सर्वांना मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा !
तीळ हे महत्त्वाचे विशेष औषधी गुणधर्म असणारे तेलवर्गीय पीक आहे. तिळाचा पश्चिमी व मध्यपूर्वेकडील देशांतील खाद्यपदार्थात याचा वापर संपूर्ण तीळ वा कुट करुनही होतो. त्याने पदार्थास एक प्रकारचा सुवास येतो. याचा वेगवेगळ्या चटण्या करण्यासाठी सुद्धा वापर होतो.
बेकरी उत्पादने व पदार्थातही याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मणीपुर, नागालॅंड, आसाम येथे याचा भरपूर वापर होतो. भारतातल्या अनेक प्रदेशातही हा मुबलक प्रमाणात भोजनात व खाद्यपदार्थात वापरल्या जातो. प्रसिद्ध तिळगुळ यापासुनच बनतो.
तिळाच्या पोषक तत्त्वाचा विचार केल्यास तिळाच्या 100 ग्रॅम बियांमध्ये जलांश 5.8 टक्के, प्रथिने 20 टक्के, कर्बोदके 11 टक्के, स्निग्ध पदार्थ (तेल) 60 टक्के, कॅल्शियम 1 टक्के, आणि फॉस्फरस 0.7 टक्के असता त्यामुळे तीळास विशेष गुणधर्म प्राप्त झालेले आहेत.
अन्य कोणत्याही तेलबियांच्या तुलनेत तिळाच्या बियांमध्ये अधिक तेल असते. या तेलात इतर कोणत्याही तेलात नसलेले सिसॅमीन, सिसॅमोलीन आणि सिसॅमॉल ही प्रति ऑक्सिडीकारके असतात. त्यामुळे तिळाचे तेल दीर्घकाळ खवट न होता टिकून राहते. तिळाच्या तेलात, सूर्यफुलांच्या बियांच्या तेलाप्रमाणे, ओमेगा-6 मेदाम्ले असतात; मात्र, ओमेगा-3 हे मेदाम्ल नसते.
तिळाचे औषधी गुणकारी गुणधर्म :
- तिळाची मुळे, पाने, बिया व बियांतील तेल उपयुक्त असते.
- मुळे, पानांचा अर्क केसांच्या वाढीसाठी व ते काळे करण्यासाठी वापरतात.
- मूळव्याध, व्रण, भाजणे व हगवण अशा विकारांत तिळाचे तेल उपयोगी असते.
- पांढरे डाग आणि त्वचेचा दाह कमी करण्यासाठी कोरड्या त्वचेवर हे तेल वापरतात.
- अनेक व्यंजनात तिळाच्या तेलाचा उपयोग केला जातो.
- तिळापासून तीळपापडी व तीळगूळ असे अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार करतात.
- केसांना तिळाच्या तेलाने मालिश केल्याने पातळ, निर्जीव आणि स्प्लीट एंड्सयुक्त केसांना नीट करता येतं. जर तिळाच्या तेलामध्ये ब्राह्मी किंवा अन्य काही आयुर्वेदीक औषधी घातल्यास खूप फायदा मिळतो.
- कंबर आणि पाठदुखीच्या परिस्थितीत तिळाच्या तेलात हिंग आणि मीठ मिक्स करून मालिश केल्यास नक्कीच फायदा होईल.
Very important info share . Thanks
Thanks for interest