बीज गोळा पद्धती व उपयोग या लेखात आपणास बीज गोळा म्हणजे काय? हे जाणून घेणार असून बीज गोळा करण्याच्या पद्धतीची माहिती होईल. बीज गोळ्याचा उपयोग व बीज गोळ्याचा पूर्व इतिहासाबद्दल माहिती प्राप्त होईल.
बीज गोळा म्हणजे काय?
पावसाळ्याला सुरुवात होण्याअगोदर माती मध्ये बी रुजवण्याची परंपरा आपल्याकडे अनादी काळापासून चालू आहे. पण त्यामध्ये माणसाची व शेतीपूरक अवजारांचा उपयोग मुख्यत्वे करून होत असे.
पण जर निसर्गाचे संतुलन राखावयाचे असेल तर झाडांची लागवड व जोपासना करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी उन्हाळ्यामध्ये झाडाच्या खाली बिया सापडतात त्या बिया गोळा करून त्याची साठवणूक करावी.
साठवलेल्या बीया फेकून सुद्धा नवीन रोपं तयार होतं पण, त्या बियांना मुंग्या व इतर कीटक व पक्षी यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी त्या बियांचे बी गोळे जर बनवले तर त्याचा उपयोग नवीन रोपं तयार होण्यास चांगल्या पद्धतीने करता येतो.
बीज गोळा करण्याच्या पद्धती
ह्या गोळा केलेल्या बियांपासून बी गोळ्या बनवण्याची पद्धती खालील प्रमाणे आहेत:
- बी गोळा करणे
- माती (चाळून घेतलेली)
- शेण
- पाणी
- बुरशीनाशके किंवा गॅमॅझीन
तयार करण्याची कृती :
- सर्वात अगोदर गोळा केलेल्या बियांना एकत्र ठिकाणी पत्र्यावर जमा करावे.
- जमा केलेल्या बियांना बुरशीनाशके लावून थोडा वेळ उन्हात वाळवावे.
- वाळलेल्या बियांना माती, गोमूत्र व शेण यांच्या मिश्रणाने तयार केलेल्या गोळ्यामध्ये भाग ठेऊन गोळा तयार करावा.
- तयार केलेल्या गोळ्याला साठवलेला 30 ते 35 मिनिटे वाळवावे.
- वाळलेले गोळे 5 किंवा 10 च्या हिशोबाने एका प्लॅस्टिकच्या किंवा कागदाच्या छोट्या पिशव्यात भरून ठेवावे.
- हे बनवलेले बियांचे गोळे प्रवाशांना प्रवाशा दरम्यान फेकण्यास सांगावे.
- लहान मुलांना गुलेरच्या साह्याने हे बी गोळे फेकण्यास सांगावे.
- म्हशीच्या किंवा गायीच्या शेपटीला ह्या बी – गोळ्याच्या छोट्या छोट्या पिशव्या बांधाव्यात जेणे करून ही बी रानावनात सगळीकडे पसरली पाहिजेत.
बी गोळ्याचा उपयोग काय?
बी गोळ्या तयार केल्यामुळे जिथे माणूस किंवा माणसाने तयार केलेल्या मशीन जाऊ शकत नाहीत अशा ठिकाणी ह्या बियांना प्राण्यांच्या, विमानाच्या किंवा पाण्याच्या माध्यमातून पोहचवणे.
ह्यामुळे ज्या जुन्या बिया आहेत त्याचे संवर्धन व हे बीज – गोळ्या पद्धती व उपयोग होतो.
– डॉ. योगेश सुमठाणे, (पीएच.डी., एम.बी.ए. कृषीशास्त्र), मो.नं. 7588692447