दूध गुणवत्ता तपासण्याची किट व यंत्रे

दुधात पाणी टाकून नंतर त्यात पुन्हा पीठ, युरिया, साखर इत्यादी टाकल्यास घनता (Specific Gravity) आदर्श दुधासारखीच असेल. अशा घनतेच्या चाचणीतून निष्पन्न काहीही होणार नाही. दुधातील भेसळ ओळखण्याची लहान किट XIDDB आणि राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था, कर्नाल यांनी विकसित केले आहे. यात रसायन, काचेची भांडी, माहिती पुस्तिका इत्यादी असते. काही मिनिटांत या चाचण्या करता येतात.

बाजारात दूध भेसळ ओळखणारी इलेक्ट्रॉनिक यंत्रे उपलब्ध आहेत. त्यात युरिया, डिटर्जंट, कॉस्टिक सोडा, द्रवरूप साबण, हायड्रोजन पेरॉक्साईड, मीठ यासारखी भेसळ ओळखता येते.

दुग्ध पदार्थांतील फॅट, प्रोटीन, आर्द्रता एका मिनिटात ओळखणारे इलेक्ट्रॉनिक यंत्रही बाजारात उपलब्ध आहे. परंतु ही यंत्रे आर्थिकदृष्ट्या महाग आहेत.

वरील सर्व चाचण्यांसाठी आवश्यक आयोडिन, सल्फ्युरिक अॅसिड, हायड्रोक्लोरिक अॅसिड इत्यादी रसायने ही शाळा-महाविद्यालयांसाठी रसायन पुरवणाऱ्या दुकानांत सहज उपलब्ध असतात.

Prajwal Digital

Leave a Reply