सोयाबीन : मूल्यवर्धित पदार्थ

डॉ. योगेश वाय. सुमठाणे, (Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda), मो. 8806217979

सोयाबीन हे व्यवसायिकयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे पीक आहे. यात 20 टक्के तेल व 40 टक्के प्रथिनाचे प्रमाण असल्यामुळे सोयाबीनला औद्योगिक व जागतिक स्तरावर अनन्यासाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

औद्योगिक क्षेत्रात सोयाबीनपासून निरनिराळे मूल्यवर्धित पदार्थनिर्मिती करून बाजारात  विक्री करण्यास चांगला वाव आहे आणि ग्राहकांना आकर्षित करणारे व मानवी आरोग्याच्या दृष्टीने सोया पदार्थ हे उत्तम आहेत.     

देशात विशेषत: महाराष्ट्रात सोयाबीन पासून पदार्थ निर्मितीला चांगला वाव असून सोयाबीनची लागवड बहुतांशी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रमुख नगदी पीक केली जाते. तसेच सोयाबीन पासून तेलाची व आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त पदार्थ निर्मिती करता येत असल्यामुळे या पिकाला दुहेरी महत्त्व आहे. 

वाचा : सोयाबीन प्रक्रिया उद्योग काळाची गरज   

सोयाबीन अन्नतत्त्व, सोयापीठापासून तयार पदार्थ, सोयाबीन पोहे, सोयाबीन डाळ, सोयाबीन शेवाया, सोयाबीन सतू मिक्स, फॅटरहीत सोयापीठ, सोया सॉस तसेच सोयाबीनपासून बेकारी पदार्थ सोयाकेक, सोयाबीन, सोया खारा व गोड बिस्किट्स, सोयाकुटकी बिस्किट्स, तसेच सोयाबीनचे नाष्टा व पदार्थ सोयाचे भाजलेले दाणे, सायाशेव, सोया डोसा, सोया इडली, सोया चकली, सोया ढोकला, सोया सॉस, सोयाबीनचे दुग्ध पदार्थ, सोया दूध, सोया टोफू पनीर, सोया दही, सोया आईस्क्रिम, सोया रसगुल्ला, सोया श्रीखंड, सोया लोणी सोया लस्सीकि इ. मूल्यवर्धित पदार्थ बनविता येतात.

सोयाबीन मधील अन्न तत्त्वे

 • सोयाबीन दाण्यामध्ये 40 टक्के प्रोटीन व 20 टक्के तेल मिळते.
 • सोयाबीनमधील प्रोटीनची गुणवत्ता इतर वनस्पतीतील प्रोटीनपेक्षा उत्तम असते.
 • वनस्पतीतील प्रोटीनपेक्षा उत्तम असते.
 • सोयाबीनमध्ये 23 टक्के कार्बोहायड्रेट तसेच खनिजे व व्हिटॅमिन्स भरपूर असतात.
 • सोयाबीन दाण्यात ट्रीप्सीन हा घटक असतो त्यामुळे कच्चे दाणे थेट सेवन करू नये.

1) सोयाबीन तेल

सोयाबीन तेल आरोग्यासाठी उत्तम आहे कारण ते कोलेस्टेरॉल विरहित आहे तसेच यात संपृक्त सॅचुरेटेड फॅटीॲसिडचे प्रमाण कमी असते.

सोयाबीनचे विविध प्रक्रिया पदार्थ

सोयाबीनच्या दाण्यांपासून दूध तयार करून त्यापासून सोया पनीर, श्रीखंड, आम्रखंड इ. अनेक पदार्थ तयार केले जातात.

सोयाबनीचे आहारातील महत्त्व

 • आहारातील प्रथिनांचे प्रमाण वाढविण्यासाठी सोयाबीन उपयोगी पडते.
 • लहान मुलांमधील कुपोषण टाळण्यासाठी सोयाबीन महत्त्वाचे ठरते.
 • सर्वसामान्यांना परवडणारे आहे.
 • सोयाबीनमध्ये लोह, जीवनसत्व तसेच ऊर्जा भरपूर प्रमाणात असते.
 • मोड आलेल्या सोयाबीनमध्ये जीवनसत्व क भरपूर असते.

आरोग्यदायी सोयाबीन

 • सोयाबीनच्या सेवनाने स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण कमी होते
 • रजोनिवृत्तीच्या काळात हाडांची झीज होण्याचे प्रमाण तसेच रजोनिवृत्तीचा त्रास सोयाबीनच्या सेवनाने कमी होतो.
 • लहान मुलांमधील हगवणीचे आजार कमी होतात.
 • मधुमेहामध्ये उपयोगी
 • मुलांच्या वाढीसाठी उत्तम.
 • सोयाबीनच्या चोथ्यामुळे पोट साफ राहण्यास मदत होते.

तक्ता क्र. 1 : सोयादूध, गाईच्या दुधामधील घटकांचे प्रमाण

घटक 100 ग्रॅम दूधसोया दूधगाईचे दूध
कॅलरी (किलो कॅलरी)4459
पाणी (टक्के)90.888.6
प्रथिने (ग्रॅम)3.62.9
फॅट (टक्के)2.03.3
कार्बोहायड्रेट (टक्के)2.94.5
राख (टक्के)0.50.7
कॅल्शियम (टक्के)1510
लोह (टक्के)1.20.1

स्त्रोत : गटशेती माहिती पुस्तिका, सोयाबीन प्रक्रिया, पृ. 98

2) सोया दूध  

 • सोयाबीनचे दाणे स्वच्छ धुवून घेणे.
 • सोयाबीनची डाळ तयार करावी.
 • सोयाबीन डाळ 60 अंश तापमानात एक तास भिजवावी.
 • मिक्सरमध्ये दळून घेणे, त्यामध्ये आठपट पाणी मिसळणे.
 • गॅसवर 20 मिनिटे उकळणे.
 • मलमलाच्या कपड्यातून गाळून घेणे.
 • त्यापासून दूध आणि चोथा वेगळा होतो.
 • साखर विलायची घालून दूध सुगंधी करावे.
 • बाटलीत भरून थंड तापमानात साठवून ठेवावे.
 • सोयाबीनपासून मिळणाऱ्या दूधामध्ये कोलेस्टोरॉल नसल्याने व स्निग्ध पदार्थांचे प्रमाण कमी असल्यामुळे हे दूध उत्तम पर्याय आहे.

3) सोया पनीर

 • सोयाबीनचे दूध उकळावे.
 • एक लिटर दूधात 2 ग्रॅम लिंबूसत्व पाण्यात मिसळून टाकावे.
 • या प्रक्रियेमुळे दूध फाटते.
 • मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे.
 • पनीर प्रेसमध्ये 15 मिनिट दाबून ठेवावे.
 • यानंतर पनीर तयार होते.
 • तयार पनीर 100 ते 200 ग्रॅमच्या वड्या पाडून फ्रीजमध्ये 8 दिवस टिकते.
 • सोया पनीर गाई-म्हशींच्या दूधापासून तयार केलेल्या पनीर सारखेच असते. जपानमध्ये ह पनीर टोफू म्हणून ओळखले जाते.

4) सोयापीठ

 • सोयापीठ गव्हाच्या पिठात मिसळून चपाती बनवितात.
 • पीठ वापरताना अन्नविषयक कायद्याचे पालन करावे.
 • सोयापीठ बनविण्यासाठी दाणे स्वच्छ धुवून घ्यावे.
 • धुतलेले सोयाबीन कापडी पिशवीत 8 ते 10 तास भरून ठेवावे.
 • सोयाबीनच्या दाण्यांचा आकार दुप्पट होतो.
 • भिजलेले सोयाबीन दाणे पाण्यात उकळून शिजवून घ्यावे.
 • शिजल्यानंतर पाणी काढून दाणे ट्रेमध्ये वाळण्यासाठी ठेवावे.
 • वाळलेले सोयाबीन हलींग मशीनमध्ये टरफल वेगळे करून ठेवावे.
 • टरफल वेगळे झालेल्या सोयाबीनला दळून पीठ तयार करावे.
 • पीठ चांगल्या बॅगमध्ये पॅकेजिंग करून ठेवावे.

सोयापीठापासून तयार पदार्थ

 • सोयाबीन पोहे
 • सोयाबीन डाळ
 • सोयाबीन शेवाया
 • सोयाबीन सतू मिक्स
 • फॅटरहीत सोयापीठ

5) सोया सॉस

 • सोयाबीन दाण्यातील फॅट काढून घेतल्यानंतर त्याचे पीठ करावे.
 • पिठात पाणी मिसळून मीठ, खाण्याचा सोडा, व्हिनेगार टाकून एकजीव करावा.
 • मिश्रण गाळून त्यातील अशुद्ध भाग वेगळा करावा.
 • शुद्ध मिश्रण विशिष्ट टँकमध्ये दोन तास ठेवावे.

सोयाबीनपासून बेकारी पदार्थ

 • सोयाकेक
 • सोयाबीन
 • सोया खारा व गोड बिस्किट्स
 • सोयाकुटकी बिस्किट्स

सोयाबीनचे नाष्टा व पदार्थ

 • सोयाचे भाजलेले दाणे
 • सायाशेव
 • सोया डोसा
 • सोया इडली
 • सोया चकली
 • सोया ढोकला
 • सोया सॉस

सोयाबीनचे दुग्ध पदार्थ

 • सोया दूध
 • सोया टोफू पनीर
 • सोया दही
 • सोया आईस्क्रिम
 • सोया रसगुल्ला
 • सोया श्रीखंड
 • सोया लोणी
 • सोया लस्सी

तक्ता क्र. 1 : सोयाबीनच्या पदार्थांमध्ये फॅट व प्रथिनांचे प्रमाण

घटक 100 ग्रॅम दूधप्रथिने (टक्के)फॅट (टक्के)
फॅटसहीत पीठ3920
मध्यम फॅट पीठ467
फॅटरहीत पीठ520.5
सोया सतू228
सोया दूध3.53.4
सोया श्रीखंड129
सोया आम्रखंड811
सोया पनीर149
सोया बिस्किट1224

स्त्रोत : गटशेती माहिती पुस्तिका, सोयाबीन प्रक्रिया, पृ. 104

सोयाबीनवर प्रक्रिया केल्यामुळे होणारे फायदे

 • सोयाबीनची मागणी व आवक वाढण्यास मदत होते.
 • ग्राहकांना सोयाबीनचे चांगले व उत्तम दर्जाचे पदार्थ मिळतील.
 • सोयाबीनचे मूल्यवर्धित पदार्थ हे मानवी आरोग्यास हिताचे असतात.
 • सोया पदार्थांना बाजारात वर्षभर चांगली मागणी राहील.
 • दीर्घकाळ सोया पदार्थ टिकवता येतील.
 • सोया प्रक्रिया उद्योगाला चालना मिळेल.
 • सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळेल.
 • सोयाबीन उत्पादनातून चांगल्या प्रकारे आर्थिक नफा कमावता येईल.

डॉ. योगेश वाय. सुमठाणे, (Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda), मो. 8806217979

Prajwal Digital

1 thought on “सोयाबीन : मूल्यवर्धित पदार्थ”

Leave a Reply