गहू पिकाचे संकरित वाण

गहू हे महाराष्ट्रात रब्बी हंगामात घेतले जाणारे अन्‍नधान्‍य पीक असून गव्हाची लागवड महाराष्ट्रात बहुतांशी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु गव्हाच्या संकरित वाणाचा पेरणीसाठी वापर शेतकरी बांधव फारशे करीत नसल्यामुळे प्रती हेक्टरी पिकाची उत्पादन व उत्पादकता कमी येत आहे. याचे कारण म्हणजे दर्जेदार उत्पादन देणाऱ्या गहू पिकाच्या संकरित  वाणांची लागवडीसाठी निवड केल्यास निश्चितपणे प्रती हेक्टरी उत्पादन वाढविता येते. (Read More गहू पिकाचे सुधारित वाण)  

वाढती लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करणे हे आपल्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून उपलब्ध भूधारण क्षेत्रावर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून, कमी कालावधीत येणाऱ्या पिकाच्या संकरित वाणांची लागवडीसाठी वापर करून उत्पादन वाढविणे क्रमप्राप्त झालेले आहे. याच उद्देशने गहू पिकाचे संकरित वाण हा लेख तयार करून महाराष्ट्रातील गहू उत्पादक शेतकऱ्यांना गहू पिकाच्या संकरित वाणांची सखोल माहिती मिळावी, त्यांचे प्रती हेक्टरी पीक उत्पादन वाढावे. तसेच पीक उत्पादनात सातत्याने भरघोस वाढ होऊन प्रती हेक्टरी उत्पादकता वाढविणे शक्य होईल.  

गहू लागवडीचे संकरित वाण कसे निवडावे?

  • वाणांची अनुवंशिक व भौतिक शुद्धता व  गुणधर्म उत्तम असले पाहिजे.
  • वाणांची प्रती हेक्टरी उत्पादन व उत्पादकता अधिक असली पाहिजे.
  • वाण कोरडवाहू व बागायती लागवडीसाठी उपयुक्त असला पाहिजे.
  • वाण रासायनिक खतांना चांगला प्रतिसाद देणारा असला पाहिजे.
  • वाणास बाजारात चांगली मागणी असली पाहिजे.
  • वाणांची शुद्धता, गुणवत्ता व दर्जा उत्तम असला पाहिजे.
  • कृषि विद्यापीठाने शिफारशीत केलेला वाण असला पाहिजे.

गहू लागवडीचे कोणते संकरित वाण वापरावे?

1)  कल्याण सोना

प्रसारित वर्ष : 1967

संशोधन : भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR)

परिपक्व कालावधी :  115-121 दिवस

एकरी बियाणे : 35 ते 40 किलो प्रती एकरी

वैशिष्टये :  या वाणाचे दाणे पिवळसर, तजेलदार व मध्यम आकाराचे आहेत. खताच्या मात्रेला अधिक प्रतिसाद देणारा हा वाण आहे. काजळी व करपा रोगास बळी पडतो. या वाणास अधिक प्रमाणात तांबेराची लागण होती. त्यामुळे उशिरा पेरणीसाठी या वाणाची शिफारस नाही.

उत्पादन :  :  सरासरी 38 ते 42 क्विंटल प्रती हेक्टरी.

2)  सोनालिका

प्रसारित वर्ष : 1967

संशोधन : भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR)

परिपक्व कालावधी :  115-115 दिवस

एकरी बियाणे : 30 ते 35 किलो प्रती एकरी

वैशिष्टये :  या वाणाचे दाणे जाड व रंगाने तजेलदार आहेत. तसेच इतर गुणधर्मही उत्तम आहेत. या जातीस फुटवे कमी येतात. पीक कापणीस आल्यानंतर कापणी लगेच करावी.  

उत्पादन :  :  सरासरी 32 ते 35 क्विंटल प्रती हेक्टरी.

3)  अजीत -102

परिपक्व कालावधी :  100-102 दिवस

एकरी बियाणे : 40 किलो प्रती एकरी

वैशिष्टये : ताटांची उंची 80 ते 90 सें.मी. इतकी असून दाण्याचा आकार मध्यम मोठा आहे. दाण्याचा रंग आकर्षक सोनेरीका असून माव्यास व तांबेरा रोगास प्रतिकारक्षम आहे.  स्वादीष्ठ व नरम पोळी, चांगला बाजार भाव, कमी पाण्यात चांगले उत्पन्न देणारा वाण आहे.

उत्पादन :  : सरासरी 50 ते 55 क्विंटल प्रती हेक्टरी.

4) अजीत – 109

परिपक्व कालावधी :  105-110 दिवस

एकरी बियाणे : 40 किलो प्रती एकरी

वैशिष्टये : ताटांची उंची 90 ते 100 सें.मी. इतकी असून दाण्याचा आकार मध्यम मोठा आहे. दाण्याचा रंग पिवळसर सोनेरी असून माव्यास व तांबेरा रोगास प्रतिकारक्षम आहे.  स्वादीष्ठ व नरम पोळी, चांगला बाजार भाव, कमी पाण्यात चांगले उत्पन्न देणारा वाण आहे.

उत्पादन :  :  सरासरी 45 ते 50 क्विंटल प्रती हेक्टरी.

5) आयो -106

परिपक्व कालावधी :  100-102 दिवस

एकरी बियाणे : 40 किलो प्रती एकरी

वैशिष्टये : ताटांची उंची 90 सें.मी. इतकी असून दाण्याचा आकार मध्यम मोठा आहे. दाण्याचा रंग पिवळसर सोनेरी असून माव्यास व तांबेरा रोगास प्रतिकारक्षम आहे. स्वादीष्ठ व नरम पोळी, चांगला बाजार भाव, कमी पाण्यात चांगले उत्पन्न देणारा वाण आहे.

उत्पादन :  :  सरासरी 50 ते 55 क्विंटल प्रती हेक्टरी.

6)  दफ्तरी – चमक

परिपक्व कालावधी :  105 ते 110 दिवस

एकरी बियाणे : 40 किलो प्रती एकरी

वैशिष्टये : ताटांची उंची 90 ते 95 सें.मी. इतकी असून दाण्याचा आकार मध्यम मोठा आहे. दाण्याचा रंग आकर्षक पिवळसर चमकदार असून माव्यास व तांबेरा रोगास प्रतिकारक्षम आहे. चमकदार व आकर्षक रंगामुळे चांगला भाव मिळतो. बागायती वेळेवर आणि उशिरा पेरणीसाठी, चपातीस उपयुक्त आहे.

उत्पादन : सरासरी 45 ते 50 क्विंटल प्रती हेक्टरी.

7)  दफ्तरी-1

परिपक्व कालावधी :  105 ते 110 दिवस

एकरी बियाणे : 40 किलो प्रती एकरी

वैशिष्टये : ताटांची उंची 75 ते 80 सें.मी. इतकी असून दाण्याचा आकार मध्यम मोठा आहे. दाण्याचा रंग आकर्षक पिवळसर चमकदारअसून माव्यास व तांबेरा रोगास प्रतिकारक्षम आहे. चमकदार व आकर्षक रंगामुळे चांगला भाव मिळतो.  पिवळसर व आकर्षक रंगामुळे चांगला बाजार भाव मिळतो. चपातीस उपयुक्त आहे.

उत्पादन :  सरासरी 40 ते 45 क्विंटल प्रती हेक्टरी.

गव्हाचे संकरित वाणामुळे होणारे फायदे?

  • बियाण्याची उगवण चांगली होते.
  • पिकाचे प्रती हेक्टरी उत्पादन व उत्पादकता वाढते.
  • कोरडवाहू क्षेत्रावर संकरित वाणांची चांगल्या प्रकारे लागवड करता येते.
  • पिकांना रासायनिक खतांचा संतुलित वापर होतो.
  • संकरित वाणांस बाजारात चांगला दर मिळतो.
  • स्थानिक व कालबाह्य बियाण्यामुळे होणारे नुकसान टाळता येते.

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर

गहू पिकाचे संकरित वाण हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावा. नवीन पोस्टची चालू अप्डेट ई-मेल किंवा Push Notification द्वारे मिळविण्यासाठी Modern Agrotech सब्सक्राईब करावे.

Prajwal Digital

Leave a Reply