मूग व उडीद पिकावरील रोगांचे नियंत्रण

प्रा. देशमुख संदीप, (कीटकशास्त्रज्ञ), मांजरा कृषि विज्ञान केंद्र, अतिरिक्त एम.आय.डी.सी., लातूर

मूग व उडीद हे खरीप हंगामातील महत्त्वाचे डाळवर्गीय पीक आहे. मूग पिकावर हवामानातील प्रतिकूल बदल झाल्यामुळे मूग पिकांवर भुरी रोग, करपा, केवडा, पानांवरील ठिपके, पानांचे कर्ल, ऍन्ट्रॅन्सोज, कर्कोस्पोरो इ. महत्त्वाचे रोग इत्यादीचा प्रादुर्भाव दिसून येतो. मूग व उडीद पिकांवरील रोगांचे वेळेवर नियंत्रण न केल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येते, परिणामी शेतकऱ्यांचे कधी न भरून येणारे नुकसान होते. रोगांच्या प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मूग व उडीद पिकांवरील रोगांचे प्रभावी नियंत्रण करणे नितांत गरजेचे आहे  

रोग नियंत्रणाचा उद्देश :

  • मूग व उडीद पिकांवरील प्रमुख रोगांची ओळखणे स्पष्ट करणे.
  • मूग व उडीद पिकांवरील रोगांचे रासायनिक पद्धतीने नियंत्रण करणे. 
  • मूग व उडीद पिकांचे रोगांपासून संरक्षण करणे.

1) भुरी रोग

हा रोग इरीसीफी पॉलिगोनी या बुरशीमुळे होतो. दमट व कोरडे वातावरण या वाढीसाठी पोषक असते. हवेतील आर्द्रता 80 टक्के किंवा त्याहून अधिक असल्यास प्रादुर्भाव वाढतो. भुरी रोगाचा दुय्यम प्रसार हवेद्वारे होतो.  

नियंत्रण :

  • शेत व शेतालगतचा परिसर व दुधी सार या तणांपासून मुक्त ठेवावा.
  • कमी बळी पडणाच्या मूग व उडीद पिकाच्या जातींचा (उदा. बीपीएमआर-145, बीएम-2003-02 मूग कोपरगांव नं.1) वापर करावा.
  • फवारणी (प्रति 10 लिटर पाणी), रोगाची लक्षणे दिसताच, पाण्यात मिसळणारे गंधक डब्ल्यूपी 25 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (50 डब्ल्यूपी) 10 ग्रॅम किंवा पेनकोनॅझोल (10 टके ई.सी.) 5 मि.लि. या औषधांची फवारणी करावी.
  • आवश्यकतेनुसार तज्ज्ञांच्या सल्ल्याने बुरशीनाशक बदलून 10 दिवसांच्या अंतराने करावी.  

2) करपा रोग

हा रोग जमिनीतील मायक्रोफोमिना फॅझियोलिना या बुरशीमुळे होतो. रोपावस्थत खोडावर व पानावर सुरवातीस अनियमित आकाराचे तपकिरी ठिपके दिसतात. हे ठिपके मिसळून पाने पूर्णपणे करपतात. अशा प्रकारचे ठिपके किंवा चट्टे खोडावर व रोपाच्या खालील भागाकडे जातात. मूळकूज, खोडकुज होऊन रोपे कोलमडतात. 

नियंत्रण :

  • पीक काढणीनंतर बुरशी जमिनीत बऱ्याच काळापर्यंत रोगट झाडाच्या अवशेषांवर जिवंत राहतात.
  • शेतीतील वनस्पतीचे कुजके अवशेष, रोगट झाडे व रोगाचे अवशेष नष्ट करावेत. शेत व पीक स्वच्छ ठेवावे.
  • पिकाची योग्य फेरपालट करावी (तृणधान्य + कडधान्ये).
  • बीजप्रक्रियेमध्ये 1.5 ग्रॅम कार्बेन्डॅझिम आणि 1.5 ग्रॅम थायरम प्रतिकिलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे.
  • दाणे भरत असताना पिकावर पाण्याचा ताण पडू देऊ नये.
  • फवारणी प्रति 10 लिटर पाणी रोग दिसताच झायनेब (80 टक्के) 20 ग्रॅम किंवा झायरम (80 टक्के) 20 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब (75 टक्के) 20 ग्रॅम पुढील फवारणी रोगाच्या तीव्रतेनुसार कीटकशास्त्रज्ञाच्या सल्ल्याने बुरशीनाशक बदलून 10 ते 12 दिवसांनी करावी.

3) पिवळा केवडा

हा रोग एलोव्हेनमोइँक व्हायरस या विषाणूमुळे होतो. या रोगाचे प्रमाण खरीपापेक्षा उन्हाळी हंगामात अधिक असतो. पिवळा केवडा रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीद्वारे होतो. रोगाची सुरवात पानांवर ठळक पिवळसर व फिकट चट्टे एकमेकांशी संलग्न स्वरूपात दिसतात. शेवटी पूर्ण झाड पिवळे पडल्याचे आढळून येते. रोगट झाडास फुले व शेंगा कमी प्रमाणात लागतात.

नियंत्रण :

  • रोगग्रस्त झाडे उपटून वेळेवर किंवा लवकर पेरणी करावी.
  • पेरणीपूर्वी बियाण्यास इमिडाक्लोप्रीड (70 डब्ल्यूएस) प्रतिकिलो 5 मि.लि. याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
  • रोगप्रतिकारक्षम आणि सुधारित जातीचा वापर करावा.  

4) पिवळा मोइँक रोग – मुंगबीन पिवळा मोइँक विषाणू (MYMV)

सुरुवातीला लहान पिवळे पॅच किंवा स्पॉट्स तरुण पानांचे हिरव्या पालमा लवकरच ते तेजस्वी पिवळा मोइँक किंवा सुवर्ण पिवळा मोइँक लक्षण पिवळ्या रंगाची फिकट गुलाबी हळूहळू वाढते आणि पाने पूर्णपणे पिवळ नंतर परिपक्व होतात आणि काही फुले व फोड सहन करतात. फोड लह आरंभिक संक्रमणामुळे बियाणे तयार होण्याआधी रोपांचा मृत्यू होतो.

नियंत्रण :

  • डायमेथोएट 30 टक्के ई.सी. सारख्या कीटकनाशकांपासून बचाव करण्यासाठी हा रोग पांढरा फ्लाय पसरतो.
  • नियंत्रणासाठी प्रति लीटर फॉस्फेमिडॉन 250 मि.ली. 500 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • गरज भासल्यास इतर रासायनिक कीटकनाशकाची कीटकशास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करावी.

रोग नियंत्रण केल्यामुळे होणारे फायदे :

  • किडींपासून पीक व शेताचे संरक्षण होते.
  • धान्याची प्रत व दर्जा उत्तम राखला जातो.
  • कीडविरहित धान्यास बाजारात चांगला दर मिळतो.
  • किडींची पुढील श्रृंखला थांबविण्यास मदत होते.

प्रा. देशमुख संदीप, (कीटकशास्त्रज्ञ), मांजरा कृषि विज्ञान केंद्र, अतिरिक्त एम.आय.डी.सी., लातूर

टीप : शेतकरी बांधवांनी मूग व उडीद पिकांवर रासायनिक औषधांची फवारणी करावयाची असल्यास कीटकनाशकाचे नाव, त्याचे योग्य प्रमाण, पाण्याची क्षमता, फवारणी करतांना आवश्यक काळजी घ्यावी, तसेच जे कीटकनाशक वापरणार आहोत त्यास शासनाने बंदी घातलेले कीटकनाशक वापरू नये, कारण कोणत्याही अन्य दुष्परिणामाशी वेबसाईट ॲडमीन जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.  

Prajwal Digital

Leave a Reply