शेतकरी आत्महत्या

प्रस्तुत कविता ही “शेतकरी आत्महत्या” या दु:खद घटना वा प्रसंगावर आधारित असून याद्वारे आत्महत्या पीडित शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयाची व्यथा मांडण्याचा प्रयत्न कवयित्रीने केलेला आहे.

काळ आमचं रान होतं

हिरवंगार शिवार होतं

बाप आमचा खुश होता

सारी दुनिया जगवत होता

असेच दिवस सरत गेले

पाऊस आमच्यावर नाराज होता

आई आमची रडत होती

रडतच भाकरी भाजत होती

एका भाकरीत चौघे जेवलो

काळ रात्र सरत होती

दुसऱ्या दिवशी खोलीत गेलो

खोलीत गेल्यावर पंख्याकडं बघितलं

बाप आमचा लटकत होता

काय करणार रडत बसलो

दुसऱ्या दिवशी सांत्वन झालं

तिसऱ्या दिवशी टीव्हीवर झळकलो

मंत्री दारात उभा होता

माझी वाट बघत होता

चेक दिला, सही केली

बापाची तोवर राख झाली होती

आईचं सौभाग्य हरपलं होतं

बापानी आम्हाला पोरकं केलं होतं

आश्वासनांचा पाऊस पडतच होता

त्यानं बाप आमचा आम्हाला मिळणारच नव्हता

एके दिवशी ढगालाच विचारलं

का रे ! बाबा असं केलंस?

तेव्हा तो म्हणाला, काळघाताने आम्हालाच

निरुत्तर केलं होतं

–  बालकवयित्री : श्रुती गालफाडे (काव्यश्रुती)

शेतकरी आत्महत्या ही कविता आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे.

Prajwal Digital

Leave a Reply