डॉ. योगेश सुमठाणे, (M.Sc., Ph.D., M.B.A.), Agricultural Senior, Bamboo Research & Training Centre, Chandrapur (MS), Mob. 8806217979
पृथ्वीच्या अस्तित्वापासून सजीवांच्या जगण्यासाठी अन्न, पाणी, हवा, अग्नी आणि जमीन ह्या पंचतत्त्वांची गरज प्रामुख्याने जाणवते म्हण्यापेक्षा ह्या अत्यावश्यक बाबी आहेत आणि आजच्या काळात आपण दुसऱ्या ग्राहकाच्या शोधात असताना आपल्या पृथ्वीने जे आपल्याला दिलं त्याची किंमत खऱ्याअर्थाने जाणवला लागली आहे.
पृथ्वीच्या उत्पत्तीपासून निसर्गाने माणसाला भरभरून सर्व काही दिलं, पण मानवाच्या हव्यासापोटी आणि लालची वृत्तीमुळे मानवाने सर्व काही हिरावून टाकलं आणि त्याचाच परिपाक म्हणून की काय आज माणसाचा मृत्यू हा ऑक्सिजन शिवाय होतोय.
आजच्या उद्भवलेल्या Covid-19 ह्या जागतिक महामारीने परत एकदा माणसाला निसर्गाविषयी विचार करण्यास भाग पाडले आहे आणि म्हणून बांबूची लागवड व नैसर्गिक ऑक्सिजन निर्मिती ही महत्त्वाची बाब आहे.
बांबू लागवडीमुळे ऑक्सिजन निर्मिती :
बांबूच्या देशात सुमारे 135 जाती आढळतात. त्यांपैकी 25 ते 30 जाती ह्या महाराष्ट्रात आढळतात. त्यामध्ये प्रामुख्याने ‘डेंड्रोकैलेमस’ व ‘बाम्बूसा’ ह्या पिढीतल्या जाती सर्वात चांगल्या वाढतात.
बांबू का?
1. हरितद्रव्य बनवण्याला चांगला प्रतिसाद.
2. स्टोमॅटा उघड-झाप होण्याचे प्रमाण कमी.
3. लवकर वाढतो दिवसाला सुमारे 45 इंच वाढ होते.
4. प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया अतिशय चांगली.
5. कार्बन-डाय-ऑक्साईड कोंडून ठेवण्यास सर्वात अग्रेसर असे गवतवर्गीय वनस्पती.
वैज्ञानिकदृष्ट्या बांबू मधून ऑक्सिजन पुरवठा :
वैज्ञानिकदृष्ट्या बघितलं तर बांबू हवेतलाकार्बन-डाय-ऑक्साईड शोषून घेऊन जवळपास 35 ते 40 टक्के ऑक्सिजन बाहेर सोडतो. जे की इतर झाडांच्या तुलनेत खूप जास्त आहे. नुकतेच तामिळनाडूमध्ये भिवा बांबू (Bamboosa Bamboo) हा जास्त ऑक्सिजन निर्मिती करतो म्हणून एक पार्क /उद्यान बनविण्यात आलेले आहे. तशा धर्तीवर प्रत्येक जमीन असणाऱ्याने आपल्या आजूबाजूला बांबू लागवड करावी व नैसर्गिक ऑक्सिजन निर्मिती करून त्याचा भरपूर उपयोग करावा.
बांबू आणि आरोग्य :
बांबू लागवड ही पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. आणि बांबूमध्ये नैसर्गिकरित्या रोगांचा सामना करण्याचा गुणधर्म सुद्धा आहे. ‘बांबूकूण’ नावाचे बॅक्टेरियाला दूर ठेवण्याचे वैशिष्ट्य पूर्ण द्रव्य बांबू पासून तयार होते. साधारण 70 टक्के बॅक्टेरिया दूर ठेवण्याचे यामध्ये प्रमाण आहे म्हणून बांबूचा उपयोग कपडा निर्मिती मध्ये सुद्धा केला जातो.
बांबू अन्न म्हणून सुद्धा उपयोग होतो :
‘डेंड्रोकैलेमस’, ‘बाम्बूसा’, ह्या कुळातील बांबूच्या सकर्सचा अन्न म्हणून सुद्धा उपयोग केला जातो. त्याचा उपयोग लोणचे किंवा उकडून भातासोबत सुद्धा खाण्यासाठी वापरतात. ह्यामुळे मानवी शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
ह्या व अशा अनेक गुणधर्मांमुळे बांबूला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून यामुळे बांबूची लागवड करणे ही काळाची गरज आहे.