बांबूवरील रासायनिक पद्धती

बांबूमध्ये विषाक्तता फार कमी प्रमाणात असते त्यामुळे तो किड्यांचे किंवा बुरशीच्या आक्रमणास लवकर बळी पडतो.

रासायनिक प्रक्रिया केल्यामुळे कीडा किंवा बुरशीला आकर्षित करणारी पिष्टमय पदार्थ, साखर नष्ट होते. 

उत्तम प्रक्रिया झालेल्या बांबूचे आयुष्य ५० वर्षापर्यंत वाढते. त्यातील रचनात्मक गुणधर्म कमी होत नाहीत.

ताज्या कापलेल्या बांबूवर प्रक्रिया करणे सोपे असते कारण त्यातील आर्द्रतेमुळे प्रक्रियेदरम्यान रासायनिक पदार्थाच्या वाहतूकीला मार्ग मिळतो. तसेच बांबूचे दोन्ही टोक प्रक्रियेपूर्वी का बंद पडलेले मार्ग मोकळे होतात.

बांबूवर रासायनिक प्रक्रियेची आवश्यकता

बांबूचे वरचे कवच हीच त्याची सुरक्षा आहे. जोपर्यंत हे कवच सुरक्षित आहे तो पर्यंत त्याला कोणताही किडा लागत नाही, उधई लागत नाही, बांबू खराब व कमकुवत होत नाही.

हे टाळण्याकरिता बांबूवर प्रक्रिया करण्याची पद्धत फार पूर्वीपासून वापरण्यात येते.  पूर्वीच्या काळात जेव्हा विज्ञानाची प्रगती झाली नव्हती त्यावेळी भारतामध्ये बांबूची तोड शुक्ल पक्षात न करता कृष्णपक्षात करण्यात येत आहे. कृष्ण पद्धत बांबूमधील साखरेचे प्रमाण कमी होते व त्यामुळे या काळात तोडलेल्या बांबूला कीड लागत नाही अशी धारणा आहे.

कधी पारंपारिक पद्धतीमध्ये बांबूला धूर देण्याची पद्धत आहे. पूर्वीचे काळात स्वयंपाकघराचे छतावरील बांबूला चूलीच्या धूरामुळे प्रक्रिया होऊन आवरण तयार होत असे व त्यामुळे तो बांबू वर्षांनुवर्षे टिकत असे. नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये बांबूचे बंडल बांधून १ महिन्याकरिता ठेवण्यात येतात. त्यामुळे बांबूचे आतील साखर बाहेर पडते व बांबूला कीड (Borer) लागत नाही.

आधुनिक वैज्ञानिक प्रगती झाल्यानंतर रासायनिक मिश्रणाव्दारे बांबूवर प्रक्रिया करण्यात येते.

साधारणत: पूर्वी बांबू किंवा त्यांच्या वस्तू टिकाऊ होण्याच्या दृष्टीने जी प्रक्रिया केली जात होती. त्याला मर्यादा होत्या, तसेच त्याबद्दलचे तंत्रज्ञान विकसीत झालेले नव्हते. त्यामुळे मोठया प्रमाणात वापर करायचा असेल तर बांबूवर प्रक्रिया करावयास बराच कालावधी लागायचा.

त्यामानाने आता प्रगत तंत्रज्ञानात VPI (Vacuum Pressures Impregnation), दाब निर्वात पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी मशीन तयार करण्यात आली आहे. त्याचा वापर करून आपण कमी वेळात जास्त संख्येत बांबू प्रक्रिया करू शकतो. यात Copper Chrome Boran व Boric Borax या रसायनाद्वारे प्रक्रिया केली जाते.

मोठया टाकीमध्ये Boric Acid (H3B2O7) & Borax (Na2,B3O7, 10H2O) टाकून (५% ते ७% द्रावण) त्यात बांब आवश्यकते प्रमाणे ४ ते ८ दिवस भिजवून ठेवण्यात येतात.

Boric Acid & Borax चे मिश्रण बांबचे आतील भागापर्यंत जाऊन तेथील साखर बाहेर निघते व त्यामुळे बांबूला किडा (Borer) किंवा उधई लागत नाही.

Shock Wave Treatment Plant : यात बांबू एका बंद टाकीमध्ये टाकून त्याला पुन्हा पुन्हा दाब देऊन झटके देण्यात येतात, त्याद्वारे प्रक्रिया करण्यात येते.

CC.B.प्रक्रिया : यात दोन प्रकार आहेत.

बाजारात रेडीमेड C.C.B. (Copper-Chrome-Boran) चे द्रावण पेस्ट फार्म मध्ये मिळते, ते ५% ते ७% द्रावण करून मशिनच्या (V.P.I) खालील टाकीत टाकतात. नंतर मुख्य प्रक्रिया टाकी मध्ये प्रक्रिया करावयाचा बांबू (प्रत्येक पेरावर छिद्र केलेला) भरून झाकण लावतात.

नंतर प्रक्रिया टाकीपंपाने निर्वात करण्यात येते. त्यामुळे खालचा टाकीतील द्रावण मुख्य टाकीमध्ये जाते. टाकी पूर्ण भरल्यावर (टाकीचे वरील काचेच्या इंडीकेटर मध्ये ३/४ चे वर भाग द्रावण भरल्याचे दिसल्यावर) प्रेशर पंप ब्दारे १२० ते १३0 RS.1 पर्यंत दाब दोन ते अडीच तास देण्यात येतो.

या प्रक्रीयेमुळे बांबूचे आतील पेशीमध्ये C.C.B. द्रावण दाबाने सोडल्या जाते. व त्यातील साखर (Surerose) बाहेर पडते. या प्रक्रिये नंतर बांबूला कीड लागत नाही बतो सहज ३० ते ४० वर्ष टिकतो.

मुख्य प्रक्रिया टाकीत साधारणतः ४ ते ५ इंच व्यासाचे २० फटलांब ७० ते ८० बांबू वर ते २.५ इंच व्यासाचे १८० ते २०० बांबूचे ट्रिटमेंट होते.

C.C.B. द्रावण C.C.B. पेस्टफॉर्म द्रावण १०० kg खालील वजनाप्रमाणे तयार करतात.

रसायनI.S.I. प्रमाणेN.M.B.A. प्रमाणे
बोरिक ॲसिड१५.५ की१५ की
सोडियम/पोटॅशियम डायक्रोमेट४४.५ की४० की
कॉपर सल्फेट३३.५ की३० की

वरील प्रक्रिया C.C.B. या द्रावणाऐवजी B.B. (बोरिक ॲसिड व बोरॅक्स) 2 टक्के चे द्रावण वापरून वरील प्रमाणे प्रक्रिया करतात. व नंतर ट्रीटमेंट झालेले बांबू साध्या पाण्याने धुतात.

टीप :

CCB. ट्रिटमेंट झालेले बांबू ओळखण्यासाठी बांबूचा बुडाच्या कापावरील फायबर  साधारणत: लालसर दिसतात.

VPI मशीनच्या मुख्य प्रक्रिया टाकी १२ फुट व२२ फुट अश्या दोन प्रकारात बाजारात उपलब्ध आहेत.

बांबूवर प्रक्रिया करण्याकरिता घ्यावयाच्या रासायनिक मिश्रणाचे प्रमाण खालील प्रमाणे वापरण्यात येते.

मिश्रणरासायनिक द्रव्यवजनाचे प्रमाणसंकेतिक नाव
क्रिओजोट द्रवकोलतार क्रिओजेट५० भागCCF
 जळाऊ तेल५० भाग 
 उधईचा प्रकोप तीव्र झाल्यास  
 डाइ एल्ड्रिन  
कॉपरक्रोम ऑर्सेनिकमोरचूद (CuSO45H2O)3 भागCCA
 सोडियम/पोटॅशियम डायक्रोमेट4 भाग 
 आर्सेनिक पेंटॉक्साइड1 भाग 
ॲसिड कॉपर क्रोममोरचूद50 भागACC
 सोडियम डायक्रोमेट47.5 भाग 
 क्रोमिक ॲसिड1.68 भाग 
कॉपर-क्रोम-बोरॉनमोरचूद6 भागCCB
 सोडियम/पोटॅशियम डायक्रोमेट8 भाग 
 बोरिक ॲसिड (H3BO3)3 भाग 
बोरिक बोरॅक्सबोरिक ॲसिड (H3BO3)1 भागBB
 बोरॅक्स (Na2B4O7, 10H2O)1.54 भाग 

डॉ. योगेश वाय. सुमठाणे, (एम. एस्सी. (कृषि) व पीएच.डी.), बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चंद्रपूर, मो.नं. 7588692447

बांबूवरील रासायनिक पद्धती हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe करून लाईक करावे, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे.

Prajwal Digital

Leave a Reply