Month: April 2021

पशुखाद्य निर्मिती : समस्या व उपाय

पशुखाद्य निर्मिती : समस्या व उपाय

आजही दुग्ध व्यवसायात दुधाच्या प्रतीनुसार भाव या संकल्पनेचा वापर होत नाही. दिवसेंदिवस दुधाच्या भेसळीचे प्रमाण वाढत जात आहे. शेतकऱ्याने दूध उत्पादित केल्यानंतर पुढील सर्व पातळ्यांवर दुधात जास्तीत जास्त अवैध प्रमाणात भेसळ होऊन शेवटी ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे, भेसळयुक्त दूध पोहोचत आहे. यासाठी दूध गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरण झाल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. दुग्ध व्यवसायामध्ये चारा आणि पशुखाद्याच्या नियोजनाचा अभाव हा सर्वात मोठा प्रश्न शेतकरी बांधव व पशुपालकांना सतत भेडसावत आहे. शेतकरी आणि शासनाला जास्त…
Read More
दूध उत्पादनासाठी हिरव्या चाऱ्याची गरज

दूध उत्पादनासाठी हिरव्या चाऱ्याची गरज

दूध उत्पादन खर्चापैकी 70 टक्के खर्च हा आहारावर होत असतो. वाढीव दूध उत्पन्नासाठी जनावरांना योग्य आहार देणे फार महत्त्वाचे आहे. पशु आहारामध्ये हिरवा चारा, सुका चारा व पशु आहार यांचा समतोल साधणे आवश्यक असते. जमिनीचा पोत घसरत चालल्याने जो काही हिरवा चारा जनावरांसाठी आज आपण उपलब्ध करतो, त्यातील महत्त्वाच्या अन्नघटकांचे प्रमाणही कमी होत चालले आहे. म्हणून वाढीव दूध उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी स्पर्धात्मक दिवसांत असा व्यवसाय परवडणे कठीण जाऊ शकते. जनावरांच्या पोटाची रचना ही चारा पचवण्यासाठी…
Read More
बांबू लागवड संक्षिप्त माहिती

बांबू लागवड संक्षिप्त माहिती

बांबू हे भारतातील व्यापारीदृष्ट्या लागवड केलेल्या पिकांपैकी एक आहे आणि त्यास ‘गरीब माणसाचे लाकूड’ देखील मानले जाते. चीननंतर भारत जगात बांबू उत्पादनात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. देशात वार्षिक बांबूचे उत्पादन अंदाजे 3.23 दशलक्ष टन्स एवढे आहे. आशियामध्ये बांबू हा संस्कृतीतला सर्वात समाकलित भाग आहे आणि जंगलाचा पर्याय म्हणून वापरला जातो. बांबू हे मुख्यतः बांधकाम साहित्य, फर्निचर, लगदा आणि प्लायवुड म्हणून वापरले जाते. बांबूच्या चांगल्या स्त्रोतांचा आशीर्वाद मिळवण्याचा भारताचा भाग्य आहे. शिवाय बांबूच्या फळाचे आहार म्हणून…
Read More
आले उत्पादन तंत्रज्ञान

आले उत्पादन तंत्रज्ञान

आले उत्पादन घेण्यासाठी कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या सुधारित वाणांची लागवडीसाठी निवड करणे गरजेचे आहे. तसेच आले लागवडीच्या पद्धती, बेण्याची निवड, आंतरमशागत, पाणी व खत व्यवस्थापन, कीड-रोग व्यवस्थापन, काढणीपश्चात्त तंत्रज्ञान इत्यादी विशेष बाबींचा विचार करून आले उत्पादन घेतल्यास निश्चित उत्पादन वाढविणे शक्य होते. अलीकडच्या काळात हवामानात सतत होणारे अनुकूल वा प्रतिकूल बदल यामुळे आले पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला असून पिकांवर विपरित परिणाम होऊन उत्पादनात घट आलेली आहे.  यामुळे भाजीपाला उत्पादक विशेषत: आले लागवड करणाऱ्या…
Read More
बटाटा लागवडीची पूर्व तयारी

बटाटा लागवडीची पूर्व तयारी

बटाटा हे जमिनीत पोसणारे कंदमुळ वर्गातील पीक आहे. महाराष्ट्रात बटाट्याची लागवड साधारणपणे १५,००० हेक्टर क्षेत्रात होत असून त्यापासून अंदाजे ७५,७०० टन उत्पादन निघते. रबी हंगामामध्ये हेक्टरी ५० क्विंटल तर खरीपामध्ये हेक्टरी ४० क्विंटल असे उत्पादनाचे प्रमाण पडते. महाराष्ट्रात बहुतांशी पुणे, सांगली, सातारा, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड या  जिल्ह्यात बटाट्याची लागवड केली जाते. चांगल्या प्रतिच्या बेण्याचा अभाव, लहरी पर्जन्यमान, तापमानातील चढ उतार, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, काढणीपश्चात्त सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव, या कारणास्तव महाराष्ट्रातील…
Read More
बीटरूट उत्पादन तंत्रज्ञान

बीटरूट उत्पादन तंत्रज्ञान

बीटरूट हे महत्त्वाचे व्यापारी पीक आहे. बीटरूट या पिकाची उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. भारतात मोठ्या शहरांच्या आसपासच्या भागात बीटरूटची लागवड केली जाते. शहरी भागातील मोठ्या हॉटेलांमध्ये बीटरूटची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे बीटरूटच्या लागवडीला भरपूर वाव आहे. बीटरूट उत्पादन तंत्रज्ञान या लेखाद्वारे आपणास बीटरूटचे महत्त्व व उपयोग, बीटरूटच्या व्यापारी लागवडीचे तंत्र,  बीटरूटवरील किडी आणि रोगांचे नियंत्रण करता येईल. तसेच बीटरूट उत्पादन तंत्रज्ञानाबद्दल सखोल व अद्यावत माहिती या लेखात आपणास मिळणार आहे. त्यामुळे…
Read More
बांबूवरील रासायनिक पद्धती

बांबूवरील रासायनिक पद्धती

बांबूमध्ये विषाक्तता फार कमी प्रमाणात असते त्यामुळे तो किड्यांचे किंवा बुरशीच्या आक्रमणास लवकर बळी पडतो. रासायनिक प्रक्रिया केल्यामुळे कीडा किंवा बुरशीला आकर्षित करणारी पिष्टमय पदार्थ, साखर नष्ट होते.  उत्तम प्रक्रिया झालेल्या बांबूचे आयुष्य ५० वर्षापर्यंत वाढते. त्यातील रचनात्मक गुणधर्म कमी होत नाहीत. ताज्या कापलेल्या बांबूवर प्रक्रिया करणे सोपे असते कारण त्यातील आर्द्रतेमुळे प्रक्रियेदरम्यान रासायनिक पदार्थाच्या वाहतूकीला मार्ग मिळतो. तसेच बांबूचे दोन्ही टोक प्रक्रियेपूर्वी का बंद पडलेले मार्ग मोकळे होतात. बांबूवर रासायनिक प्रक्रियेची आवश्यकता बांबूचे वरचे…
Read More