सर्व शेतकरी बांधवाना विनंती घरचे सोयाबीन उगवणशक्ती तपासणी करावी. गावातील सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या गाव पातळीवर उगवणशक्ती तपासून लागणाऱ्या बियाण्याची तयारी करून ठेवावी. ऐनवेळी धावपळ करण्यापेक्षा घरगुती बियाणे ठेवले असेल तर पेरणीपुर्व उगवणशक्ती तपासणी करावीच. 100 बियाणे ओल्या भोरग्यात ठेवुन त्याला 7 दिवसापर्यंत ओलावा कमी पडू देऊ नये. 100 बियाण्याची दोन वेगवेगळी प्रात्यक्षिके घेऊन 7 दिवसानंतर केवळ सशक्त उगवलेलीच रोपेच मोजावीत.
उगवणशक्ती क्षमतेनुसार बियाणे कमी किंवा जास्त वापरायचे हे शेतक-यांनी ठरवावे. किमान उगवणशक्ती 70 टक्के असेल तर 30 किलो/ प्रति एकर बियाणे वापरावे.
मराठवाड्याकरिता निवड करावयाचे सोयाबीन वाण व सरासरी कालावधी
अ) महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
- डीएस 228 (फुले कल्याणी)115 दिवस
- केडीएस 726 (फुले संगम), 110 दिवस
- केडीएस753 (फुले किमया) 100 दिवस
ब) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी
- एम ए यु एस 71 – 105 दिवस
- एम ए यु एस 162 – 115 दिवस
- एम ए यु एस 158 – 105 दिवस
- एम ए यु एस 612 – 95 दिवस
क) आघारकर संशोधन संस्था, पुणे
- एम ए सी एस 1188 – 110 दिवस
ड) जवाहरलाल नेहरू कृषि विश्वविद्यालय जबलपुर
- JS-335 – 100 दिवस
मराठवाड्यातील शेतकरी बांधवांनी सोयाबीन वाण निवडताना वरील वाणांना प्राधान्य द्यावे. यावर्षी (2021-22) सोयाबीन बाजारभाव सात हजार तीनशे रूपयाच्या पुढे गेला आहे. या बाजारभावामुळे खरीपात सोयाबीन पेरा वाढु शकतो. यामुळे सोयाबीन बियाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
उगवणशक्ती तपासणी केलेले खात्रीच्या वाणाचे घरगुती बियाणे खरेदी करून ठेवावी. गावपातळीवर सर्व शेतकरी बांधवांनी घरगुती सोयाबीन बियाणे राखून ठेवण्याबाबत जनजागृती करावी.
स्त्रोत : कृषि विभाग,महाराष्ट्र शासन
HHHH