फुलांची विक्री व निर्यात

भारत सरकारने फुलशेतीला सूर्योदय उद्योग म्हणून ओळखले आहे आणि त्याला १००% निर्यातभिमुख असा दर्जा दिला आहे. फुलांच्या फळबाग लागवडीच्या मागणीत निरंतर वाढ होत असल्याने कृषी क्षेत्रातील एक महत्त्वाचा व्यावसायिक व्यवसाय झाला आहे. म्हणूनच व्यावसायिक फुलशेती ग्रीन हाऊसच्या अंतर्गत हवामान नियंत्रित हाय-टेक अ‍ॅक्टिव्हिटी म्हणून उदयास आले आहे.

भारतातील फुलशेतीला उच्च वाढीचा उद्योग म्हणून पाहिले जात आहे. निर्यात कोनातून वाणिज्यिक फुलशेती ही महत्त्वाचे होत आहे. औद्योगिक आणि व्यापार धोरणांच्या उदारीकरणामुळे कापलेल्या फुलांचे निर्यातभिमुख उत्पादन वाढीचा मार्ग मोकळा झाला.

नवीन बियाणे धोरणामुळे आंतरराष्ट्रीय वाणांची लागवड करणारी साहित्य आयात करणे शक्य झाले आहे. बहुतेक शेतातील पिकांपेक्षा व्यावसायिक फुलशेतीमध्ये प्रति युनिट क्षेत्रामध्ये अधिक क्षमता असते आणि म्हणूनच हा एक आकर्षक व्यवसाय आहे.

भारतीय फुलशेतीला उद्योग निर्यातीच्या उद्देशाने पारंपारिक फुलांनी कापण्यासाठी फुले कापत आहे. उदारीकरण झालेल्या अर्थव्यवस्थेने भारतीय उद्योजकांना नियंत्रित हवामान परिस्थितीत निर्यातभिमुख फ्लोरीकल्चर युनिट्सची स्थापना करण्यास चालना दिली आहे.

कृषी व प्रक्रियाकृत खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (एपीईडीए), भारतातील फुलशेतीच्या निर्यात संवर्धन आणि विकासासाठी जबाबदार आहे.

फुलांची निर्यात स्थिती :

देशाने जगभरात 16,949.37 (MT) मे. टन फुलशेती उत्पादने निर्यात केली आहेत. 2019-20 मध्ये 541.61 (Crores) कोटी / 75.89 डॉलर्स मिलियन इतके परकीय चलन मिळाले आहे.

मुख्य निर्यात गतव्यस्थाने (2019-20): यू एस ए, नेदरलँड, जर्मनी, यू के, आणि यू अरब ईएमटी हे याच काळात भारतीय फ्लोरीकल्चरचे प्रमुख आयात करणारे देश होते.

फुलांची विक्री प्रक्रिया

आपल्याकडे सर्वसामान्यपणे गुलाब, झेंडू, ॲस्टर, मोगरा, जाई-जुई, लिली इत्यादी फुलांची विक्री खालील पद्धतीने केली जाते.

उत्पादक घाऊक विक्री दलाल किरकोळ विक्रेता ग्राहक

ताजी फुले शेतकऱ्यांकडून किंवा उत्पादकांकडून घाऊक विक्रेते विकत घेतात. त्यानंतर घाऊक विक्रेते किरकोळ विक्रेत्यांना ही फुले विकतात. नंतर किरकोळ विक्रेते ग्राहकांना फुले विकतात. ह्याशिवाय उत्पादक त्यांची फुले सरळ किरकोळ विक्रेत्याला किंवा ग्राहकांना विकतात. त्यामुळे मधील सर्व दलालांची दलाली वाचून शेतकऱ्यांना अधिक आर्थिक फायदा होतो.

भारतात आधुनिक फुलांपेक्षा पारंपरिक फुलांचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. भारतात फुलांची विक्री प्रामुख्याने विक्री दलाल, ठोक विक्रेते आणि किरकोळ व्यापाऱ्यांकडून होत असते. काही भागांत फुलांचे ठेकेदार फुलांची तोडणी होण्यापूर्वीच शेतकऱ्यांशी फुले खरेदीचा सौदा करतात आणि शेतकऱ्यांना आगाऊ पैसे देतात.

बहुतेक ठिकाणी शेतकरी आपला माल डोक्यावर, सायकल, मोटारसायकल, बस, ट्रक किंवा रेल्वेने दलालाकडे पाठवितात. काही ठिकाणी दलाल शेतकऱ्यांना आगाऊ पैसेही देतात. ठोक व्यापारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून अथवा दलालांकडून फुलांची खरेदी करतात आणि किरकोळ व्यापाऱ्यांना थोड्या प्रमाणात फुले विकतात.

दलालांवर विक्रीतील नफा-तोट्याची जबाबदारी नसते. परंतु ठोक व्यापारी स्वतःच मालाची खरेदी करत असल्याने बाजारभावाच्या चढउताराप्रमाणे त्यांना नफा अथवा नुकसान सहन करावे लागते. किरकोळ व्यापारी प्रत्यक्ष ग्राहकांना फुले विकतात. गुच्छ, हार, वेण्या बनवून ते विकतात.

किरकोळ व्यापाऱ्यांची स्वतःची दुकाने असतात किंवा रस्त्यालगत उघड्यावर आपला माल मांडून ते विक्री करतात. फिरते किरकोळ विक्रेते गल्लीत, घरोघरी फिरून आपला माल विकतात.

आधुनिक फुलांच्या विक्रीची पद्धत यापेक्षा वेगळी आहे. मुंबईसारख्या शहरात शेतकऱ्यांच्या फुलांची विक्री दलाल करतात. ठोक व किरकोळ व्यापारी दलालांकडून अथवा शेतकऱ्यांकडून फुलांची खरेदी करतात आणि ग्राहकांना विकतात.

आधुनिक फुलांची खरेदी पंचतारांकित हॉटेल्स, व्यापारी कार्यालये तसेच शासकीय कार्यालये करतात. अनेक श्रीमंत लोक गृहसजावटीसाठी किंवा भेट देण्यासाठी फुले विकत घेतात. ही विक्री किरकोळ व्यापारी करतात. त्यांची आलिशान वस्तीमध्ये किंवा मुख्य रस्त्यावर वातानुकूलित दुकाने असतात. या दुकानांत आकर्षक पद्धतीने फुले मांडतात. या दुकानांत गुलाब, ग्लॅडिओलस, शेवंती, अॅस्टर, जरबेरा, लिली, डेझी, इत्यादी फुले हंगामाप्रमाणे विकतात.

फुलांचे काही किरकोळ विक्रेते दुकान भाड्याने न घेता रस्त्याच्या बाजूला उघड्यावर
प्लास्टिकच्या बादलीत विक्रीसाठी फुले मांडून ठेवतात. ह्या किरकोळ विक्रेत्यांकडून
दांडीसह फुले
, फुलांचे गुच्छ विकत मिळतात. त्यांचा खर्च कमी असल्याने फ्लोरिस्टपेक्षा कमी भावात ते विक्री करतात. पण त्यांची फुले उघड्यावर मांडलेली असल्याने लवकर सुकतात.

फुलांची निर्यात (Export of flowers)

फुलांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात भारताचा वाटा अतिशय कमी आहे. फुलांची भारतातून निर्यात ‍कमी प्रमाणात होत असून यामध्ये लांब दांड्याची फुले, शोभिवंत झाडे, फुलझाडे, पाने, कंद व कॅक्टस यांचा समावेश आहे.

या निर्यातीमध्ये लांब दांड्याच्या फुलांच्या निर्यातीपासून अंदाजे 50% परकीय चलन मिळाले. आज आपण 25 कोटी रुपयांची लांब दांड्याची फुले निर्यात करत असून त्यात मुख्य वाटा हरितगृहातील गुलाब फुलांचाच आहे. असे असले तरी स्थानिक बाजारातही फुलांची मागणी फार मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

भारतातून फुलांची निर्यात कमी प्रमाणात होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत :

(1) फुलांची प्रत कमी असणे : आंतरराष्ट्रीय बाजारपठेत निरनिराळ्या फुलांच्या गुणवत्तेची मानके ठरविलेली आहेत. अनेकदा भारतीय उत्पादकांची फुले योग्य गुणवत्तेची नसल्यामुळे परदेशी अथवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये स्वीकारली जात नाहीत.

(2) फुले तोडल्यानंतर त्यांची योग्य काळजी न घेणे : फुलांची काढणी केल्यानंतर त्यांची योग्य प्रकारे हाताळणी करणे, त्यांचे पूर्वशीतीकरण करणे, पॅकिंग करणे, इत्यादी गोष्टी आवश्यक असतात. काढणीनंतर फुले निष्काळजीपणे हाताळल्यास त्यांची प्रत खराब होते. अशा प्रतीची फुले परदेशी बाजारपेठेत स्वीकारली जात नाहीत.

(3) फुलांचे उत्पादक लहान शेतकरी : भारतातील अनेक फूल उत्पादक हे लहान शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना परदेशी बाजारपेठेतील फुलांच्या विक्रीची व्यवस्था, तेथील गुणवत्तेची मानके आणि इतर आवश्यक बाबींची माहिती नसते. उच्च प्रतीच्या फुलांचे उत्पादन करण्यासाठी आवश्यक असलेले भांडवल आणि ज्ञान यांची या लहान शेतकऱ्यांना माहिती नसते. त्यामुळे शेतकरी आपली फुले स्थानिक बाजारपेठेत पाठविणे पसंत करतात.

फुलांच्या बाबतीत निरनिराळ्या देशांत ग्राहकांची आवड भिन्न असते आणि ही आवड सतत बदलत असते. उदाहरणार्थ, अमेरिकेत गुलाबाच्या फुलांच्या विक्रीमध्ये तब्बल 85% फुले मोठ्या आकाराची आणि हायब्रीड प्रकारातील होती. त्याच्या दुप्पट लहान आकाराच्या गुलाबाच्या फुलांची विक्री नेदरलँडमध्ये झाली.

अमेरिकेतील ग्राहक लांब दांड्याची, मोठ्या आकाराची आणि लाल रंगाची गुलाबाची फुले अधिक पसंत करतात; तर नेदरलँड या देशात गुलाबी रंगाच्या गुलाबांना जास्त प्रमाणात मागणी आहे. तर ब्रिटिश लोकांना कार्नेशन आणि डच लोकांना शेवंतीची फुले आवडतात.

निर्यात करावयाच्या फुलांमध्ये पुढील गुणधर्म असावेत :

  1. फुले ताजी, टवटवीत आणि आकर्षक असावीत.
  2. फुले रोग आणि किडींपासून मुक्त असावीत.
  3. फुले रोगनाशक आणि कीडनाशक रासायनिक औषधांच्या अवशेषांपासून मुक्त असावीत.
  4. फुले खरचटलेली किंवा इतर जखमांपासून मुक्त असावीत.
  5. फुलांच्या वाढीमध्ये विकृती नसावी.

वरील निकषांमध्ये न उतरलेल्या फुलांचा समावेश दुसऱ्या वर्गात होतो. भारतात बहुधा फुलांचे उत्पादन उघड्या शेतात होते. त्यामुळे परदेशी बाजारपेठेसाठी उच्च प्रतीच्या फुलांचे उत्पादन करणे कठीण असते. परदेशात फुलांचे उत्पादन नियंत्रित वातावरणात (पॉलिथीनगृहात) केले जाते.

फुलांच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याला उत्पादनाचा दर्जा उत्कृष्ट राखावा लागतो. फुलांचे उत्पादन सुनियोजित असले पाहिजे. फुलांच्या निर्यातीबाबत योग्य धोरण आखले पाहिजे. चांगल्या दर्जाची फुले मिळविण्याकरिता ती काचघर वा पॉलिथीनच्या घरात वाढविली पाहिजेत. त्यांच्या गुणवत्तेवर सतत लक्ष ठेवले पाहिजे. त्याकरिता उच्च तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे.

फुलांच्या निर्यातवाढीकरिता करावयाच्या उपाययोजना

भारतातून फुलांची निर्यात वाढविण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे :

  1. फुलांची आयात करणाऱ्या देशांत मागणी असणाऱ्या विशिष्ट फुलांचे उत्पादन करणे.
  2. फुलांची आयात करणाऱ्या देशांमध्ये ज्या काळात फुलांचे उत्पादन होऊ शकत नाही किंवा अतिशय कमी प्रमाणात होते त्या काळात त्या देशाला फुले निर्यात करणे.
  3. फुलांच्या निर्यात व्यापारात सरकारचा मोठा सहभाग असला पाहिजे.
  4. फुलांची आयात करणाऱ्या देशातील गुणवत्तेच्या मानकांनुसार फुलांची प्रत राखणे.
  5. लहान शेतकऱ्यांसाठी पूर्वशीतीकरण, शीतकक्ष, वाहतूक यांच्या सोयी उपलब्ध करून देणे.
  6. फुलोत्पादनासाठी नियमित भांडवलाचा पुरवठा होणे आणि वाहतुकीच्या दरात सवलत मिळणे आवश्यक आहे.
  7. निर्यातदार व उत्पादक यांच्या संघटना तयार करणे.
  8. फुल-उत्पादकांना निर्यातीकरिता प्रोत्साहन देणे.

याकरिता सर्वसाधारण फुल उत्पादक शेतकऱ्यांना हरितगृह तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, त्यात कोणती फुले लावावीत, त्यांचे संगोपन कसे करावे, फुले कशी काढावीत, हाताळावीत आणि साठवावीत यासाठी राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्रात प्राथमिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाच्या मदतीने संबंधित कृषी महाविद्यालयात प्रक्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेण्यात येणार असून फुल-उत्पादकांना ते निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना निरनिराळ्या फुलांची विक्री करणे, फुलांची निर्यात करणे सुलभ होईल.

विशेष संदर्भ :

  1. फुलांची काढणी, हाताळणी व प्रांगण उद्यान : पाठ्यपुस्तिका – 1 : 68-77
  2. कृषि दैनंदिनी : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
  3. ई-बुक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
  4. https://ycmou.ac.in/ebooks
  5. http://agriexchange.apeda.gov.in/product_profile/prodintro/Floriculture.aspx

फुलशेती इतर लेख

गुलाब प्रक्रिया

गुलाबग्लॅडिओलस व कार्नेशन फुलांची हाताळणी

झेंडू उत्पादन तंत्रज्ञान

फुलांची काढणी व्यवस्थापन

फुलांची परिपक्वता

फुलांची प्रतवारी करण्याचे व्यापारी तत्त्वे

फुले परिपक्व करण्याच्या पद्धती

फुलांचे पॅकिंग व वाहतूक व्यवस्थापन

Prajwal Digital

Leave a Reply