कृषिमाल विक्री व्यवस्थापन मार्गदर्शन

कृषि-व्यवसायात आजही पारंपारिक पद्धतीने शेती करणारे 20 ते 25 टक्के शेतकरी आहेत. तसेच एकूण जमीनधारणेपैकी 2.00 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असणारी कुटुंबे 55 टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. म्हणजेच मोठी जमीनधारणा असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण फार कमी आहे त्यांच्यापैकी बागायती क्षेत्र असणारे आणखी फारच थोडे शेतकरी कुटुंबे आहेत.

आर्थिक दृष्ट्या बऱ्यापैकी पुढारलेल्या व आधुनिक शेतकऱ्यांची संख्या भारतात अनायासे महाराष्टात फारच नगण्य आहे. आसा जो थोडा शेतकरीवर्ग आहे त्यालाच फक्त शेतीव्यावसायाचे परिपूर्ण व अद्यावत ज्ञान आहे. त्यामध्ये कृषिमाल उत्पादनापासून ते थेट कृषिमालाची विक्री किफायतशीरपणे करण्यासाठी काय काय करावयास हवे (उदाहणार्थ, प्रतवारी, पॅकिंग, इत्यादी) कोणत्या वाहतुकीच्या साधनाने कृषिमाल पाठवावा, कोणत्या बजारपेठेत कृषिमाल पाठवावा, कोणामार्फत कृषिमाल विकावा व केव्हा विकावा यांसंबंधी माहिती असते.

याउलट वर नमूद केल्याप्रमाणे लहान जमीनधारणा असलेला जो असंख्य शेतकरीवर्ग आहे, त्यास विक्रिव्यवस्थेसंबंधी कमी ज्ञान आहे किंवा अजिबात ज्ञान नाही. कमी जमीन धारणा असल्यामुळे एकतर त्यांच्याकडे पुरेसा विक्रीयोग्य कृषिमाल नसतो. पिकउत्पादन झाल्यानंतर त्याच्या आर्थिक अडचणी भागविणे क्रमप्राप्त असते. त्यामुळे विक्रीसाठी जादा आसा कृषिमाल नसला तरी, नाखुशीने तो  विकावा लागतो. कित्येकदा हंगामाच्या शेवटी अथवा वर्षाच्या अखेरीस त्याच प्रकारचा कृषिमाल बऱ्याचशा चढ्या किंमतीने कुटंबांच्या गरजा भागवण्यासाठी परत खरेदी करावा लागतो.

अश्या प्रकारे अल्पभूधारक व सीमांत शेतकऱ्यांची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे ‍आर्थिक पिळवणूक होत राहते. त्यामुळे त्यानां अशा आर्थिक पिळवणुकीतून पूर्णपणे मुक्त करता येणे शक्य जरी नसले तरी कृषिमाल विक्रीमध्ये ज्या प्रकारचा तोटा सहन करावा लागतो, त्यामध्ये काही प्रमाणात सुधारणा करता येणे शक्य आहे.  

प्रस्तुत लेखाद्वारे आपणास कृषिमालाच्या प्रतवारीचे महत्व समजून घेता येईल, कृषिमाल पॅकिंगचे फायदे, किफायतशीर व योग्य वाहतूक,‍ कृषिमाल साठवण्याची गरज आणि त्यासंबंधी सुविधा, नियंत्रित बाजारपेठा, इत्यादी संबंधी माहिती मिळेल त्यामुळे कृषिमालाची प्रतवारी करणे आणि धान्याचे साठवणूक करणे सोयीस्कर होईल.‍

प्रतवारी म्हणजे काय?

प्रतवारी करणे म्हणजे एकासारख्या आकाराच्या, रंगाच्या, परिपक्वतेच्या मालाची विभागणी वेगवेगळया समूहात करणे होय.

कृषिमालाची प्रतवारी :

 • कृषिमालामध्ये अशा प्रकारची प्रतवारी मुख्यत्वे भजीपाला,फळे व फुले या पिकांमध्ये करावी लागते. त्यामुळे सर्वसाधारणपणे लहान आकार, मध्यम आकार व मोठ्या आकाराची भजीपाला व फळे अशा पद्धतीने वर्गीकरण होते.
 • त्यामध्ये विशेषत: फळभज्या व फळे यांचे वजन व आकारमानानुसार विशेषत फळामध्ये प्रतवारी करता येते. काही कृषिमालाच्या बाबतीत त्याचा “वाण’ हा एक प्रकारची प्रत होऊ शकते.
 • उदाहरणार्थ, भजीपाल्यामध्ये भांडी, वांगी, टोमॅटो, इत्यादी पिके.त्याचप्रमाणे फळांमध्येसुद्धा जातीनुसार प्रतवारी केली जाते. उदाहरणार्थ आंबा हापुस, पायरी, केशर इत्यादी) प्रतवारी केल्यामुळे कृषिमालास विशिष्ट प्रकारचा दर्जा प्राप्त होतो.
 • कित्येक शेतमालांची प्रतवारी करण्यासाठी “अगमार्क’ या शासकीय संस्थेमार्फत प्रमाण ठरवून दिलेले आहे. त्यामुळे विशेषत: टिकाऊ शेतमालांच्या बाबतीत ॲगमार्कनुसार प्रतवारी करुन त्यावर तशा प्रकारचा शिक्का मारता येतो. त्यासाठी त्या संस्थेत नोंदणी करुन त्या प्रकारची प्रत राखवी लागते. उदाहरणार्थ, तूप, मसाले, मद्य, रस, केचअप, इत्यादी.
 • अशा प्रकारे प्रतवारी केलेले कृषिमालास विशीष्ट दर्जा प्राप्त झाल्यामुळे त्याची किंमत निश्चित ठरविता येते. म्हणजेच जर शेतकऱ्यांनी त्याच्या कृषिमालाची प्रतवारी केली तर त्यांना त्या कृषिमालास विशिष्ट अशी किंमत बाजारमध्ये मागता येते.
 • दुसरा फायदा असा की अशा प्रकारचा कृषिमाल खरेदी करणाऱ्या ग्राहकास प्रतवारीची खात्री असल्याने ते सहजपणे वाजवी किंमत देऊन खरेदी करु शकतात. प्रतवारीमुळे मिळणारे एकूण उत्पन्न हे बिगर प्रतवारी केलेल्या कृषिमालाच्या विक्रीपेक्षा बऱ्याच अंशी जास्त असते.‍ शिवाय विक्रते, शेतकरी व खरेदीदार ग्राहक यांना सुलभ रित्या देवाणघेवाण कारता येते.
 • प्रतवारीचे ज्ञान नसल्यामुळे बऱ्याच सीमांत व लहान शेतकऱ्यांचा असा समज होतो की, एकून बिगर प्रतवारी केलेला कृषिमाल विकल्यास जास्त उत्पन्न मिळते. परंतु वस्तुस्थिती तशी नसते.
 • बिगर प्रतवारी केलेल्या कृषिमालामध्ये निरनिराळ्या आकरांचे, वजनाचे, रंगांचे, परिपक्वतेचे नग असल्यामुळे खरेदीदार ग्राहक तो माल कमी किमतीस मागतो. एकदंरीत त्यामध्ये शेतकऱ्याचाच तोटा होतो. म्हणून कृषिमालाची प्रतवारी ही लहान व मध्यम शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वची आहे.

कृषिमाल पॅकिंगचे फायदे :

 • कारखान्यात तयार झालेल्या वस्तू ‍टिकाऊ स्वरुपाच्या व विशिष्ट आकारमानातच तयार होत असल्यामुळे त्यांचे पॅकिंग करणे सोपे व स्वस्त असते.

 • कृषिमालच्या बाबतीत एकसारखी, सहजासहजी पॅकिंग करणे ही अवघड बाब आहे.
 • वाहतुकीसाठी, हातळणी करण्यासाठी व गिऱ्हाइकास हव्या त्या प्रमाणात कृषिमाल विक्री करता यावा यांसाठी पॅकींग हे अनिवार्य आहे.
 • कृषिमालापैकी अन्नधान्याची पॅकिंग मोठ्या प्रमाणात 40 किलो गोणीमध्ये अथवा 100 किलोच्या पोत्यामध्ये केली जाते.
 • सध्याच्या काळात ग्राहकांच्या गरजेनुसार काही अन्नधान्ये व इतर कृषि-उत्पादने उदाहरणार्थ, तांदूळ, डाळी,‍ मिरची, मसाले, इत्यादी प्लस्टिकच्या पिशव्यातून, जारमधून पॅकिंग केली जातात. शेतकरी अशा प्रकारची पॅकिंग आज जरी करत नसले तरी पुढील काळात ती प्रतवारी केल्याने त्यानांच फायदा होणार आहे. सध्या अशी पॅकिंग शक्यतो मध्यस्थ करतात.
 • फळांच्या बाबतीत उदाहरणार्थ, द्राक्ष, डाळिंब, बोरे, सीताफळ, चिकू, आदी १२४ किलोच्या कोरुगेटेड बॉक्समध्ये पॅकिंग केल्यामुळे त्यांची वाहतूक, हाताळणी सोपी होते व खरेदीदारासही पाहीजे त्या प्रमाणात त्याची खरेदी करता येते. भाजीपाला पिकाच्या पॅकिंगच्या संदर्भात तसा एकसारखेपणा नसल्यामुळे विविधता आढळते.
 • उदाहरणार्थ, टोमॅटो, वांगी, इत्यादी जवळच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी क्रेटमध्ये पॅकिंग करतात तर दूरच बाजारपेठेत पाठविण्यासाठी क्रेटमध्ये पॅकिंग करतात तर दूरच बाजारपेठेत पाठविण्यासाठी लाकडी खोक्यात.
 • काकडी, दोडकी, वाल, इत्यादी बांबूच्या बास्केटमध्ये तर भजीपाला हा गोणी किंवा पोत्यांमध्ये पॅक केला जातो.
 • अशा प्रकारे पॅक केलेल्या भाजीपाल्याची वाहतूक व हाताळणी त्यामध्ये फारसे नुकसान न होता करता येते.
 • अलीकडील काळात दुधीभोपळा, कारली, इत्यादी भजीपाला पेपरमध्ये गुंडाळून अंदाजे 10-15 किलोच्या पुठयांच्या खोक्यात पॅक केले जातात.
 • सर्वात महत्वाचा व नाजूक कृषिमाल म्हणजेच फुले, ज्याची पॅकिंग व वाहतूक काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. लांब दांड्यांची फुले उदाहरणार्थ, गुलाब, जेरबेरा, कार्नेशन, निशिगंध, इत्यादी 12 किंवा 20 च्या गड्यात एकत्र बांधून ती मोठ्या बॉक्समध्ये पाठविला जातात.
 • अशा प्रकारे कृषिमालाची पॅकिंग करुन तो योग्य पद्धतीने विक्री  करता आला तर शेतकऱ्यांना निश्चितच किफायतशीर किंमत मिळते.

कृषिमालाची वाहतूक :

 • उत्पादित कृषिमाल ठरावीक वेळेत विशिष्ट बाजारपेठेत पोहच झाला तरच त्याला चांगली किंमत मिळते. अर्थात हे झाले अतिनाशवंत व नाशवंत स्वरुपाच्या कृषिमालाच्या बाबतीत. कृषिमाल वाहतूक करण्यासाठी विविध साधने उपलब्ध असतात. त्यामध्ये प्रामुख्याने बैलगाडी, टेम्पो, ट्रक, ट्रॅक्टर, वतानुकूलित व्हॅन, रेल्वे, जहाज व विमाने यांचा समावेश होतो.

 • कृषिमाल जवळच्या बाजारपेठेत वाहून नेण्यासाठी पूर्वी आणि आजही थोड्याफार प्रमाणत बैलगाड्यांचा वापर केला जातो. सर्वसाधारण शेतकऱ्यांकडे हे वाहतुकीचे साधन उपलब्ध असते. शिवाय त्या साधनाचा पर्यायी उपयोग फारसा नसल्यामुळे जवळच्या बाजारपेठेसाठी योग्य व आर्थिक दृष्ट्या परवडणारा आहे.
 • वाहतुकीचा खर्च कमी करावयाचा असेल तर त्याच बैलगाडीमध्ये इतर सीमांत व लहान शेतकऱ्यांना कृषिमाल नेला तर प्रति क्विंटल सरासरी खर्च कमी येऊ शकतो. अशा प्रकारचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना करणे फार गरजेचे आहे. कदाचित आजच्या काळात बैलगाडीची वाहतूक जास्त वेळ घेत असल्यामुळे कमी वापरण्यात येत आहे.
 • दुसऱ्या प्रकारच्या वाहतुकीची साधने म्हणजे ट्रक व टेम्पो हे होय. या साधनांव्दारे दूरवर उत्पादीत नाशवंत व अतिनाशवंत कृषिमालाची वाहतूक कमीत कमी वेळेत केली जाते. उदाहरणार्थ, पश्चिम महाराष्टातील ‍निरनिराळ्या जिल्हांमध्ये उत्पादित होणारा माल संध्याकाळी 5-6 वाजेनंतर ट्रकमध्ये टेम्पोमध्ये भ्रृण-मुंबईसारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पहाटे 4-5 वाजेपर्यंत पोहच होतो.
 • टोमॅटोसारखा भाजीपाला अलाहाबाद, सिलीगुडी, चंदीगड, कोलकत्ता, इत्यादी शहरामध्ये 24 तासांच्या आत ट्रकने पोहचविला जातो. कित्येकदा ट्रक विशिष्ट बाजाराच्या दिवशी पाहटे 3-4 वाजेपर्यत पोहचविला तर ठोक विक्रेत्याकडून त्यास 500-700 रु बक्षिसी दिली जाते.
 • अशा प्रकारे ट्रकने वाहतूक करावयाची असल्यास एक-दोन शेतकऱ्यांचा 8-10 टन इतका कृषिमाल काढणे शक्य नसते, त्यामुळे एकतर हुंडेकऱ्यांमार्फत अथवा इतर व्यापाऱ्यांमार्फत त्याचे उत्पादित भागामध्ये एकत्रिकरण करुन तो ट्रकद्वारे बाजारपेठेच्या ठिकाणी पाठविणे शक्य होते.
 • मध्यस्थांची दलाली मोठ्या प्रमाणत द्यावी लागते व शेतकऱ्यांना साहजिकच निव्वळ मिळणारी किंमत कमी होते. तेच जर सहकारी तत्वावर म्हणजेच सहकारी कृषिविपणन संस्था स्थापन करुन त्यांच्यामार्फत कृषिमाल विक्री करता आला तर शेतकऱ्यांना निव्वळ मिळणारी किंमत जास्त राहील. अशा प्रकारे सहकारी संस्था स्थापन करण्यासंबंधी शेतकऱ्यांना सल्ला देणे गरजेचे आहे.

कृषिमाल साठवणुकीची गरज आणि पद्धती

 • बहुतांशी कृषिमाल हा एक  हंगामात वेळेत पक्व झाल्यामुळे काढावा लागतो: परंतु कित्येक कृषिमालाची उदाहणार्थ,अन्नधान्ये, गळिताची धान्ये, इत्यादी तसेच कांदा, बटाटा, लसूण, इत्यादी भजीपाल्यांची व काही फळांची गरज वर्षभर असते.
 • शेतमालांचे काही विशिष्ट भांगात उत्पादन होते: परंतु त्याची आवश्यकता सर्व राज्यांमध्ये भसते. एकाच वेळी उत्पादित होणाऱ्या कृषिमालामुळे त्याची बाजारपेठेत आवा खुप होते, त्यामुळे किमतीसुद्धा खूप कमी होतात.
 • कृषिमालास योग्य किंमत मिळण्यासाठी तो नंतरच्या काळात विकावयास हवा, त्यासाठी तो साठवून ठेवणे गरजेचे आहे.
 • कृषिमाल स्वरुपानुसार व टिकाऊपणावरुन त्याची साठवणूक केली जाते. उदाहरणार्थ, थोड्या प्रमाणत जर अन्नधान्य साठवायचे आसेल तर पोती, लोखंडी कोठ्या, इत्यादी साठवणुकीच्या साधनांमध्ये ठेवता येते.
 • कृषिमाल मोठ्या प्रमाणावर साठवणूक करण्यासाठी विविध ग्रामीण पातळीवरील कार्यकारी सहकारी संस्था यांचे गोडाऊन, मध्यवर्ती गुदाम महामंडाचे गोडाऊन, इत्यादींचा उपयोग केला जातो. अशा पद्धतीची जी गोदामे आहेत ती शास्त्रीय पद्धतीने बांधलेली असून तेथील साठवलेल्या कृषिमालाची धान्यावरील कीड, उंदीर यांच्या नियंत्रणाची विशिष्ट खबरदारी व दक्षता घेतली जाते.
 • साठविलेल्या कृषिमालाच्या पावतीचा तारण म्हणून उपयोग करुन विविध संस्था शेतकऱ्यांना कर्ज देतात. त्यामुळे त्यांनी साठविलेले धान्य नंतर जास्त किंमत आल्यानंतर विकले तरी चालते.
 • अतिनाशवंत कृषिमाल साठवता आला नाही तरी त्यावर विविध प्रक्रिया करुन तो साठविता येतो व त्याचा उपयोग नंतरच्या काळात करता येतो.
 • शेतकऱ्यांना अशा विविध साठवणुकीच्या पद्धती, त्यांची गरज किंवा त्यापासून होणारे फायदे माहितीचा अभाव असल्यामुळे कृषिमालाची विक्री काढणीनंतर ताबडतोब करतात.
 • कृषिमाल योग्य पद्धतीने कशा हाताळणी करणे याविषयी संबंधित कृषीसेवा केंद्राच्या व्यवस्थापकाने याची जाणीव करुन देणे अगत्याचे आहे.

कृषिमालाची विक्री :

 • शेतकऱ्यांना आपल्या कृषिमालास चांगली किंमत मिळवायची असेल तर त्यांनी तो कृषिमाल जवळच्या नियंत्रित बाजारपेठेत विकणे गरजेचे आहे. नियंत्रित बाजारपेठेमध्ये कृषिमालाची उघड लिलाव पद्धतीने विक्री केली जाते.
 • उघड लिलाव पद्धती म्हणजेच शेतकऱ्यांचा कृषिमाल बघून खरेदीदार एकाच वेळी त्याची किंमत सांगतात. अशा प्रकारे जास्त खरेदीदार एकाच वेळी उपस्थित असतात.  शेतकऱ्याच्या वतीने दलाल (शेतकरी त्यांचा कृषिमाल पाठवतात ते व्यापारी) किमती (लिलाव) बोलतात. जास्तीत जास्त पुकारलेल्या किंमतीस तो कृषिमाल त्या कृषिमाल त्या खरेदीदारास विकला जातो.
 • कृषिमाल घेणारे खरेदीदार जास्त असल्यामुळे कृषिमालास स्पर्धात्मक किंमत मिळते व ती साहजिक जास्त असते. आपण यापुर्वी पाहिलेच आहे की महाराष्टामध्ये 50 टक्के च्या वर शेतकरी सीमांत व लहान असल्या कारणाने त्यांच्याकडील प्रत्येक विक्रीयोग्य कृषिमाल कमी असल्याने नियंत्रित बाजारपेठेत पाठविने अशक्य व खर्चीक असते.
 • सामुदयिकरित्या अथवा सहकारी तत्वावर एकत्रितपणे पाठविल्यास योग्य किंमत मिळू शकते. “विना सहकार नही उद्धार’ या उक्तीचा उपयोग खऱ्या अर्थाने लहान शेतकऱ्यांना समजावून सांगण्याचे कार्य कृषीसेवा केंद्रव्यवस्थपकाचे सल्ल्याच्या स्वरुपात करावयास पाहिजे.

कृषिमाल विक्रीव्यवस्थेसंबंधी सल्ला दिल्यामुळे होणारे फायदे :

 • शेतकऱ्यांनी कृषिमाल योग्य पद्धतीने विक्री करण्यासाठी त्याची प्रतवारी करावी. त्यामुळे कृषिमालास विशिष्ट दर्जा प्राप्त हाऊन योग्य किंमत मिळते.
 • खरेदीदारांना प्रतीची हमी मिळते. पॅकिंगमुळे वाहतूक सोपी होऊन, त्यावरी खर्च कमी होतो.
 • कृषिमाल वाहतुकीसाठी प्रामुख्याने बैलगाडी, टेम्पो, ट्रक, ट्रॅक्टर, वातानुकूलित व्हॅन, रेल्वे, जहाज विमाने यांचा उपयोग होतो.
 • कृषिमालाचे उत्पादन एकाच वेळी तयार होते. परंतु त्याचा उपयोग वर्षभर होतो. त्यामुळे त्याची साठवणुक विविध प्रकारच्या कोठारांमधून करावी लागते.
 • कृषिमालास चांगली किंमत मिळवण्यासाठी तो नियंत्रित बाजारपेठांमध्ये विकावा.

या सर्व बाबी कृषिमाल विक्रीव्यवस्थेच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या कशा आहेत, कृषिमालाच्या प्रतवारीचे महत्व, कृषिमाल पॅकिंगचे कोणकोणते फायदे, कृषिमालाची किफायतशीर व योग्य वाहतूक,‍ कृषिमाल साठवण्याची गरज आणि त्यासंबंधी सुविधा, नियंत्रित बाजारपेठा, इत्यादी संबंधी माहिती प्रस्तुत लेखात सविस्तर देण्यात आलेली आहे. सदरील माहितीचा उपयोग शेतकरी बांधव, धान्य साठवणूक करणारे शासकीय व निमशासकीय गोदामे किंवा कोठार,  व्यापारी, आडते आदींना होणार आहे.  ‍

Prajwal Digital

Leave a Reply