सौरऊर्जेचा कार्यक्षम वापर

सौरऊर्जा यंत्रणा हाताळण्यासाठी सोपी आहे. देखभाल करण्यास जास्त खर्च येत नाही. यंत्रणा जास्त काळ टिकते. दुरूस्ती खर्च कमी असतो. सौरऊर्जेचा वापर वीजनिर्मितीसाठी होतो. याचा उपयोग सौरपंपासाठी करता येतो.

आपल्याला प्रत्येक चौरस मीटवर एका तासात साधारणपणे ५ ते ६ किलोवॅट इतकी सौरऊर्जा उपलब्ध होते. अपारंपारिक ऊर्जेमध्ये सोलर फोटोहोल्टाइक दिवे आणि पंप, सुधारित चलू आणि गोबर गॅस संयंत्र यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.

सौर वॉटर हिटर्स हे पाणी गरम करण्यासाठी वापरतात. सोलर ड्रायर हे फळे व भाजीपाला वाळवण्यासाठी वापरतात. सोलर कुकरचा पदार्थ शिजवण्यासाठी करतात.

सौर ऊर्जेचा वापर वीजनिर्मितीसाठी होतो. याचा उपयोग सौरपंपासाठी करता येतो. पाणी उपसण्यासाठी सौर फोटोव्होल्टाइक प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.

सौरऊर्जायंत्रणा हाताळण्यासाठी सोपी आहे. देखभाल करण्यास जास्त खर्च येत नाही. यंत्रणा जास्त काळ टिकते. दुरूस्ती खर्च कमी असतो.

सौर ऊर्जेचा उपयोग :

  • पाणी गरम करणे, अन्न शिजवणे डिस्टिल्ड वॉटर निर्मिती, रेफ्रिजरेशन.
  • पाण्याचा पंप, वीजनिर्मिती, धान्य सुकविणे.
  • ऊर्जेची टंचाई असलेल्या भागांत अधिक उपयुक्तता.
  • प्राथमिक आरोग्य केंद्र, सामूहिक केंद्र, शाळा व यांसारख्या आवश्यक ठिकाणी वीज पुरविण्यासाठी उपयुक्त.

सौर ऊर्जेचा वापर केल्यामुळे होणारे फायदे

  • कोणत्याही प्रकारच्या विद्युत ऊर्जेची गरज भासत नाही.
  • शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी सौरऊर्जा उपयुक्त आहे.
  • अन्न शिजविण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर महत्त्वाचा आहे.
  • फळे व भाजीपाला वाळविण्यासाठी सौरऊर्जेचा वापर किफायतशीर ठरतो.
  • सौरऊर्जेची हाताळणी, देखभाल व दुरस्ती करणे सोपी आहे.

सौर ऊर्जेचे काही तोटे /मर्यादा

  • सुरुवातीला सौरऊर्जा बसविण्यासाठी खर्च जास्त येतो.
  • पावसाळयात उन पडत नसल्यामुळे फारसा उपयोग होत नाही.
  • अति थंडी व दमट वातावरणात सौरऊर्जा बंद ठेवावी लागते.
  • अल्पभूधारक शेतकऱ्यांना सौरऊर्जा उभारणी करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.

स्त्रोत : दै. ॲग्रोवन, ॲग्रो प्लस : सौरऊर्जेचा कार्यक्षम वापर, बुधवार, 16 डिसेंबर 2020

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर

सौरऊर्जेचा कार्यक्षम वापर हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

Prajwal Digital

2 thoughts on “सौरऊर्जेचा कार्यक्षम वापर”

Leave a Reply