कृषिव्यवसायात ई-कॉमर्सचे महत्त्व

कृषिव्यवसायात ई-कॉमर्सचे महत्त्व

 109 views

कृषिव्यवसायात ई-कॉमर्सला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून देशात व देशांतर्गत ऑनलाईन प्रणालीद्वारे खरेदी-विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना जास्तीत जास्त प्रमाणात ऑनलाईन खरेदी-विक्री करण्याची आवड निर्माण झाली असून सध्याच्या युगात  ई-कॉमर्स खरेदी-विक्री सर्वोत्तम मानली आहे.

सध्या भारतातील ई-कॉमर्स सुमारे दरमहा अंदाजे 20 कोटी रुपये एवढाच आहे. क्रेडिट कार्डच्या वापराने बऱ्याच गोष्टी सवलतीच्या दरात खरेदी करणे
शक्य आहे. ई-कॉमर्स म्हणजे इंटरनेटवर व्यापार करणे, त्याला चेहराविरहित व कुंपणविरहित व्यवसायही म्हटले जाते. व्यवसायांशी संबंधित लोकांना प्रत्यक्ष न भेटता वा संभाषण न करता हा व्यापार माहिती-तंत्रज्ञानाशी बरीच उपकरणे वापरुन करता येते.

ई-कॉमर्स म्हणजे काय?

ई-कॉमर्स म्हणजे ऑनलाईन वस्तू खरेदी-विक्री व्यवहार ई-कॉमर्स होय. हे कच्चा मालाच्या खरेदीपासून तयार उत्पादनास ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत आणि परतावा हाताळण्यापासून सुरु होते. ई-कॉमर्स अतिशय वेगान गतीने वाढत आहे. खरेदी करणे आणि खरेदी करणे यापुढे कोणत्याही एका देशापर्यंत मर्यादित नाही. ई-कॉमर्स हे जागतिक स्तरावर पसरलेले आधुनिक मार्केट आहे. सध्याच्या परिस्थिती ग्राहकांमध्ये ऑनलाईन खरेदी-विक्री करण्याकडे अधिक कल वाढत आहे.  

ई-कॉमर्सचे महत्त्व :

ई-कॉमर्स हे लघुउत्पादनांपासून अगदी मोठ्या ब्रॅण्डपर्यंत, अशा असंख्य कंपन्या आहेत ज्या त्यांच्या स्वत: च्या ई-कॉमर्स वेबसाइटचा फायदा घेऊ शकतात, जिथे ते स्वतःची उत्पादने किंवा सेवा विकू शकतात. आजच्या स्पर्धात्मक युगात आणि सोयीस्कर असणाऱ्या समाजात यापुढे वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांना रस्त्यावर फिरण्याची इच्छा नाही, त्याऐवजी ग्राहकांना स्वत: च्या घरातून खरेदी करायची आवड झाली आहे, जेणेकरून ई-कॉमर्स व्यवसाय आणि खरेदीदार दोघांसाठीही लवचिक उपाय बनला आहे.

ई-कॉमर्सच्या निरंतर विस्तारामुळे वाढती स्पर्धा, खर्च बचती आणि विक्रेत्यांच्या किंमतींच्या वागणुकीत बदल होऊन महागाई काही प्रमाणात कमी करता येऊ शकतो. अगदी स्टार्टअप्सपासून ते लहान आणि मध्यम आकाराच्या व्यवसायापर्यंत मोठ्या ब्रॅण्डपर्यंत, अशा मोठ्या संख्येने कंपन्या आहेत ज्या त्यांच्या स्वत:च्या ऑनलाइन स्टोअरचा फायदा घेऊन उत्पादने ग्राहकांपर्यंत विकू शकतात. त्यामुळे ई-कॉमर्समुळे जलद गतीने खरेदी-विक्री करणे शक्य झाल्यामुळे यात उत्पादक व ग्राहकांना फायदा होत आहे.

ई-कॉमर्सचे प्रकार :

ई-कॉमर्सचे व्यवसाय आणि ग्राहक तसेच व्यवसायातील आपसांतील व ग्राहकांच्या आपसांतील व्यवहारावरुन तीन प्रकार होतात.

 

 

 

 

व्यवसाय 1

B1

 

 व्यवसाय 2

B1

 

 

 

á

ß==========à

â

 

ग्राहक 3

C1

 

 

 

 

ग्राहक 2

C2

 

आकृती 1 : ई-कॉमर्सचे कृषिव्यवसायातील प्रकार

अ) व्यवसाय ते ग्राहक : या पध्दतीमध्ये व्यावसायिक हा ग्राहकांशी थेट संपर्क साधतो, मालाची माहिती देतो, ऑर्डर स्वीकारतो.

आ) व्यवसाय ते व्यवसाय : या पध्दतीमध्ये दोन व अधिक प्रचलित व्यवयाय एकमेकांशी वेबद्वारे संवाद साधतात, या व्यवसायात ग्राहकांचा संबंध येत नाही. व्यावसायिक भागीदार, पुरवठादार, वितरक, वित्त व्यवसायाबारोबर संपर्क साधून व्यवसाय पूर्ण करतात.

इ) ग्राहक ते ग्राहक : इंटरनेटरवर ई-मेल किंवा वेबसाईटद्वारे ग्राहक आपला माल दुसऱ्या ग्राहकाला विकू शकतो.

वरील तीनही प्रकारांची व्याप्ती कृषिव्यवसायातसुध्दा लागू होईल. परंतु येथे आपण व्यवसायाऐवजी उत्पादक असे घटक मानले तर ते तीन प्रकार पुढील प्रमाणे होतील.

 

 

 

 

कृषि-उत्पादक 1

 

कृषि-उत्पादक 2

 

 

 

á

ß==========à

â

 

ग्राहक

2

 

 

 

 

ग्राहक 1

 

आकृती 2 : ई-कॉमर्सचे कृषिव्यवसायातील वर्गीकरण

वरील आकृतीपणे ‘अ’ प्रकारात कृषि-उत्पादक ते ग्राहक हे नेहमीप्रमाणे इंटरनेटद्वारे संज्ञापन होऊ शकते. इंटरनेटमुळे अप्रमाणिक मध्यस्थी करणाऱ्यांचे उच्चाटन होईल. अशाप्रकारात कृषि-उत्पादक ते कृषि-उत्पादक व्यवसायाला एवढी व्याप्ती नाही. कारण कृषिव्यवसायचे स्वरुप वेगळे असते. मात्र कृषिनिविष्ठांच्या उद्योगातून बाहेर पडणाऱ्या मालाच्या व्यावसायिकांचा आ प्रकाराप्रमाणे व्यवसाय इंटरनेटद्वारे वाढण्याची शक्यता जास्त आहे.

इंटरनेद्वारे व्यक्तिगत स्वरुपाची वस्तूंची मागणी तसेच व्यक्तिगत स्वरुपातील वस्तु विकणाऱ्यांची संख्या जास्त आहे. इंटरनेटद्वारे एकमेकांशी लवकर संपर्क साधता येईल आणि एकमेकांना लागणाऱ्या वस्तूंची देवाण-घेवाण होऊ शकेल. ग्राहक ते ग्राहक ई-कॉमर्स प्रणालीत पुन्हा ‘बार्टर सिस्टिम’ ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कृषि निविष्ठांमध्ये बी-बियाणे/रोपांना ‘इ’ प्रकाराद्वारे व्यवसायाची व्यापती जास्त होईल असे दिसते. विशेषत: कृषिसेवा या कार्यांत लागणारी उपकरणे जर भाडयाने पाहिजे असतील तर त्यांचे आदान-प्रदान इंटरनेटद्वारे संदेश पाठवून चटकन करता येईल. इंटरनेटद्वारे एकमेकांच्या शतीची क्रमावली एकमेकांना माहिती होईल आणि कृषिसेवांच्या आदान-प्रदानाचे नवीन दालन उपलब्ध होतील.

Sp-concare-latur

ई-कॉमर्स व्यवसायामुळे होणारे फायदे :

  1. ई-कॉमर्स हे उत्तम विपणन करण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे.
  2. ग्राहकांना अतिशय जलद गतीने ऑनलाईन खरेदी-विक्री करता येतात.
  3. ग्राहकांना उत्तम दर्जाचे व गुणवत्तेचे वस्तूचे आदान-प्रदान करता येते.
  4. ग्राहकांना स्टोअर आणि उत्पादन सूची निर्मिती सुलभपणे पाहता येते.
  5. ऑनलाईन खरेदी-विक्री केल्यामुळे काही प्रमाणात दरात कपात करता येते.
  6. आर्थिक दृष्ट्या परवडणारी जाहिरात आणि विपणन प्रक्रिया आहे.
  7. उत्पादन आणि किंमतींची तुलना करता येते.
  8. खरेदीदार / बाजाराच्या मागण्यांना वेगवान प्रतिसाद मिळतो.

माहिती-तंत्रज्ञानाचे खरे प्रतीक इंटरनेट सुविधा आहे. इंटरनेटद्वारे व्यापार करणे (ई-कॉमर्स), वस्तूंची विक्री करणे, माहितीच्या विशाल साठयाचा उपयोग करुन कृषी किंवा कृषिव्यवसाय वाढविणे आता शक्य झाले आहे. फक्त इंटरनेटचा वापर करण्याचे तंत्र आत्मसात करायला हवे.

Kishor Sasane, Latur, web: www.agrimoderntech.in 

close

Subscribe Now

Please check your email & confirmation completed

Manjara Urnan Nidhi Ltd, Latur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: