आधुनिक कृषितंत्राचा महामेळावा

14 ते 17 जानेवारी 2022 रोजी बीड बायपास, औरंगाबाद येथे महाराष्ट्रातील सर्वात भव्य कृषि प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. सदर कृषिप्रदर्शनात देशातील विशेषत: महाराष्ट्रातील बहुतांशी कृषि उद्योजकांना विविध प्रकारच्या व्यवसायाचे स्टॉल मांडता येणार असून त्याद्वारे त्यांच्या शेतकऱ्यांना उत्पादनाची ओळख होईल, कृषि उत्पादनाची विक्री व जाहितीकरण करता येणार आहे.

स्टॉल बुक करण्याचे प्रमुख घटक

 • कीटकनाशके, खते
 • ग्रीन हाऊस तंत्रज्ञान आणि अंमलबजावणी
 • बियाणे उत्पादक
 • टिश्यू कल्चर (उती संवर्धन)
 • विविध प्रकारची अवजारे व कापणी यंत्र उत्पादक कंपन्या
 • ठिबक व तुषार सिंचन
 • ट्रॅक्टर्स
 • पोस्ट हार्वेस्टिंग यंत्रे
 • पॅकेजिंग आणि कोल्ड स्टोअरेज इंडस्ट्रीज
 • कृषि साहित्य ग्रेडिंग, वेईंग, सॉर्टिंग अवजारे उत्पादक कंपन्या
 • बँक व कृषी शिक्षण संस्था
 • कृषि संलग्नीत प्रकाशने
 • कृषी संशोधन व शासनाचे विविध योजना व विभाग

स्त्रोत : दैनिक ॲग्रोवन, 13 ऑक्टोबर, 2021

Prajwal Digital

Leave a Reply