डॉ. योगेश सुमठाणे, (Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda), मो. 8806217979
गहू हे महाराष्ट्रातील ज्वारीनंतर महत्वाचे अन्नधान्य पीक आहे. भारतात एकूण अन्नधान्य उत्पादनाच्या जवळपास 3 टक्के वाटा गहू या पिकाचा आहे. सुमारे 75-80 टक्के गहू चपातीसाठी वापरला जातो. तसेच गव्हाचा उपयोग पाव, बिस्कीट, केक, शेवई इ. पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो.
देशातील गव्हाचे उत्पादन
देशाची वाढती लोकसंख्या आणि बदलती जीवनशैली यामुळे गव्हाचा वापर देशामध्ये वाढला आहे. गव्हाच्या लागवडीखालील क्षेत्र हे मात्र मर्यादित आहे. गव्हाची वाढती मागणी लक्षात घेता सन 2030 मध्ये गव्हाचे उत्पादन 100 दश लक्ष टन इतके होणे गरजेचे आहे; गतवर्षी सन 2020-21 गव्हाचे विक्रमी उत्पादन 97.44 दश लक्ष टन इतके झाले.
वाचा :
महाराष्ट्रातील गव्हाचे क्षेत्र 1.9 लाख हेक्टर एवढे असून उत्पादन 16.6 लाख टन इतके आहे. आपल्या भारत देशात गव्ह्याखाली 11.3 दशलक्ष हेक्टर क्षेत्र असून उत्पादन 15.91 दशलक्ष टन आहे. भारतातील गव्हाची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी 30.61 क्विंटल इतकी असून महाराष्ट्रात 15.21 क्विंटल इतकी आहे.
महाराष्ट्रातील गव्हाच्या कमी उत्पादकतेची कारणे :
महाराष्ट्रातील गव्हाची उत्पादनक्षमता ही देशाच्या उत्पादन क्षमतेपेक्षा खूप कमी आहे. महाराष्ट्रातील उत्पादकता कमी असण्याची बरीच कारणे आहेत. पूर्वी महाराष्ट्रात गव्हाचे बागायती क्षेत्र खूप कमी होते. परंतु आता बागायती क्षेत्र बरेच वाढलेले आहे. गव्हाच्या पिकाखालील बागायती क्षेत्रात जसजसी वाढ होत गेली तसतसे एकूण उत्पादन आणि सरासरी उत्पादकता वाढलेली आढळून आली आहे. यामध्ये अधिक उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या वाणांचा प्रमुख वाटा आहे.
- हलक्या ते मध्यम जमिनीत गव्हाची लागवड.
- गहू पिकासाठी शिफारशीत पाण्याच्या पाळ्यांचा अभाव
- पाण्याची उपलब्धता असल्यास इतर पीके घेण्याचा कल
- शिफारशीत वाणाची लागवड न करणे
- हवामानातील वेळोवेळी होणारे बदल
- शिफारशींपेक्षा कमी खतांचा वापर
- कीड व रोगाचा वाढता प्रादुर्भाव
- 15 डिसेंबरनंतर गव्हाची पेरणी करणे.
- नवीन प्रसारित वाणांच्या योग्य प्रतीच्या बियाण्याची उपलब्धता न होणे.
महाराष्ट्रातील गव्हाच्या उत्पादकता वाढीसाठी उपाय
महाराष्ट्रात गहू उत्पादनात चांगला वाव असून गव्हाचे प्रती हेक्टरी उत्पादन व उत्पादकता वाढविणे अत्यंत गरजेचे असल्याने गहू पिकाची प्रती हेक्टरी उत्पादन व उत्पादकता वाढीसाठी योग्य ते उपाय खालील प्रमाणे सुचविण्यात येत आहेत.
- जमिनीची योग्य निवड करून व शेणखतांचा वापर करावा.
- शिफारशीत दर्जेदार वाणाची निवड करावी.
- पेरणी पूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.
- सुधारित पद्धतीने गहू पिकाची पेरणी करावी.
- गहू पिकासाठी खत व पाण्याचे व्यवस्थापन करावे.
- गहू पिकांवरील कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन करावे.
- काढणपश्चात्त सुधारित तंत्राचा अवलंब करावा. उदा. कंबाईन हार्वेस्टर
डॉ. योगेश सुमठाणे, (Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda), मो. 8806217979
गहू कमी उत्पादकता, कारणे आणि उपाय हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावा. नवीन पोस्टची चालू अप्डेट ई-मेल किंवा Push Notification द्वारे मिळविण्यासाठी Modern Agrotech ला सब्सक्राईब करावे.
वाचा :