गहू पिकाचे सुधारित वाण

गहू हे महाराष्ट्रातील प्रमुख अन्‍नधान्‍य पीक असून गव्हाची चपाती व गव्हाचा प्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. म्हणून गहू पिकाची दुहेरी उपयुक्तता आहे. परंतु गुण-वैशिष्‍ट्यानुसार वेगवेगळ्या जातींमध्‍ये गुणधर्म विभिन्‍न स्‍वरूपाचे आहेत. त्यामुळे गहू पिकाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी सुधारित वाणांची निवड करणे अत्‍यंत गरजेचे झाले आहे. कारण गहू पिकाचे सुधारित वाण खते व पाण्याला चांगला प्रतिसाद देतात. त्यामुळे पीक उत्पादनात भरघोस वाढ होऊन प्रती हेक्टरी उत्पादकता वाढविण्यास चांगली मदत होत आहे. वाचा : गहू पिकाचे संकरित वाण  

गहू लागवडीसाठी वाण कसे निवडावे?

  • ज्या वाणांची अनुवंशिक व भौतिक गुणधर्म उत्तम आहे.
  • ज्या वाणांची प्रती हेक्टरी उत्पादन व उत्पादकता अधिक आहे.
  • जो वाण कोरडवाहू व बागायती क्षेत्रासाठी उपयुक्त आहे.
  • जो वाण रासायनिक खतांना चांगला प्रतिसाद देतो.
  • ज्या वाणांना बाजारात चांगली मागणी आहे.
  • ज्या वाणांची गुणवत्ता व दर्जा उत्तम आहे.
  • वाण कृषि विद्यापीठाने शिफारशीत केलेला असला पाहिजे.

गहू लागवडीसाठी कोणते वाण वापरावे?

  • एचडी-2189 (पुसा बहार)
  • कैलास
  • परभणी – 51
  • त्र्यंबक (एन. आय. ए. डब्ल्यु. -301)
  • गोदावरी (एन. आय. ए. डब्ल्यु.- 295)
  • तपोवन (एन. आय. ए. डब्ल्यु. -917)
  • शरद (एके.डी. डब्ल्यु. -2997-16)
  • सफल – 501 / सफल – 502
  • संशोधीत गहू सफल –502
  • बलराम– 011
  • बलराम – 28
  • समृध्दी
  • रासी थंडर
  • अंकुर-केदार

1)  एचडी-2189 (पुसा बहार)

परिपक्व कालावधी : 115-120 दिवस

एकरी बियाणे : 25 किलो जिरायत,  30 किलो बागायत, बागायती उशिरा 35 किलो प्रती एकरी

वैशिष्टये : बुटका बागायती वाण, दाणा जाड आणि तजेलदार तांबेऱ्यास प्रतिकारक. फुटव्यांचे प्रमाण कमी, वेळेवर तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य.        

उत्पादन :  40-45 क्विंटल प्रती हेक्टरी.

2)  कैलास 

परिपक्व कालावधी : 115-120 दिवस

एकरी बियाणे : 25 किलो जिरायत,  बागायती 35 किलो प्रती एकरी

वैशिष्टये : या वाणाची शिफारस उशिरा पेरण्यासाठी (डिसेंबर अखेरपर्यंत) करण्यात आली असून उत्पादनक्षमता प्रचलित वाणापेक्षा जास्त.         

उत्पादन :  32-35 क्विंटल प्रती हेक्टरी.

3)  परभणी – 51

संशोधन संस्था : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

परिपक्व कालावधी : 120-125 दिवस

एकरी बियाणे : 40 किलो प्रती एकरी

वैशिष्टये : जास्त फुटवे देणारा, दाणे मध्यम व पिवळे, चपाती उत्तम, तांबेऱ्यास प्रतिकारक. बागायती हंगामात कमी पाण्यावर अधिक उत्पन्न देणारा हा वाण.          

उत्पादन :  35-38 क्विंटल प्रती हेक्टरी.

4)  त्र्यंबक (एन. आय. ए. डब्ल्यु. -301)

प्रसारित वर्ष : 2001

संशोधन संस्था : गहू संशोधन केंद्र, निफाड, नाशिक

परिपक्व कालावधी : 115-120 दिवस

एकरी बियाणे : बागायती वेळेवर 30 किलो, बागायती उशीरा 35 किलो प्रती एकरी

वैशिष्टये : बागायती वेळेवर पेरणीस उपयुक्त, तांबेरा रोगास प्रतिकारक.

उत्पादन : 35-38 क्विंटल प्रती हेक्टरी.

5)  गोदावरी (एन. आय. ए. डब्ल्यु.- 295)

प्रसारित वर्ष : 2005

संशोधन संस्था : गहू संशोधन केंद्र, निफाड, नाशिक

परिपक्व कालावधी : 115-120 दिवस

एकरी बियाणे : 35 किलो प्रती एकरी

वैशिष्टये : त्र्यंबक वाणापेक्षा पेक्षा जास्त उत्पादन देणारा, तांबेरा रोगास प्रतिकारक बागायती वेळेवर पेरणी  शिफारस. 

उत्पादन :  38-41 क्विंटल प्रती हेक्टरी.

6)  तपोवन (एन. आय. ए. डब्ल्यु. -917)

प्रसारित वर्ष : 2005

संशोधन संस्था : गहू संशोधन केंद्र, निफाड, नाशिक

परिपक्व कालावधी : 115-120 दिवस

एकरी बियाणे : 40 किलो प्रती एकरी

वैशिष्टये : त्र्यंबक, एचडी 2189 आणि राज 4037 पेक्षा जास्त उत्पादन देणारा वाण. बागायती वेळेवर पेरणीसाठी तांबेरा रोगास प्रतिकात्मक.

 उत्पादन :  35-40 क्विंटल प्रती हेक्टरी.

7)  शरद (एके.डी. डब्ल्यु. -2997-16)

प्रसारित वर्ष : 2005

परिपक्व कालावधी : 110-115 दिवस

एकरी बियाणे : 40 किलो प्रती एकरी

वैशिष्टये : कोरडवाहूसाठी प्रसारीत एमएसीएस 1967 पेक्षा जास्त उत्पादन, तांबेरा रोगास प्रतिकारक्षण वाण.  

उत्पादन :  15-18 क्विंटल प्रती हेक्टरी.

8)  सफल – 501 / सफल – 502

परिपक्व कालावधी : 105 ते 110 दिवस

एकरी बियाणे : 40 किलो प्रती एकरी

वैशिष्टये : बागायती पेरणीसाठी उत्तम सरबती वाण. मध्यम दाणे व प्रथिनाचे प्रमाण भरपूर असून तांबोरा रोगासाठी प्रतिकार आहे. पोळी किंवा चपाती उत्तम असे वाण असून  पेरणीचा अवधी डिसेंबर शेवटपर्यंत करता येते. पेरणीचे अंतर 18 सें.मी. मध्यम उंची, अनेक फुटवे असणारा असा वाण. सर्व हवामानासाठी उत्तम असणारे वाण आहे.

उत्पादन :  16 ते 18 क्विंटल प्रती हेक्‍टरी

9)  संशोधीत गहू सफल –502

परिपक्व कालावधी : 100 ते 105 दिवस

एकरी बियाणे : 40 ते 50  किलो प्रती एकरी

वैशिष्टये :   बागायती उशिरा पेरणीसाठी उत्तम सरबती वाण असून मध्यम दाणे व प्रथिनाचे भरपूर प्रमाण आहे. तांबोरा रोगासाठी प्रतिकार असून पोळी किंवा चपाती उत्तम असे वाण आहे. पेरणीचा अवधी डिसेंबर शेवटपर्यंत असून पेरणीचे अंतर 18 सें.मी. इतके असावे. मध्यम उंची, अनेक फुटवे असणारा असा वाण असून सर्व हवामानासाठी उत्तम असणारे वाण आहे.

उत्पादन :  18 ते 20 क्विंटल प्रती हेक्‍टरी

10)  बलराम 011

परिपक्व कालावधी : 100 ते 105 दिवस

एकरी बियाणे : 30 ते 35  किलो प्रती एकरी

वैशिष्टये : लवकर तयार होणारे वाण. म्हणून उशिरा पेरणीस योग्य आणि दुबार पिकास जमीन मोकळी आवश्यक आहे. बी. टी. कापूस निघालेल्या शेतात बलराम उत्तम येतो. अति नरम चपाती म्हणून बाजारभाव जास्त. 3 ते 4 ओलीतातच पीक येऊ शकते.

उत्पादन :  15 ते 18 क्विंटल प्रती हेक्‍टरी

11)  बलराम – 28

परिपक्व कालावधी : 100 ते 105 दिवस

एकरी बियाणे : 35 ते 40  किलो प्रती एकरी

वैशिष्टये :  हा वाण मध्यम कालावधीत पक्व होणारा असून याची लांब व जाड ओंबी, भरपूर टपोरे दाणे, जोमदार वाढ, गर्द हिरवा रंग असून अती उच्च उत्पादन व उत्कृष्ट दर्जा आहे.

उत्पादन :  15 ते 16 क्विंटल प्रती हेक्‍टरी

12) समृध्दी

परिपक्व कालावधी : : 110 ते 115 दिवस

एकरी बियाणे : 35 ते 40  किलो प्रती एकरी

वैशिष्टये : या वाणाच्या झाडांची सरासरी उंची 80 ते 85 सें.मी. पर्यंत असून दाणे मध्यम व चमकदार आहेत. चपाती नरम, चवदार असून मध्यम उंची, न लोळणारी जात आहे. वेळेवर व उशिरा पेरणीकरीता योग्य व तांबेरा रोगास प्रतिकारक आहे.

उत्पादन :  18 ते 20 क्विंटल प्रती हेक्‍टरी

13)  रासी थंडर

परिपक्व कालावधी : : 100 ते 105 दिवस

एकरी बियाणे : 40 किलो प्रती एकरी

वैशिष्टये :  झाडाची उंची साधारण 100 ते 110 सें.मी. असून फुटव्यांची संख्या 8 ते 10 इतकी आहे. दाण्याचा आकार मध्यम असून पेरणीची वेळ थंडीची सुरवात झाल्यावर करावी.

उत्पादन :  16 ते 18 क्विंटल प्रती हेक्‍टरी

14)  अंकुर-केदार

परिपक्व कालावधी :  110-115 दिवस

एकरी बियाणे : 40 किलो प्रती एकरी

वैशिष्टये : मध्यम उंचीचे आणि दाट संरचनेचे झाड असून झाडांची वाढ सरळ होते. उत्तम अनुवांशिक शुद्धता असलेले वाण असून उत्पादनक्षम फुटवे येण्याची  क्षमता उत्तम आहे. सुमारे 70-75 दिवसात फुलधारणा सुरु होते. ओंबी मध्यम लांब, अर्ध घट्ट, निमुळती व पूर्णपणे बाहेर पडणारी आहे. रासायनिक खताला पूर्ण प्रतिसाद देते. दाणे आकाराने मोठे व चमकदार अंबर रंगाचे असतात. या वाणाच्या पीठाची पोळी नरम असून चवीला उत्तम असते.

उत्पादन :  18 ते 20 क्विंटल प्रती हेक्‍टरी

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर

वाचा : गहू पिकाचे संकरित वाण

गहू पिकाचे सुधारित वाण हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावा. नवीन पोस्टची चालू अप्डेट ई-मेल किंवा Push Notification द्वारे मिळविण्यासाठी Modern Agrotech सब्सक्राईब करावे.

Prajwal Digital

Leave a Reply