रब्बी ज्वारीस पेरणीपूर्वी करा बीजप्रक्रिया

रब्बी ज्वारीचे दर्जेदार उत्पादन वाढविण्यासाठी आणि बियाण्याचे कीड व रोगांपासून संरक्षण करण्यासाठी बीजप्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे असते. कोणत्याही पिकाचे बियाणे शुद्ध असेल तर त्यापासून तयार होणारी पीक पैदास सुद्धा शुद्ध आणि दर्जेदार असते.

बियाण्याचे महत्त्व विशद करताना तुकाराम महाराजांची उक्ती शुद्धा बीजोपाटी फळे रसाळ गोमटी या प्रमाणे बियाणे जर शुद्ध असेल त्यापासून मिळणारे फळ हे उत्तम व दर्जेदार असू शकेल. याप्रमाणे ‍पिकाचे बी पैदास आनुवंशिक दृष्ट्या शुद्ध असल्यास त्यापासून तयार होणारे बीज सुद्धा उत्तम दर्जेचे असते.

रब्बी ज्वारीस पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया का करावी?

  • पिकांचे रोगापासून संरक्षण व्हावे.
  • बियाण्याची उगवण चांगली व्हावी.
  • पिकापासून अधिक उत्पादन मिळावे.
  • पीक उत्पादनात सातत्य राहून पीक उत्पादनात स्थिरता राहण्यासाठी. 

रब्बी ज्वारीसाठी बीजप्रक्रिया कशी करावी?

  • रब्बी ज्वारीच्या बियाण्यास पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास बुरशीनाशक व जिवाणूसंवर्धनाची बीजप्रक्रिया करावी.
  • रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण 10 ते 12 किलो बियाणे प्रतिहेक्‍टरी वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 4 ग्रॅम गंधक (300 मेश) या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.
  • थोडं वेळाने ज्वारीच्या प्रति 10 ते 12 किलो बियाण्यास 250 ग्रॅम ॲझोटोबॅक्‍टर व 250 ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू खताची बीजप्रक्रिया करावी.

रब्बी ज्वारीस जिवाणू खते वापरण्‍याची पद्धती :    

  • रब्बी ज्‍वारीच्‍या प्रति 10 किलो बियाण्‍यास 250 ग्रॅम अॅझोटोबॅक्‍टर, 20 ग्रॅम स्‍फुरद विरघळविणारे जीवाणू (पी.एस.बी.) व 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा (बुरशीनाशक) यांची बियाणे प्रक्रिया करावी. अॅझोटोबॅक्‍टर मुळे हवेतील मुक्‍त नत्राचे स्थिरीकरण होऊन पिकास नत्र उपलब्‍ध होते.
  • रब्बी ज्वारीच्या एकत्रित बीजप्रक्रियेसाठी 250 ग्रॅम अॅझोटोबॅक्‍टर जिवाणू खत अधिक 250 ग्रॅम स्‍फुरद विरघळणारे जिवाणू खत 10 ते 15 किलो बियाण्‍यासाठी वापरावेत.
  • सर्वसाधारण 10 ते 15 किलो बियाण्‍यास अॅझोटोबॅक्‍टर जिवाणू संवर्धनाचे 250 ग्रॅम वजनाच्‍या एका पाकिटातील संवर्धन गुळाच्‍या थंड द्रावणातून चोळावे.
  • गुळाचे द्रावण तयार करण्‍यासाठी 1 लीटर पाण्‍यात 125 ग्रॅम गुळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे. बियाणे सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. 

रब्बी ज्वारीस बीजप्रक्रिया केल्यामुळे होणारे फायदे :

  • बियाण्याची उगवण चांगली होते.
  • बियाण्याचे बुरशीजन्य व जीवाणू रोगांपासून संरक्षण होते.
  • ज्वारीच्या पीक उत्पादनात 10 टक्के ने वाढ होते.

रब्बी ज्वारीस पेरणीपूर्वी करा बीजप्रक्रिया हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करून करावे आणि Modern Agrotech या वेबसाईटला Subscribe करून सहकार्य करावे.

Prajwal Digital

Leave a Reply