More
टोमॅटो प्रक्रिया

टोमॅटो प्रक्रिया

टोमॅटो प्रक्रिया म्हणजेच टोमॅटोच्या गरापासून प्रक्रियेद्वारे निरनिराळे टिकवणक्षम पदार्थ तयार करणे होय. टोमॅटोचा वापर आपल्या दैनंदिन आहारात मोठ्या प्रमाणात केला जातो. टोमॅटोमध्ये विशेष औषधी गुणधर्म असल्याचे अनन्यसाधारण महत्‍व प्राप्त झालेले आहे. टोमॅटो प्रक्रिया टोमॅटोच्या सुधारित जातींचा लालभडक आकर्षक रंग, आकार व चवीमुळे सर्व प्रकारच्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये विशेष मागणी असून नागरी वातावरणातील घरांमध्ये टोमॅटोचा उपयोग तोंडी लावण्यासाठी कोशिंबीर, भाज्‍या, वरणामध्‍ये सर्रास वापर केला जातो. शहरातील हॉटेलमध्ये फ्रेंचफ्राय (बटाट्याचे तळलेले उभे तुकडे), बटाटा चिप्सबरोबर ‘टोमॅटो केचप’ देण्याची रीत आहे.…
Read More
भेंडी लागवड तंत्रज्ञान

भेंडी लागवड तंत्रज्ञान

भेंडी हे महत्त्वाचे व्यापारी भाजीपाला पीक आहे. भेंडीचे उत्पादन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे. मात्र वातावरणात सतत होणाऱ्या अनुकूल वा प्रतिकूल बदलामुळे भेंडी पिकाचे प्रती हेक्टरी उत्पादन व उत्पादकता कमी येत आहे. त्यामुळे भेंडी उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत असते. भेंडी पिकाचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित पद्धतीने भेंडी लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे. याकरिता भेंडीचे सुधारित वाण, सुधारित लागवड पद्धत, बीजप्रक्रिया, सेंद्रिय व रासायनिक खतांची योग्य मात्रा, कीड व रोगांचे एकात्मिक…
Read More
प्लँट लायब्ररी – Plant Library

प्लँट लायब्ररी – Plant Library

प्लँट लायब्ररी (Plant Library) म्हणजे वनस्पति-संग्रहालय – वनस्पत्यालय. ज्याप्रमाणे ग्रंथालय निरनिराळ्या पुस्तकांसाठी, ग्रंथांसाठी असते, त्याचप्रमाणे निरनिराळ्या वनस्पतींसाठी प्लँट लायब्ररी असते. प्लँट लायब्ररी म्हणजे केवळ वनस्पति-संग्रहालय नव्हे तर ते एक खरेखुरे जिवंत प्रदर्शनच म्हणावे लागेल. आपल्या देशातील जवळ जवळ 50 टक्के लोक शहरांत राहत आहेत आणि हे सर्वजण निसर्गाला दुरावले आहेत. निरनिराळ्या वनस्पती हा निसर्गाचा एक अविभाज्य असा महत्त्वाचा घटक आहे. प्लँट लायब्ररीच्या माध्यमातून निसर्ग आणि शहरी माणूस यांच्यात जवळीक निर्माण होऊ शकते. प्रस्तुत प्लँट लायब्ररी…
Read More