टोमॅटो प्रक्रिया म्हणजेच टोमॅटोच्या गरापासून प्रक्रियेद्वारे निरनिराळे टिकवणक्षम पदार्थ तयार करणे होय. टोमॅटोचा वापर आपल्या दैनंदिन आहारात मोठ्या प्रमाणात केला जातो. टोमॅटोमध्ये विशेष औषधी गुणधर्म असल्याचे अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे.
टोमॅटोच्या सुधारित जातींचा लालभडक आकर्षक रंग, आकार व चवीमुळे सर्व प्रकारच्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये विशेष मागणी असून नागरी वातावरणातील घरांमध्ये टोमॅटोचा उपयोग तोंडी लावण्यासाठी कोशिंबीर, भाज्या, वरणामध्ये सर्रास वापर केला जातो. शहरातील हॉटेलमध्ये फ्रेंचफ्राय (बटाट्याचे तळलेले उभे तुकडे), बटाटा चिप्सबरोबर ‘टोमॅटो केचप’ देण्याची रीत आहे.
टोमॅटोपासून पेस्ट (प्यूरी) टोमॅटो सूप, केचप, ज्यूस, टोमॅटोपुरी व लोणचे इत्यादी पदार्थ तयार करतात. आपणास माहिती आहे की, टोमॅटो ही भाजी नसून गर असलेले फळ आहे. टोमॅटोचा वापर आपण विविध प्रकारे करतो, कधी आपण तो कच्चा खातो तर कधी एखाद्या पदार्थात वापरतो किंवा टोमॅटोचे वेगवेगळे प्रकार करून जसे की टोमॅटो सॉस, टोमॅटो ज्यूस, टोमॅटो पेस्ट, टोमॅटो सूप किंवा केचप, तर काही वेळा डब्यात साठवलेले टोमॅटो वापरतो तर कधी सन ड्राइड टोमॅटोचा वापर करतात.
100 ग्रॅम टोमॅटोच्या खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण (टक्के)
अ.क्र. |
अन्नघटक |
प्रमाण (%) |
अन्नघटक |
प्रमाण (%) |
1. |
पाणी |
93 |
कार्बोहायड्रेट्स |
3.6 |
2. |
प्रोटीन्स |
1.9 |
फॅट्स |
0.1 |
3. |
खनिजे |
0.6 |
तंतुमय पदार्थ |
0.7 |
4. |
पोटॅशियम |
0.1 |
सोडियम |
0.05 |
5. |
सल्फर |
0.02 |
क्लोरिन |
0.04 |
6. |
कॅल्शियम |
0.02 |
मॅग्नेशियम |
0.02 |
7. |
फॉस्फरस |
0.04 |
लोह |
0.002 |
8. |
जीवनसत्व ‘अ’ |
320 I.U. |
रिबोफ्लेवीन |
0.01 |
9. |
जीवनसत्व ‘क’ |
0.03 |
– |
– |
(स्त्रोत: भाजीपाल्याचे व्यापारी उत्पादन भाग–एक: पाठ्यपुस्तिका–1, पृ.क्र. 3)
टोमॅटो प्रक्रियायुक्त पदार्थ
टोमॅटो पासून निरनिराळे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात. त्यांपैकी काही निवडक टोमॅटो प्रक्रिया क्त पदार्थ म्हणजेच टोमॅटो चटणी, टोमॅटो गोड चटणी, टोमॅटो सॉस (केचप), टोमॅटो रस, टोमॅटो लाल ड्रिंक (सरबत) इ. पदार्थ तयार करता येतात. याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात येत आहे.
1) टोमॅटो चटणी
साहित्य
: टोमॅटो पाव किलो, लसूण 10–12 पाकळ्या, आलं 1 तुकडा, विनेगर 2–3 छोटे चमचे, मीठ चवीनुसार, हिरव्या मिरच्या 7–8, जिरं 1 चमचा, मोहरी 1–2 चमचा, तेल थोडं, लाल तिखट 1 चमचा, हळद–थोडी इ. पदार्थ घ्यावे.
कृती : टोमॅटो धुऊन पुसून बारीक फोडी करा. (मग 4/5 लसून पाकळ्या, 1–2 इंच आलं, 2/3 हिरवी मिरची, 1–2 चमचा जिरे सर्व जाडसर कुटून घेणे.) बाकी उरलेले लसूण, आलं, हिरव्या मिरचीचे छोटे तुकडे करणे (लसूण, पाकळी मोठी असेल तर 2 तुकडे, नाही तर पूर्ण लसून ठेवणे.) कढईत तेल गरम झाले की जिरे, मोहरी घालणे. त्यात कुटलेला मसाला घालणे, थोडे परतणे लगेच टोमॅटोच्या फोडी घालणे. थोडी हळद, तिखट, विनेगर व लसूण आलं, मिरचीचे तुकडे घालणे, मीठ घालणे व चांगले शिजले की बाऊलमध्ये काढून ठेवणे. ही चटणी पराठा व ब्रेडबरोबर खूपच रुचकर लागते.
2) टोमॅटो गोड चटणी
साहित्य : टोमॅटो पाव किलो, लसूण 10–12 पाकळ्या, आलं 1 तुकडा, विनेगर 250 ते 300 मि.ली, मीठ चवीनुसार, जिरं 1 चमचा, मोहरी 1–2 चमचा, तेल थोडं, हळद–थोडी व साखर 1 किलो इ. साहित्य घ्यावे.
कृती : टोमॅटो धुऊन पुसून बारीक फोडी करावे. (मग 4/5 लसून पाकळ्या, 1–2 इंच आलं, 2/3 हिरवी मिरची, 1–2 चमचा जिरे सर्व जाडसर कुटून घेणे.) बाकी उरलेले लसूण, आलं, (लसूण, पाकळी मोठी असेल तर 2 तुकडे, नाही तर पूर्ण लसून ठेवणे.) कढईत तेल गरम झाले की जिरे, मोहरी घालणे. त्यात कुटलेला मसाला घालणे, थोडे परतणे लगेच टोमॅटोच्या फोडी घालणे. थोडी हळद, तिखट, विनेगर व लसूण आलं, साखर, मीठ घालणे व चांगले शिजले की बाऊलमध्ये काढून ठेवणे. तयार होणारी टोमॅटो गोड चटणी ही पराटा व ब्रेडबरोबर खूपच रुचकर लागते.
3) टोमॅटो सॉस (केचप)
साहित्य : दोन किलो टोमॅटो, एक मोठा कांदा, एक लसणाचा गड्डा, आल्याचा एक मोठा तुकडा, पाव किलो साखर, एक टेबलस्पून लाल मिर्च्यांचे तिखट, एक चमचा गरम मसाला, एक चमचा ॲसिटिक ॲसिड, एक चमचा सोडियम बेंझोएट (प्रिझर्वेटिव्ह) इ.
कृती : सॉस बनवण्यासाठी पातळ सालीचे पूर्ण पिकलेले पण टणक असलेले लाल बुंद टोमॅटो हवेत. टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यावेत व चिरून त्यांच्या फोडी करून ठेवा. कांदा, लसूण व आले मिक्सरच्या ग्राइंडर मध्ये फिरवून घेऊन त्यांची पेस्ट बनवा. टोमॅटोच्या चिरलेल्या फोडी व मिक्सरवर वाटून घेतलेली कांदा–लसूण व आल्याची पेस्ट त्यात घालून ते पातेले गॅसवर ठेऊन टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवा. शिजून टोमटोला पाणी सुटायला लागेल त्यामुळे वेगळे पानी घालायची जरूरी होणार नाही,अगदी आवश्यक असेल तरच थोडेसे पाणी घाला. शिजलेले टोमॅटो पुरण यंत्रातून गाळून त्यांची प्यूरी बनवून घ्या. ही प्यूरी नंतर मिक्सरच्या ग्राइंडरमधून वाटून एकसंघ बनवून घ्या.
नंतर या टोमॅटो प्यूरीत साखर घालून एकीकडे चमच्याने एकसारखे ढवळत राहून प्यूरी शिजवून एक तृतीयांश होईपर्यंत आटवा. एका बशीत चमचाभर प्यूरी काढून बशी थोडी तिरकी करा, जर प्यूरितून पाणी बाहेर आले तर प्यूरी अजून थोडी आटवा,जर प्युरीतून पाणी बाहेर आले नाही तर समजा की सॉस तयार झाले आहे. आता त्यात उरलेली साखर,मीठ,लाल तिखट,गरम मसाला घालून 4 ते 5 मिनिटे शिजवून घेऊन गॅस बंद करा. आता या वाटीत थोडेसे सॉस काढून घेऊन त्यात ॲसिटिक ॲसिड व सोडियम बौंझाइट मिक्स करा व हे सॉस मग उर्वरित सॉसमध्ये घालून चांगले एकजीव होईल असे मिक्स करा व ताबडतोब बाटलीत भरून सीलबंद करा. या टोमॅटो सॉस मध्ये कांदा,लसूण,आले,लाल तिखट आणि गरम मसाला यांचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार ठरवावे.
4) टोमॅटो रस
साहित्य : स्वच्छ धुतलेले पक्व लाल निरोगी टोमॅटो घ्या. 1 मि. मी. ची गाळणी, 100 ग्रॅम मीठ (10 किलो टोमॅटो रसासाठी) व 100 ग्रॅम साखर इ. साहित्य घ्यावे.
कृती : 10 किलो टोमॅटोचे लहान लहान तुकडे करून. स्टीलच्या पातेल्यात 5 ते 6 मिनिटे ढवळून खाली काढून पुरणयंत्रात गाळून घ्यावे. टोमॅटोच्या गरामध्ये साखर टाकून ते चांगले विरघळल्यास, निर्जंतुक बाटल्यात भरा. उकळत्या पाण्यात 2 ते 3 मिनिटे बाटल्या ठेवाव्यात. त्यावर क्राऊन झाकणे सील बंद करा. नंतर 30 मिनिटे उकळत्या पाण्यात बाटल्या ठेवा. पाश्चरीकरण करून खाली काढावे. थंड झाल्यावर कोरड्या जागेवर ठेवा.
5) टोमॅटो लाल ड्रिंक (सरबत)
साहित्य : पक्व लाल टोमॅटो, साखर, मीठ व लिंबू इ. साहित्य घ्यावे.
कृती : टोमॅटोची साल काढून आतील गराच्या फोडी करा, थोड्या पाण्यात क्रश करा. हे मिश्रण 5 ते 10 मिनिट गरम करून घ्या. नंतर ते गाळून घ्या. त्यात एकपट साखर + चवीपुरते मीठ, मिरेपूड किंवा जिरेपूड टाकून सर्व्ह करा. त्यानंतर टोमॅटो लाल डि्ंक (सरबत) तयार होईल.
अशाप्रकारे आपण टोमॅटो प्रक्रिया या लेखामध्ये टोमॅटो प्रक्रिया म्हणजेच काय हे जाण्न घेतले असून टोमॅटोचे दैनंदिन आहारात महत्त्व स्पष्ट केले आहे. टोमॅटोमध्ये विशेष औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. टोमॅटो पासून टोमॅटो चटणी, टोमॅटो गोड चटणी, टोमॅटो सॉस (केचप), टोमॅटो रस, टोमॅटो लाल ड्रिंक (सरबत) इ. पदार्थ तयार करता येतात. अशा पदार्थांना बाजारात विशेष मागणी आहे. त्यामुळे टोमॅटोवर प्रक्रिया करून निरनिराळे पदार्थ तयार केल्यास त्यापासून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नफा कमावता येतो. त्यामुळे टोमॅटो प्रक्रिया उद्योग उभारणी काळाची गरज झालेली आहे.
टोमॅटो प्रक्रिया फायदे
- टोमॅटोपासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उत्तम गुणवत्तेचे पदार्थ निर्मिती करता येते.
- ग्राहकांना उत्तम दर्जाचे प्रक्रियायुक्त पदार्थ उपभोगण्यास मिळतील.
- बाजारात टोमॅटो पदार्थांना चांगली मागणी वाढण्यास मदत होईल.
- टोमॅटो प्रक्रिया उद्योगामुळे ग्रामीण व शहरी भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
विशेष संदर्भ :
- https://mr.wikipedia.org/wiki/
- https://www.marathisrushti.com/articles/recharge-health-with-tomato/
- https://www.loksatta.com/lokprabha/recipe-2-1127584/
शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर
अन्नप्रक्रिया उद्योग : अडथळे व उपाय
कृषीमाल प्रक्रिया उद्योग : व्याप्ती व महत्त्व
फळांपासून वाईन निर्मिती उद्योग : गरज आणि समस्या
फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योगाची गरज
सोयाबीन प्रक्रिया उद्योग काळाची गरज
सोयाबीन प्रक्रिया प्रकल्पाचे नियोजन
हळदीवर प्रक्रिया करण्याची सुधारित पध्दत
टोमॅटो प्रक्रिया हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.