दूध उत्पादनासाठी हिरव्या चाऱ्याची गरज

दूध उत्पादन खर्चापैकी 70 टक्के खर्च हा आहारावर होत असतो. वाढीव दूध उत्पन्नासाठी जनावरांना योग्य आहार देणे फार महत्त्वाचे आहे. पशु आहारामध्ये हिरवा चारा, सुका चारा व पशु आहार यांचा समतोल साधणे आवश्यक असते.

जमिनीचा पोत घसरत चालल्याने जो काही हिरवा चारा जनावरांसाठी आज आपण उपलब्ध करतो, त्यातील महत्त्वाच्या अन्नघटकांचे प्रमाणही कमी होत चालले आहे. म्हणून वाढीव दूध उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी स्पर्धात्मक दिवसांत असा व्यवसाय परवडणे कठीण जाऊ शकते. जनावरांच्या पोटाची रचना ही चारा पचवण्यासाठी जास्त सक्षम असते. त्यामुळे जनावरांना सकस हिरवा चारा देणे गरजेचे आहे.

दर्जेदार दूध उत्पादनासाठी हिरव्या चाऱ्याची गरज आज अत्यंत महत्त्वाची वाटत आहे. आपण जर हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेचा विचार केला, तर अंदाजे 1097 दशलक्ष टन इतक्या चाऱ्याची आवश्यकता असून प्रत्यक्षात मात्र 400.6 दशलक्ष टन इतकाच हिरवा चारा जनावरांना उपलब्ध होत आहे, 696 दशलक्ष टन म्हणजे 63% हिरव्या चाऱ्याची मागणी अजूनही पुरवली जात नाही.

असे असताना प्रति जनावर उत्पादन वाढीचे ध्येय कसे साध्य होणार हा एक यक्षप्रश्न आहे. शिवाय आज वाढीव लोकसंख्येमुळे उपलब्ध शेतजमिनीवर अन्नधान्य उत्पादनाचा मोठा ताण वाढ आहे. त्यामुळे जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध करून देण्यावर आणखी मर्यादा येत आहेत.

सन 2021 पर्यंत हीच हिरव्या चाऱ्याची मागणी 1234 दशलक्ष टनांवर पोहोचेल असा अंदाज आहे. कमी जागेत हिरव्या चाऱ्याचे जास्त उत्पादन घेण्याचा पर्याय शोधणे महत्त्वाचे आहे. आजच्या परिस्थितीत हायड्रोपोनिक पद्धतीने चारा उत्पादन करणे हे एक चांगले नियोजन होऊ शकेल.

प्रती हेक्टर जागेमध्ये जेवढ्या चाऱ्याचे उत्पादन होते, तेवढेच उत्पादन आपण हायड्रोपोनिक पद्धत वापरून 50 स्क्वेअर मीटरमध्ये घेऊ शकतो म्हणजे या पद्धतीने 200 पट कमी जमीन लागते. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाणही कमी होत असल्याने चारा उत्पादनावर मर्यादा येत आहेत. हायड्रोपोनिक चारा उत्पादनास पारंपरिक चारा उत्पादनापेक्षा 40 पट कमी पाणी लागते, श्रमही कमी लागतात आणि चाराही चांगल्या गुणवत्तेचा तयार होता.

दूध उत्पादनासाठी हिरव्या चाऱ्याची गरज

 • जनावरांच्या आहारात हिरव्या चाऱ्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपणास माहीत आहे की, जनावराचे पोट हे चार कप्प्यांचे बनलेले असते व ते चारा अगदी चांगल्या पद्धतीने पचविते.
 • सुरूवातीस म्हणजे 30 ते 40 वर्षांपूर्वी जो चारा आपल्या शेतात उत्पादित केला जात होता त्यामध्ये जे वाण वापरले जात होते व त्या मातीमध्ये जी ताकद होती ती आता राहिली नाही.
 • आपण जनावरांना दिलेला चाराच एवढा पौष्टिक होता, अगदी कमी पशुखाद्यात सुद्धा जनावरे चांगली दूध देत होती व त्यांचे आरोग्य सुद्धा चांगले व सुदृढ राहायचे.
 • आपण सद्यःस्थितीचा विचार केला तर आपल्या जमिनीत पाणी व रासायनिक खतांचा एवढा प्रचंड वापर झाला आहे की, त्यामुळे जमिनीत सुपीकता राहिलेली नाही. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा फार कमी झाली आहे. परिणामी पीक उत्पादनात घट येत आहे.
 • चारा उत्पादनासाठी वाण वापरताना जर आपण जास्तीत जास्त भर त्या पिकाच्या उत्पादकतेवर दिला आणि गुणवत्तेवर भर दिला नाही तर याचा परिणाम नंतर जनावराच्या उत्पादकतेवर होऊ लागतो.
 • जनावरांची उत्पादकता टिकून राहण्यासाठी आपण पशुखाद्याची मदत घेतली; पण पशुखाद्याचा खर्च न परवडणारा आहे. त्यामुळे जर फायदेशीर दुग्धव्यवसाय करावयाचा असेल तर चांगल्या कसदार हिरव्या चाऱ्याच्या उत्पादनाला पर्याय नाही.
 • असा हिरवा चारा वर्षभर कसा पुरेल याचे नियोजन आपणच  केले  पाहिजे तर आणि तरच आपला हा व्यवसाय भरभराटीला येईल.
 • हिरवा चारा जनावरे खातात, त्यामध्ये जास्तीत जास्त अन्नघटक असतात. यांपासून जनावरे जास्तीत जास्त दूध उत्पादन, दुधाची गुणवत्ता, जनावराचे आरोग्य, जनावराची प्रजनन क्षमता या सर्व गोष्टींचा फायदा यामध्ये असणारे जीवनसत्त्व, एन्झाइम्स व इतर महत्त्वाचे अन्नघटक हे पचन होण्यास कारणीभूत असते. परंतु अमर्यादा माहिती करून यासाठी मदत करणारे असतात, असे विरास अशाप्रकारच्या हिरव्या चाऱ्यातून मिळते.

हिरवचारा वापरामुळे होणारे फायदे :

हिरवा चारा देणे जनावरांना फार फायदेशीर आहे. आपल्या दूध व्यवसायातील काही शाश्वत उपाय करून त्यावर उपाययोजना कराव्या. आपल्याकडे जरी चराऊ कुरणाची कमतरता असली तरी आपण जास्त उत्पादन देणारी चारा पिके आपल्या शेतात उत्पादित करु शकतो. हिरव्या व सुक्या चाऱ्याचे चांगले प्रमाण जनावराच्या आहारात ठेवले तर आपणास चांगला फायदा होतो.

 • हिरवा चारा खाण्यासाठी रुचकर, लुसलुशीत व रसदार असल्याने जनावरे आवडीने खातात व त्यांची भूक भागते.
 • हिरव्या चाऱ्यातून जनावराच्या शरीरास आवश्यक असणारे ग्लुकोज, फ्रुक्टोज सुक्रोज मिळत सहजपणे विरघळणाऱ्या साखरेचा पुरवठा यातून होतो. यामुळे जनावरास आवश्यक असणारी उर्जा लवकरात लवकर मिळते व जनावर कायम ताजेतवाने राहते.
 • द्विदलवर्गीय चारा पिकांतून जसे लुसर्न, बरसीम सारख्या जनावरांना चांगल्या प्रकारची खनिजे तसेच जास्त प्रमाणत प्रथिनांचा पुरवठा होतो. त्यामुळे दूध उत्पादन वाढते व महागडे पशुखाद्य कमी प्रमाणात वापरावे लागते.
 • एकंदरीत आपला आहारविरहीत खर्च कमी होतो. हिरवा चारा हा जनावरास पचनासाठी सोपा तसेच त्याची चवसुद्धा चांगली असल्याने जनावराच्या शरीरास हितकारक असतो. यामधून जनावरांना ताजी, पोषक द्रव्ये त्यांच्या नैसर्गिक स्वरुपात मिळतात.
 • ज्या जनावरांना दूध देण्याची क्षमता – सर्वसाधारणपणे 10 ते 12 लिटरपर्यंत असते अशा जनावरांना फक्त पशुखाद्य न देता चांगल्याप्रकारे एकदल 70% व द्विदल 30% चारा दिला तर आपण एवढे दूध काढू शकतो. परंतु त्यापुढे आपणास पशुखाद्य द्यावे लागेल.
 • आपण जर चांगल्या गुणवत्तापूर्ण हिरवा चारा उत्पादित केला तर आपण आपला पशुखाद्याचा खर्च निम्म्याने कमी करू शकतो. त्यामुळे हिरव्या चाऱ्याचे जनावराच्या आहारात फार महत्त्व आहे.
 • हिरव्या चाऱ्यात उपलब्ध असणारे अन्नघटक जनावराचे आरोग्य व त्यांची प्रजनन क्षमता चांगली राहण्यासाठी मदत करतात. हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेमुळे जनावरांच्या गाभण राहण्याच्या क्षमतेत वाढ होते.
 • जनावराच्या आहारात त्यांच्या वजनाच्या 10% या प्रमाणे हिरव्या चाऱ्याची आवश्यकता असते. यामध्ये 70% म्हणजे सर्वसाधारणपणे 400 किलो वजनाच्या जनावरासाठी 21 किलो हा एकदल हिरवा चारा व 30% म्हणजे 9 किलो द्विदल चारा असे नियोजन असल्यास जनावरांना चांगल्या आहार देणे कमी करू शकतो.

संदर्भ :

 • गायकवाड एस. पी. (2017) : कमी खर्चाचे चारा उत्पादन तंर हायड्रोपोनिक, सकाळ प्रकाशन, पुणे
 • रवींद्र काटोले (2014) : चारा पिके, गोडवा कृषी प्रकाशन, पुणे-9

शब्दांकन : किशोर ससाणे लातूर तथा वेबसाईट ॲडमीन : https://www.agrimoderntech.in/

दूध उत्पादनासाठी हिरव्या चाऱ्याची गरज हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

Prajwal Digital

Leave a Reply