बांबू रोपवन व लागवड

बांबू रोपवन व लागवड करणे ही आजच्या येणाऱ्या काळाची महत्वाची गरज बनलेली आहे. शेतातील पारंपारिक पिकावर येणारे नैसर्गिक संकट व सततची नापिकी यामुळे शेतकरी वर्ग हैरान झालेला आहे. यामध्ये एक महत्वाचे असे की, वेळेवर मजुरसुद्धा उपलब्ध होत नाहीत. या सर्व बाबींचा विचार केला तर आजच्या काळात बांबू सारखा खंबीर व उत्कृष्ट पीक दुसरे नाही व शासनाच्या धोरणानुसार उद्योगधंद्यासाठी लागणार कच्चा माल बांबू खरेदीची शासनाने हमी दिली आहे.

बांबू शेती करण्याच्या तीन प्रमुख पद्धती :

1. चांगल्या शेतामध्ये सलग लागवड,

2. शेताच्या घुऱ्याने अथवा नदी व नालाकाठ, व बांधावर.

पडीत जमीन, ज्या ठिकाणी ईतर पीक घेणे शक्य नाही, अश्या ठिकाणी बांबूची लागवड करता येईल.

बांबू लागवड क्षेत्र :

बांबूची लागवड दोन क्षेत्रामध्ये करता येईल.

१) ज्या ठिकाणी भरपूर व मुबलक पाणी आहे.

२) ज्या ठिकाणी कमी प्रमाणात पाणी आहे.

पाणी भरपुर व मुबलक प्रमाणात आहे अशा ठिकाणी १) कटांग बांबू (Bambusaa bambos), २) भिमा बांबू (Bambusa balcooa), ३) कनकेच (Bambusaa affinis) व मांडगा (P.Stocksii.) या प्रजातीच्या बांबूची लागवड करणे योग्य राहील. ज्या ठिकाणी कमी प्रमाणात पाणी आहे अशा ठिकाणी मानवेल (साधा बांबू) (Dendrocalamus strictus) याची लागवड करणे उत्तम राहिल.

मातीचा प्रकार :

रेती मिश्रित गाळाची माती तर फार उत्तम, जर नसेल तर ईतर जमिनीतसुद्धा येऊ शकतो.

लागवडीचे अंतर :

लागवडीचे अंतर हे प्रत्येक बांबूच्या प्रजातीवर अवलंबून आहे. मोठे वाढणारे बेड (रांझी) यासाठी 05 मी X 05 मी अंतर अंदाजे 16.25 फुट. सरळ व उंच वाढणाऱ्या प्रजाती करिता 04 X 04 मी किंवा 03 X 03 मी.

खड्डे :

उत्तम व चांगल्या जमिनीच्या शेतामध्ये खड़े 30 से.मी. X 30 सेंमी. X 30 सेंमी. व हलक्या जमिनीमध्ये 45 सेंमी. X 45 सेंमी. X 45 सेंमी. या आकारमानाचे खड्डे खोदावे.

खत :

बांबूला शेणखत मिळाले तर फार उत्तम, नाही तर कंपोस्ट खताचा सुद्धा वापर करता येईल. बांबू लागवडीच्या वेळेस खड्ड्यामध्ये अर्धी माती व अर्धा शेणखत याप्रमाणात उपयोग करावा.

पाणी :

आवश्यकतेनुसार व उपलब्धतेनुसार दयावा.

लागवड :

पाणी उपलब्ध असल्यास जून महिन्याच्या सुरुवातीला करावी, नाहीतर पाऊस पडल्यानंतर करणे योग्य आहे.

पटे :

शक्यतोवर बियांपासून तयार केलेले रोपटे लावावे. (रायझोम जाड व मोठे असणे आवश्यक)

संरक्षण :

लागवड केलेल्या क्षेत्रास जंगली जनावरांपासून सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. त्याकरीता साधा काटेरी कुंपण करता येईल. मात्र ३ वर्षानंतर कुंपनाची गरज नाही.

आंतरपिके

बांबू लागवडीनंतर दोन वर्षांपर्यंत आंतरपिके घेणे शक्य आहे. मात्र तिसऱ्या वर्षी पीक घेता येणार नाही.

उत्पन्न :

पाच वर्षानंतर उत्पन्न मिळणे सुरु होईल. प्रजातीनुसार व बियांचे चक्रानुसार सतत उत्पन्न मिळेल. सुरवातीचे पाच वर्ष वगळुन 30,35,40 वर्ष सतत उत्पन्न मिळेल.

डॉ. सुमठाणे योगेश वाय. (पीएच. डी. कृषि, एम. बी. ए., डी. एम. & एफ.), Bamboo Research and Technology Centre, MFD, मो. नं. 7588692447

Prajwal Digital

Leave a Reply