कोरफड उत्पादन तंत्रज्ञान

कोरफड उत्पादन तंत्रज्ञान

 159 views

कोरफड ही बहुवर्षीय वनस्पती असून तिला खोड नसते. तिची पाने जाड, सरळ व मांसल असून 8 ते 10 सेंमी. रुंद व 45 ते 60 सेंमी. लांब असतात. कोरफडीचे शास्त्रीय नाव अलोव वेरा (Aloe-vera) असून ती वाळवंटी व कमी पावसाच्या प्रदेशात आढळते. या वनस्पतीत औषधी गुणधर्म असून संस्कृतात तिला कुमारी म्हणतात.

कोरफड या वनस्पतीचे उगमस्थान पूर्व व दक्षिण अफ्रिका आहे. याशिवाय ग्रीस, इटली, सायप्रस तसेच भारतात कोरफड सर्वत्र आढळते.

प्रस्तुत कोरफड उत्पादन तंत्रज्ञान या लेखाच्या मदतीने आपल्याला कोरफड या पिकाचे व्यापारी दृष्ट्या महत्त्व समजेल. त्याचे औषधी उपयोग माहिती होतील. कोरफड पिकाची लागवडीसाठी हवामान व जमीन, हंगाम, बियाण्याचे प्रमाण आणि लागवड पद्धती, खत व पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, काढणी व उत्पादन आदी घटकांची माहिती या लेखात देण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे.  

कोरफड महत्त्व :

कोरफडीचा रस काढून त्याचा उपयोग औषधांमध्ये आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. कोरफडीचा रस कफ, पित्त यांचे दोष घालवितो, तसेच यकृतदोषांवर तो उपयोगी आहे.

भारतात राजस्थान, आंध्र प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यात मोठ्या प्रमाणात कोरफडीची लागवड होते. याच्या उत्पादनाबाबत सांख्यिकीय माहिती फारशी उपलब्ध नाही. मात्र कोरफडीचे दर्जेदार उत्पादन भारतातील विविध राज्यात घेतले जात आहे.  

हवामान व जमीन

कोरफड या वनस्पतीला उष्ण, दमट व कोरडे हवामान मानवते. हे पीक कमी पावसाच्या प्रदेशातसुद्धा चांगले येते. या पिकास जास्त थंडी व धुके मानवत नाही. हे पीक 8.5 सामू असलेल्या जमिनीत चांगले येऊ शकते.

हंगाम, बियाण्याचे प्रमाण आणि लागवड पद्धती

कोरफडीची लागवड झुडपाला फुटलेल्या मुनव्यापासून (सकर्स) करतात. मोठे झालेले रोप व लांब मुळ्यांचे 15 सेंमी. लांबीचे तुकडे लागवडीसाठी वापरता येतात. पावसाळा सुरू झाल्यावर कोरफडीची लागवड सरी-वरंबे किंवा सपाट वाफ्यात 60 X 45 सेंमी. अंतरावर करावी. जमिनीला उभी-आडवी नांगरणी करून कुळवून घ्यावी. जमिनीत चांगले कुजलेले 10-15 टन शेणखत घालावे. आणि 60-75 सेंमी. अंतरावर सरी-वरंब्यात लागवड करावी. पिकाच्या वाढीच्या काळात एक-दोन खुरपण्या कराव्यात. गरजेनुसार पाणी दिल्यास पिकाची वाढ चांगली होते. या पिकाचे उत्पादन 2 ते 5 वर्षांपर्यंत घेता येते.

खत व पाणी व्यवस्थापन

कोरफड : लागवडीच्या वेळी प्रति हेक्टरी 20 किलो नत्र, 20 किलो स्फुरद व 20 किलो पालाशाची मात्रा द्यावी.

आंतरमशागत

शेतात नियमित खुरपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. या पिकांत आंतरपीक घेता येत नाही. शेताच्या कडेला किंवा फळबागेच्या कडेला ही पिके घेता येऊ शकतात.

काढणी व उत्पादन

पूर्ण वाढ झालेल्या पानांची कापणी लागवडीनंतर दोन वर्षांनी सतत 4-5 वर्षे करता येते. वर्षाला हेक्टरी सरासरी 40 ते 60 टन पाने मिळतात.

अशाप्रकारे आपणास कोरफड उत्पादन तंत्रज्ञान या लेखात कोरफड हे औषधी महत्त्व असलेली पीक आहे. कोरफड उष्ण, दमट व कोरड्या हवामानात चांगल्या प्रकारे घेता येतात. कोरफडीची लागवड झुडपाला फुटलेल्या मुनव्यांपासून लागवड करतात. कोरफडीस लागवडीच्या वेळी हेक्टरी 20 : 20 : 20 किलो नत्र, स्फुरद पालाश द्यावे. कोरफडीची पाने वाळलेली फळे वापरतात. कोरफडीच्या पानांचे वर्षाला हेक्टरी सरासरी 40 – 60 टन पाने एवढे उत्पादन मिळते. याबद्दलची विशेष माहिती मिळाली आहे.

Sp-concare-latur

विशेष संदर्भ :

  1. भाजीपाल्याचे व्यापारी उत्पादन भाग-1, य.च.म.मु.वि., नाशिक
  2. https://www.agrowon.com
  3. https://ycmou.digitaluniversity.ac/

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर तथा वेबसाईट ॲडमीन.

कोरफड उत्पादन तंत्रज्ञान हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

close

Subscribe Now

Please check your email & confirmation completed

Manjara Urnan Nidhi Ltd, Latur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: