कृषि विज्ञान /उद्यानविद्या पदवी प्रकल्पाच्या महत्त्वपूर्ण सूचना

सन 2020-21 मधील अंतिम वर्षांतील कृषि विज्ञान /उद्यानविद्या पदवी प्रकल्प विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना असून दि. 27 जुलै, 28 जुलै 2021 रोजी मुक्त कृषि शिक्षण केंद्रामार्फत संबंधित कृषि विज्ञान केंद्रे व कृषि महाविद्यालयात प्रकल्प अहवालासाठी तोंडी परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपण जो विषय निवडला आहे त्या विषयानुसार प्रकल्पाचा सारांश स्वरूपात अभ्यास करावयाचा आहे. तसेच प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी लागणारी पुस्तके, संदर्भग्रंथ, संकेत स्थळावरील माहिती, संबंधित कृषि विद्यापीठाची कृषि दैनंदिनी, कृषि शेतकरी मासिके, कृषि पत्रिका, वृत्तपत्रीय लेख, बातमी इ. सोबत असणे आवश्यक आहे. (Website : https://ycmou.digitaluniversity.ac)

पदवी प्रकल्प अहवालाकरिता देण्यात येणारे गुण (100) :

 • पदवी प्रकल्प निवडलेल्या विषयाचे महत्त्व, गरज व उपयुक्त असणे.
 • पदवी प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी वापरलेले वस्तुनिष्ठ संदर्भ ग्रंथ व सामुग्री.
 • प्रकल्पात तयार केलेले छायाचित्र, आकृती, आलेख इ.
 • पदवी प्रकल्प अहवाल विद्यापीठाच्या मार्गदर्शक सुचनेच्या आधीन असला पाहिजे.
 • पदवी प्रकल्पास एकूण 100 गुण असून त्यापैकी उत्तीर्ण होण्यासाठी 50 गुणाची आवश्यकता आहे.

पदवी प्रकल्प अहवालाकरिता तोंडी (मौखिक) परीक्षेत देण्यात येणारे गुण (100) :

 • विषय क्षेत्र निवडीचे महत्त्व आणि व्याप्ती याबद्दल माहिती देणे.
 • विषय क्षेत्राबद्दल ज्ञान असणे.
 • विषय क्षेत्राबद्दल ओळख व उपयुक्तता असणे.
 • उत्तर देताना कौशल्य आणि आत्मविश्वासाचे उत्तर देणे.
 • पदवी प्रकल्प अहवाला व्यतिरिक्त इतर प्रश्न सुद्धा विचारू शकतात.
 • पदवी प्रकल्पाच्या तोंडी परीक्षेस एकूण 100 गुण असून त्यापैकी उत्तीर्ण होण्यासाठी 50 गुणाची आवश्यकता आहे.

नोट : सदरील सूचना ह्या फक्त सन 2020-21 मधील अंतिम वर्षांतील कृषि विज्ञान /उद्यानविद्या पदवी प्रकल्प अहवाल सादर केलेल्या विद्यार्थ्यांसाठीच आहे.

** अधिक माहितीसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या संकेत स्थळाला भेट द्यावी.

Prajwal Digital

1 thought on “कृषि विज्ञान /उद्यानविद्या पदवी प्रकल्पाच्या महत्त्वपूर्ण सूचना”

Leave a Reply