कृषी विज्ञान विद्याशाखा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांनी दि.19/01/2021 रोजी एक पत्र काढून कृषी विज्ञान व उद्यानविद्या पदवी प्रवेश व प्रवर्तन वेळापत्रक सूचना दिल्या आहेत. त्या कृषी विज्ञान पदवी आणि उद्यानविद्या पदवीच्या अंतिम वर्षांत म्हणजेच प्रकल्प अहवालासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. त्यामुळे सदर वेळापत्रकाचे अवलोकन करा.
कृषी विज्ञान पदवी आणि उद्यानविद्या पदवी शिक्षणक्रमासाठीच्या प्रकल्प परीक्षा त्याचप्रमाणे संपर्क सत्राचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे. संबंधित विद्यार्थी आणि अभ्यासकेंद्र यांनी याची नोंद घ्यावी.
कृषी विज्ञान पदवी आणि उद्यानविद्या पदवी शिक्षणक्रमांची पुढीलप्रमाणे नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार होईल. त्याच प्रमाणे पदवी प्रकल्प विषयी संपर्कसत्र, स्पायरल प्रकल्प सादरीकरण, तोंडी परीक्षा व अंतिम प्रकल्प सादरीकरण इत्यादी सर्व बाबी सदर वेळापत्रकात नमूद केलेल्या तपशिलानुसार आयोजित करण्यात येतील.
वेळापत्रकनुसार विवरण :
- पदवी प्रकल्प अहवाल सपर्कसत्र तारखा : 24 जानेवारी 2021, 14
फेब्रुवारी 2021, 21 फेब्रुवारी 2021. - विद्यार्थ्यांनी पदवी प्रकल्प अहवाल (स्पायरल कॉपी) अभ्यासकेंद्रावर
सादर करण्याचा कालावधी: (एक प्रतीत ): दिनांक 01 ते 10 में 2021. - अभ्यासकेंद्रानी सर्व विद्यार्थ्याचे प्रकल्प अहवाल
(स्पायरल कॉपी) विदयापीठात सादर करण्याची अंतीम तारीख: दिनांक 15 ते 20 मे 2021. - पदवी प्रकल्प अहवाल मूल्यमापन प्रक्रिया कालावधी : 15 ते 30 जून 2021.
- पदवी प्रकल्प मूल्यमापन आधरित तोड़ी परीक्षा (Viva voce) कालावधी 1 ते 15 जुलै 2021.
- विद्यार्थ्यानी अंतिम पदवी प्रकल्प एक प्रतीत केंद्रावर सादर करण्याचा कालावधी : 15 ते 20 ऑगस्ट 2021.
- केंद्राने सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याचे अंतिम पदवी प्रकल्प विदयापीठास एक प्रतीत सादर करण्याचा कालावधीः 25 ते 30 ऑगस्ट 2021.
सदर माहिती ही विद्यापीठाच्या चालू नोटिफिकेशन आणि कार्यालयीन पत्रानुसार देण्यात येत आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बी. एस्सी. कृषी विज्ञान व उद्यानविद्या पदवी अंतिम वर्षांत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक विद्यापीठाच्या Official Website ला भेट द्यावी.
नोट : सदरील माहिती ही फक्त य.च.म.मु.वि., नाशिक अंतर्गत प्रवेशित अंतिम वर्षांत बी. एस्सी. कृषी विज्ञान व उद्यानविद्या पदवी प्रकल्पाकरिता पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे.
पॉप्युलर लेख