सोयाबीन लागवडीचे सुधारित वाण

सोयाबीन हे मुख्य तेलवर्गीय पीक असून सर्वात खाद्य पदार्थात सोयाबीन तेलाचा उपयोग केला जातो. सोयाबीनमध्ये 40 टक्के प्रथिनांचे प्रमाण व 20 टक्‍के तेलाचे प्रमाण आहे.

महाराष्ट्र राज्यात अलीकडील काळात सोयाबीन क्षेत्रात वाढ झालेली दिसून येत आहे, परंतु सोयाबीन लागवडीच्या सुधारित जातीचा वापर म्हणावा तसा होत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे सोयाबीन पिकाची प्रती हेक्टरी पीक उत्पादन व उत्पादकता कमी येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते, परिणामी उत्पादकतेत लक्षणीय घट येत आहे.

प्रस्तुत सोयाबीन लागवडीचे सुधारित वाण या लेखाच्या मदतीने शेतकरी बांधवांना सोयाबीनच्या सुधारित जातींची माहिती होईल, त्यांना सोयाबीन पिकाचे उत्पादन व उत्पादकता वाढविणे शक्य होईल तसेच उपलब्ध क्षेत्रावर चांगल्या प्रकारे सोयाबीनचे उत्पादन घेणे शक्य होईल.

सोयाबीन पेरणीसाठी कोणत्या जातींचे बियाणे वापरावे?

  • ज्या वाणांची आनुवंशिक व भौतिक गुणधर्म उत्तम आहेत.
  • ज्या वाणांची प्रती हेक्टरी उत्पादनक्षमता अधिक आहे
  • वाण कोणत्याही प्रकारच्या जमिनीत चांगल्या प्रकारे वाढणारा असावा.
  • जो वाण कीड व रोगांस प्रतिकारक्षम आहे.
  • सोयाबीनचा वाण कमी कालावधीत पक्व होणारा असावा
  • सोयाबीनचा वाण कमीत रोगांना बळी पडणारा असावा
  • ज्या वाणांची बाजारात चांगली मागणी असेल.

वरील निकषाच्या आधारे सोयाबीन लागवडीसाठी सुधारित वाणांची निवड करावी.

सोयाबीनचे महत्त्वाचे सुधारित वाण

1) परभणी सोना (M.A.U.S.- 47)

परिपक्व कालावधी :  80-85 दिवस

एकरी बियाणे : 30 किलो

वैशिष्टये : झाडावर पिंगट लव असून पक्कतेनंतर शेंगाचा रंग गडद तपकिरी होतो. संकरित कापूस, ज्वारी आणि तुरीमध्ये आंतरपिकास योग्य, पक्ततेनंतर लवकरात लवकर काढणी करावी.

उत्पादन :  20-25 क्विंटल प्रती हेक्टरी.

2) जवाहर (J.S. 335)

प्रसारित वर्ष : 1994

संशोधन संस्था : जवाहरलाल नेहरू कृषि विश्‍वविद्यालय,जबलपूर

परिपक्व कालावधी : 95-98 दिवस

एकरी बियाणे : 30 किलो

वैशिष्टये : मध्‍य भारतात लागवडीसाठी प्रसारित करण्‍यात आला. भारतात एकूण सोयाबीन क्षेत्राच्‍या 90 टक्‍के क्षेत्रात ही जात लागवड केली जाते. जे.एस. 78.77 आणि जे.एस. 71-05 या जातीच्‍या संकरापासून ही जात तयार केली आहे.या जातींच्‍या फुलांचा रंग जांभळा असून, 95 ते 100 दिवसांत ही जात परिपक्‍व होते.  

उत्पादन : 25-35 क्विंटल प्रती हेक्टरी.

3) समृध्दी (M.A.U.S.-71)

प्रसारित वर्ष : 2001

परिपक्व कालावधी : 93-96 दिवस

एकरी बियाणे : 32 किलो

वैशिष्टये : फुलाचा रंग जांभळा असून दाणा टपोरा आहे. पक्कतेनंतर 10-12 दिवस शेंग न फुटता शेतात उभा राहू शकतो. अंतर पिकास योग्य.  हा वाण शेंगा न फुटता राहू शकते. हा वाण आंतरपीकास योग्‍य आहे. 

उत्पादन : 25 ते 30 क्विंटल प्रती हेक्‍टरी.

४) शक्ती (M.A.U.S.-81)

परिपक्व कालावधी : 97-98 दिवस

एकरी बियाणे : 30 किलो

वैशिष्टये : फुलाचा रंग जांभळा असून दाणा टपोरा आहे. पक्कतेनंतर 10-12 दिवस शेंग न फुटता शेतात उभा राहू शकतो. अंतर पिकास योग्य

उत्पादन : 25-30 क्विंटल प्रती हेक्टरी.

5) एम. ए. यु. एस.-158 (M.A.U.S.-158)

प्रसारित वर्ष : 2009

परिपक्व कालावधी : 95-98 दिवस

एकरी बियाणे : 33 किलो

वैशिष्टये : फुलाचा रंग जांभळा असून दाणा टपोरा आहे. पक्कतेनंतर 10-12 दिवस शेंगा फुटत नाही. खोडमाशी साठी सहनशिल, अंतर पिकास योग्य.

उत्पादन : 26-31 क्विंटल प्रती हेक्टरी.

6) एम. ए. यु. एस.-612 (M.A.U.S.-612)

प्रसारित वर्ष : 2016

परिपक्व कालावधी : 95-100 दिवस

एकरी बियाणे : 30 किलो

वैशिष्टये : अधिक उत्पादनक्षमता, चक्री भुंगा, खोडमाशी व शेंगा पोखरणारी अळी या किडींना तसेच अल्टरनेरीया, पानावरील ठिपके व शेंग करपा या रोगांना सहनशील. 

उत्पादन : 32-36 क्विंटल प्रती हेक्टरी.

7) प्रसाद (M.A.U.S.-1)

परिपक्व कालावधी : 105-110 दिवस

एकरी बियाणे : 30 ते 32 किलो

वैशिष्टये : फुलाचा रंग जांभळा असून दाणा टपोरा गुलाबी आहे. पीक पक्कतेनंतर 12-15 दिवस शेंगा न फुटता उभा राहू शकतो. आणि शेंगाचा रंग गडद तपकिरी होतो. उशिरा येणाऱ्या तुरीमध्ये (160-170 दिवस) आंतरपीकास योग्य. 

उत्पादन : 25-30 क्विंटल प्रती हेक्टरी.

8) प्रतिकार (M.A.U.S.- 61)

परिपक्व कालावधी : 95-100 दिवस

एकरी बियाणे : 30 ते 32 किलो

वैशिष्टये : फुलाचा रंग जांभळा असून दाणा टपोरा आहे. पक्कतेनंतर शेंगाचा रंग बदामी होतो. पक्कतेनंतर 8-10 दिवस शेंगा न फुटता शेतात उभा राहू शकतो. उशिरा येणाऱ्या तुरीमध्ये (160-170 दिवस) आंतरपीकास योग्य. 

उत्पादन : 25-30 क्विंटल प्रती हेक्टरी.  

9) प्रतिष्ठा (M.A.U.S.-61-2)

परिपक्व कालावधी : 100-110 दिवस

एकरी बियाणे : 30 ते 32 किलो

वैशिष्टये : फुलाचा रंग लालसर असून लव तपकिरी रंगाचे आहे व दाणा टपोरा आहे. पक्कतेनंतर 8-10 दिवस शेंगा न फुटता उभा राहू शकतो. तांबेरा मध्यम प्रतिबंधक, आंतरपिकास योग्य.

उत्पादन : 25-30 क्विंटल प्रती हेक्टरी.

10) एम. ए. यु. एस.- 162 (M.A.U.S.-162) 

प्रसारित वर्ष : 2014

परिपक्व कालावधी : 100-103  दिवस

एकरी बियाणे : 30 किलो

वैशिष्टये : यंत्राद्वारे काढणीस उपयुक्त. तसेच शारीरीक पक्वते नंतर 10-12 दिवस शेंगा फुटत नाही.

उत्पादन : 25-30 क्विंटल प्रती हेक्टरी.

Leave a Reply

Discover more from Modern Agrotech

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading