भांडवल उभारणी : महत्व व प्रकिया

कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची गरज असते. भांडवलाशिवाय व्यवसायाचा विकास होणे होते. शेती व शेतीपूरक उद्योग वा व्यवसायासाठी खेळते भाग-भांडवल उपलब्ध आवश्यक असते. याच उद्देशाने लेखकांनी आजच्या आधुनिकीकरणाच्या युगात उद्योग वा व्यवसायाचे महत्त्व लक्षात घेऊन उद्योगासाठी भांडवल उभारणी : महत्त्व व प्रक्रिया याबाबत लेख तयार करून सखोल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

भांडवल उभारणी महत्व (Capital Raising: Importance) :

शेती व्यवसाय म्हटले की ग्राहक, उत्पादक, विक्रेता इ. शब्दांना महत्व प्राप्त होते. कारण व्यवसायात हे घटक दृश्य स्वरुपात पहायाला मिळतात. भांडवल हा एक व्यवसायाचा अविभाज्य घटक मानण्यात येतो. व्यवसायाच्या प्रत्येक वळणावर भांडवलाची गरज असते. या भांडवलाचे प्रमाण व्यवसायाच्या प्रत्येक कमी अधिक असू शकते. मात्र भांडवलाशिवाय व्यवसाय पुढे जाऊ शकत नाही. भांडवल वेगवेगळया पद्धतीने उभे करता येऊ शकतो. व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात स्वत:चे भांडवलला जास्त महत्व असते. तर व्यवसायाच्या पुढील टप्प्यात कर्ज, शासकीय योजनांचे अनुदान किंवा सवलती यावर जास्त भर दिला जातो.

भांडवल हे सतत लागणार असल्याने त्याच्या उभारणी बरोबरच वापराचे काटेकोर नियोजन असणे आवश्यक असते, यालाच आपण व्यवसायाचे व्यवस्थापन असे म्हणतो. ज्या व्यवसायामध्ये हे आर्थिक व्यवस्थापन उत्तम असते, त्या व्यवसायाला लवकरच स्थिरता प्राप्त होतो. छोट्या मोठया कंपन्यांच्या व्यवसायामध्ये सर्वसामान्य लोकांकडूनही भांडवल उभे केले जाते.

वस्तुत : असे भांडवल उभे करणे हे आव्हाननात्मक काम असते. यासाठी कंपनीचे आर्थिक व्यवस्थापन हे किती परिणामकारक व पारदर्शी आहे याकडे पाहून सर्वसामान्य लोक भांडवलामध्ये गुंतवणूक करतात. अशी गुंतवणुक करुन हे लोक कंपनीस विश्वास दाखिवतात. हा विश्वास कंपनीने पुढच्या काळात सार्थ करुन अशा लोकांना त्यांच्या गुंतवणूकीचा अधिकाधिक मोबदला दिल्यास हेच लोक पुन्हा-पुन्हा कंपनीला वेगवेगळे व्यवसाय उभारण्याचा व त्याचा विस्तारास भांडवल उभे करुन मदत करु शकतात.

साहजिकच कुठलेही भांडवल विनासायास व फुकट मिळू शकत नाही. त्यासाठी थोडेसे प्रयत्न करावे लागतात. सर्वसाधारणपणे कर्ज किंवा भाग स्वरुपात भांडवल उभे करता यते. कर्ज म्हटल्यानंतर मुख्यत: समोर येतात त्या बँका, बँकाकडून घेतलेल्या कर्जांनी त्यांनी निर्धारीत केलेल्या व्याजदाराने परतफेड करावी लागते. भाग स्वरुपात कंपनीला संचालक याच्यांकडूनही कर्ज रुपाने भांडवल उभे करता येते.

भाग स्वरुपात उभे केलेल्या भांडवलला लाभांशाच्या रुपाने परतावा देणे शक्य असते. भाग भांडवलाचे विविध स्त्रोत कंपनीमध्ये आर्थिक गुंतवणुकीत रस दाखविताना कंपनीची क्षमता, कंपनीची उद्दिष्टे, कंपनीचा कारभार, कंपनीमधील नफा कमविण्याची क्षमता, कंपनीचा ताळेबंद, कंपनीची बाजारपेठेतील प्रतिमा यांसारख्या अनेक गोष्टी विचारात घेतात व गुंतवणूक करतात.

कंपनी घटना व नियमावली (Company Events and Regulations) :

भाग स्वरुपात भांडवल उभे करावयाचे झाल्यास कंपनीच्या घटना व नियमावली मधील काही प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. त्या खालील प्रमाणे ओहत :

 • भागांची दर्शनी किंमत ठरविणे
 • प्रस्तवित भांडवलाची मर्यादा ठरविणे
 • विक्रीला काढायच्या भागांची दर्शनी किंमत ठरविणे
 • प्रस्तवित भांडवलाची मर्यादा ठरविणे
 • विक्रीला काढायच्या भागांची संख्या ठरविणे

या भाग भांडवलाचा पुढील वापर निश्चित करणे त्यातून भागधाराकांना द्यावयाच्या लांभाचे नियोजन करणे इ. गोष्टींचा समावेश असतो.

कंपनीच्या संचालक मंडळाने याचा सखोल अभ्यास करुन निर्णय व अमंलबजावणी करावयाची असते. कंपनीमध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा समावेश असतो. कंपनीमध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींसाठी कंपनी कायदा १९५६, कलम १३ मध्ये तरतुदी केल्या आहेत. काही निवडक गोष्टींसाठी कंपनीला रजिस्ट्रार ऑफ कंपनीकडे दाखला व कागदपत्र दाखल करावे लागतात आणि त्यातील एक भाग म्हणजे भाग भांडवल उभारणीचा दाखला हा भाग वाटप झाल्याच्या ३० दिवसात दाखल करायचा असतो. या दाखल्याबरोबरच कोणाला  किती भाग वाटप झालेत, भागांची संख्या, सभासदांचे नाव, व पत्ता इ. गोष्टी नमूद कराव्या लागतात. भाग वाटपाच्या अधिकार संचालक मंडळाकडे असतो व त्यांचा निर्णय अंतिम असतो.

कंपनीला भाग वाटप झाल्यापासून ६० दिवसांत प्रत्येकाला शेअर्स सर्टिफिकेट (भाग प्रमाणपत्र) देणे बंधनकारक आहे. हे भाग प्रमाणपत्र हे भागधारकाच्या कंपनीमधील मालकी हक्काचे प्रमाणपत्र ते कंपनीचे मालक असतात. भाग प्रमाणपत्राचा नमुना कंपनी कायद्यामध्ये नमूद केला असेल तरी आपण त्या  थोडेफार बदल करु शकतो. कंपनी जेव्हा भागांचे वाटप करते, तेव्हा ते कंपनीच्या व्यवसायासाठी भाग-भांडवल उभ्या करण्याच्या काही पद्धती घटनापत्रात व नियमावलीत नमूद केलेल्या असतात. त्यास अनुसरुन कंपनीचे संचालक मंडळ याबाबत निर्णय घेतात.

भांडवलाचे प्रकार (Types of Capital) :

कंपनीच्या घटनापत्रकात व नियमावलीत भाग-भांडवल प्रकार दिलेले आहेत खालीलप्रमाणे-

1) अधिकृत किंवा नोंदणीकृत भांडवल (Authorized or Registered Capital)

अधिकृत भांडवलाची रक्कम कंपनीच्या मेमोरंडम ऑफ असोसिएशन (घटना) शकत नाही. कंपनी ही रक्कम हवी तेवढी वाढवू शकते. कंपनी स्थापनेचा खर्च अधिकृत भांडवल निर्भर असतो. अधिकृत भांडवलाची रक्कम ठराविक रकमेच्या भागात विभागलेली असते. उदा. एक लाख अधिकृत भांडवल करायचे झाल्यास साधारणपणे प्रत्येकी रु. १०००/- दर्शनी किंमतीचे १०० भाग किंवा प्रत्येकी रु १००/- दर्शनी किंमतीचे १००० भाग इ. कंपनी स्थापनेचा खर्च अधिकृत भांडवलाशी निगडित असल्यामुळे ही रक्कम स्थापनेच्या वेळी किमान ठेवणे योग्य असते. गरज भासल्यास अधिकृत भांडवलाची रक्कम संचालक मंडळ व सभासदांच्या संमतीने वाढवता येते आणि कंपनीला फक्त वाढीव रकमेवर रजिस्ट्रेशन फी व स्टॅम्प ड्युटी भरावी लागते.

2) अभिदत भांडवल (Issued Capital)

विक्रीस काढलेले भांडवल हे अधिकृत भांडवलाचा असा भाग जो संचालक मंडळाने भांडवल उभारण्याकरिता विक्रीस काढलेला असतो. विक्रीस काढलेले भांडवल नेहमी अधिकृत भांडवलापेक्षा कमी  किंवा समान असणे गरजेचे असते.

3) अभिदत भांडवल (Subscribe Capital)

अभिदत भांडवल विक्रीस काढलेल्या भांडवलाचा असा भाग असतो, जो गुंतवणूकीदाराने विकत घेतलेला असतो. अभिदत भांडवल हे विक्रीस काढलेल्या भांडवलापेक्षा कमी किंवा समान असणे गरजेचे असते.

4) भरणा केलेले भांडवल (Paid up Capital)

भरणा झालेले भांडवल हे अभिदत भांडवलाचा भाग असतो व जेवढे पैसे गुंतवणूकदारांनी कंपनीला भागासाठी दिले आहेत तेच यामध्ये मोजले जातात. कंपनीच्या दृष्टीने प्रत्यक्ष भरणा झालेले भांडवलच महत्वाचे असते. भरणा भांडवल वरील नमूद केलेल्या कोणत्याही  प्रकाराच्या  भांडवलापेक्षा अधिक नसणे गरजेचे असते.

भांडवल उभारणी प्रक्रिया (Capital raising process) :

 • उत्पादक कंपनीला भागभांडवल उभारणीसाठी खालील नमूद केलेले पावले उचलेणे गरजेचे आहे.
 • सर्वप्रथम संचालक मंडळाची बैठक बोलावावी.
 • संचालक मंडळाच्या बैठकीत भाग किंवा विक्रीला काढण्यासंबधी ‍निर्णय घ्यावा व तसा ठराव करावा.
 • इच्छूक सदस्यांना भागाबाबत आवश्यक ती माहिती पुस्तिका व भागासाठी मागणी करावयाच्या अर्जाची प्रत उपलब्ध करुन द्यावी.
 • भागासाठी आलेले अर्ज स्वीकारावी व त्यापोटी ‍मिळालेल्या रकमांची भागधारकांना पावती द्यावी.
 • संचालक मंडळाची बैठक बोलावून ज्या सदस्यांकडून कंपनीला भागाच्या रकमा मिळालेल्या आहेत त्यांना भागांचे  वाटप करण्याचा निर्णय घ्यावा व तसा ठराव पारित करावा.
 • भागाच्या वाटपाचा निर्णय झाल्यापासून ३० दिवसांच्या आत रजिस्ट्रार ऑफ कंपनी यांचेकडील आवश्यक तो दाखला सादर करावा.
 • भाग वाटपाचा निर्णय झाल्यापासून ६० दिवसांच्या मुदतीत प्रत्येक गुतंवणूकदरांना भाग प्रमाणपत्र वितरीत करावे.
 • भाग वाटपाची नोंद सभासद वहीमध्ये सविस्तर अद्यावत ठेवणे.

भाग वाटपाचा दाखला रजिस्ट्रार ऑफ कंपनीकडे दाखल करणे अतिशय महत्वाचे आहे. हे केल्यास कंपनी व संचालक मंडळाला दंड होऊ शकतो. तसेच सदर दाखला त्यांचेकडे दाखल न झाल्यास रजिस्ट्रार ऑफ कंपनीच्या कार्यालयात संबंधित कंपनीचे भागभांडवल कमी दिसते, मात्र प्रत्यक्षात ते जास्त असते. अशा वेळी कंपनीने रजिस्ट्रार ऑफ कंपनीकडून काही माहिती लपवून ठेवल्याचा आरोप होऊन कंपनीवर, दंडात्मक कारवाई होऊ शकते.

कंपनीला भाग वाटप झाल्यापासून ६० दिवसांत प्रत्येकाला  शेअर्स सर्टिफिकेट (भाग प्रमाणपत्र) देणे बंधकारक आहे. भाग प्रमाणपत्र हे भागधारकाच्या कंपनीमधील मालकी हक्काचे प्रमाणपत्र हे भागधारकाच्या कंपनीमधील मालकी हक्काचे प्रमाणपत्र असते. हे न केल्यास कंपनी व संचालक मंडळाला दंड होऊ शकतो.

भांडवल उभारणी : महत्व व प्रकियेचे फायदे

 • उद्योग व व्यवसाय उभारणीस खेळते भांडवल उपलब्ध होण्यास मदत मिळते.
 • उद्योग व व्यवसायाचे बदलत्या जीवनशैलीनुसार विकास करता येतो.
 • उद्योगासाठी राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज मंजूर करून व्यवसायाचे आधुनिकीकरण करता येते.
 • उद्योग व व्यवसाय सुरू केल्यामुळे कुशल मनुष्यबळांना रोजगाराची संधी उपलब्ध होते.

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर

भांडवल उभारणी : महत्व व प्रकिया हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स, जास्तीत जास्त शेतकरी बांधव व वाचकांपर्यंत शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

Prajwal Digital

Leave a Reply