शाश्वत विकासासाठी एकात्मिक शेती पद्धती

ग्रामीण व‍िकासात कृषी क्षेत्राचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. एकापेक्षा जास्त शाश्वत उत्पन्न देणारे मार्ग ग्रामीण व‍िकासात एकात्म‍िक शेती पद्धतीतून न‍िर्माण होत आहेत. याचा फायदा शेतकरी बांधवांना होणार आहे. तसेच शेतीचा व‍िकास चांगल्या प्रकारे होऊ शकेल त्यातून शेतकरी सुजलाम् सुफलाम् होऊ शकेल, याच उद्देशाने शाश्वत विकासासाठी एकात्मिक शेती पद्धती चा अवलंब करणे न‍ितांत गरजेचे आहे.

वाचा :

तुती बागेची वळण व छाटणी व्यवस्थापन

तुती अभिवृद्धी, बेणे निर्मिती व प्रक्रिया

तुती पाला उत्पादनाचे सुधारित वाण

रेशीम शेती एक किफायतशीर व्यवसाय

एकात्मिक शेती पद्धती म्हणजे काय?

ग्रामीण भागामध्ये काही पिके, त्यावर आधारित पशू-पक्षिपालन, छोटेमोठे व्यवसाय अशी एकमेकांमध्ये गुंफलेली, एकमेकांवर अवलंबून, एकमेकांशी जोडलेली संरचना निर्माण झालेली असते. त्याला एकात्मिक शेती पद्धती असे म्हणतात.

थॉमस जेफरसन यांच्या मते, शेती हा आपला सर्वांत शहाणपणाचा व्यवसाय असून, त्यातून अंतिमत: सर्वांत खऱ्या संपत्तीची, नैतिक मूल्यांची आणि आनंदाची निर्माण होत असते. अशा एकमेकांवर अवलंबून असलेल्या शेतीला एकात्मिक जैव प्रणाली किंवा शेती म्हणून ओळखले जाते.

एकात्मिक शेती पद्धतीचे महत्त्व

 • सुयोग्य प्रकारे एकात्मिक शेती पद्धतीतून माती, पर्यावरण आणि एकूणच आसमंतावर होणाऱ्या विपरीत परिणामांचे विरेचन होत असते. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनशैलीमध्ये ती आजवर मुरुन गेली होती. मात्र दरडोई शेतीचे क्षेत्र कमी होत असून, भारतातील ८२ टक्के शेतकऱ्यांकडे २.५ एकारांपेक्षाही कमी जमीन राहिली आहे.
 • या स्थितीमध्ये अधिक अन्नाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने १९६० नंतरच्या काळामध्ये हे एकमेकांमध्ये गुंफलेले धागे नव्या पद्धती, तंत्रज्ञान आणि यांसारख्या विविध कारणांमुळे विरळ होत गेले.
 • या शेतकऱ्यांकडे बियाणे, खते, कीडनाशके अशा निविष्ठांच्या खरेदीसाठी किंवा आवश्यकतेनुसार मजुरी देण्यासाठीही क्षमता (ऐपत) राहिलेली नाही. हे केवळ भारतात झाले असे नाही, तर जगाच्या विविध भागांमध्ये हेच परिणाम दिसून येत आहेत.
 • भारतामध्ये एकात्मिक शेतीही काही नवीन नाही. ती पुर्वापार आपल्या जीवन शैलीचा एक भाग होती. आत्यंतिक रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती या दरम्यान एक प्रारुप विकसित करण्याचा पर्यायी प्रयत्न 1943 च्या सुमारापासून सुरु झाला. मात्र त्याचा योग्य विकास आणि डोळस अंगीकार याकडे दुर्लक्ष झाले.
 • एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब शेतकऱ्यांनी केल्यास न‍िश्च‍ितपणे शाश्वत उत्पन्नात स्थ‍िरता आणणे शक्य होते त्यामुळे एकात्मिक शेती पद्धती करणे ही आजच्या काळाला खूप गरज बनली आहे.
 • शेतीचे उत्पन्न वाढव‍िण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे आर्थ‍िक सशक्तीकरण होण्यासाठी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब शेतकऱ्यांनी करणे क्रमप्राप्त ठरेल.

एकात्मिक शेती पद्धती का करावी?

 • देशाची वाढती लोकसंख्या याचा व‍िचार करता सन 2025 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या प्रक्रियेमध्ये याचा समावेश केला पाहिजे. त्यातून शेती हा एक फायदेशीर व शाश्वत व्यवसाय होत शकत असल्याचे मत मणिपूर येथील केंद्रीय कृषी विद्यापीठाचे कुलगुरु एम. प्रेमजित यांनी मांडले होते.
 • अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या 2.6 हेक्टर क्षेत्रातून वार्षिक सुमारे 16 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न एकात्मिक शेती पद्धतीतून मिळू शकते. आपण  मधमाश्यांना आणि मधमाशीपालकांना शेतीतून वगळले तर शेतीचे उत्पादन कसे वाढणार ? आपण आजवर प्रत्येक गोष्ट वेगळी वेगळी पाहज आलो आहोत.
 • मेघालयातील केंद्रीय कृषी विद्यापीठातील अधिष्ठाता यू. के. बेहेरा यांनी आपल्या लेखात नोंदवलेल्या माहितीनुसार, एकात्मिक शेती पद्धती हे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे साधन ठरणार आहे.
 • शेती पद्धतीची कार्यक्षमता 2 ते 3 पटीने वाढून, विविध स्त्रोतांमध्ये 40 ते 60 टक्क्यांपर्यंत घट होणार आहे. ग्रामीण भागामध्ये रोजगाराची साधने उपलब्धता होण्यासोबत कुटुंबाच्या पोषकतेची सुरक्षितताही साधणार आहे.
 • कृषी शास्त्र संचालनालयाचे सदस्य असलेल्या डॉ. व्ही. एल. मधुप्रसाद हे आधुनिक एकात्मिक शेती पद्धतीचे जनक मानले जातात. आंतरराष्ट्रीय मानक व मानांकन संस्थांनी त्यांचा या कामासाठी सन्मान केला आहे.
 • भारत सरकारने 2021-22‍ चा आथिक वर्षासाठी सुमारे 225.5 कोटी रुपयांची तरतूद एकात्मिक शेती पद्धतीच्या प्रसारासाठी ठेवली होती.

वाचा :

बांबू आणि ऑक्सिजन

बांबूवरील रासायनिक पद्धती

बांबू लागवड संक्षिप्त माहिती

बांबू रोपवन व लागवड

बांबू लागवडीचे महत्त्वपूर्ण पैलू

बांबू लागवड

एकात्मिक शेती संकल्पना :

 • शेतीसोबत पशुपालन (गाय, म्हैस, वराह, शेळया, मेंढ्या अशा स्थानिक प्राण्यांचा समावेश) पक्षिपालन (कोंबडी, बदक, टर्की, ससा इ.) मत्स्यपालन (मासे, कोळंबी, कालवा किंवा शिंपले, मोती उत्पादन इ.), पोल्ट्री, अळिंबी उत्पादन, मधमाशीपालन आणि काही प्रमाणात फळबाग यांची सांगड घालणे.
 • प्रत्येक घटकातून तयार होणारे टाकाऊ सेंद्रिय घटक योग्य प्रक्रियेनंतर पुन्हा शेतीमध्ये वापरणे. उदा. बायोगॅस निर्मितीनंतर स्लरीचा वापर शेतांमध्ये करणे इ.
 • शेतीमध्येही मिश्रपीक, आंतरपीक पद्धती, पिकांमध्ये शास्त्रीय बदल करणे, सापळा पिके, सजीव कुंपणे यांचा समावेश केला जातो.
 • पाणी, पोषक घटक आणि अवकाशांचा कार्यक्षम वापर करणे. त्यातून पिकांवर येणाऱ्या जैविक आणि अजैविक ताणांचे विरेचन करणे.
 • विविध शेतीपूरक दुग्धव्यवसाय, शेळीपालन, मेंढीपालन, कुक्कुटपालन इ. व्यवसायातून वर्षभर उत्पन्न मिळत राहील, याची व्यवस्था करणे.
 • भात शेती फुलोऱ्यात असताना आलेल्या फॅलीन वादळाने पिकांचे नुकसान झाले तरी कुटूंबाला दुग्ध व्यवसाय, ताग, मत्स्यपालन यातून काही प्रमाणात उत्पन्न मिळाल्याने वर्षभर तग धरणे शक्य झाले. त्या वेळी जे शेतकरी केवळ शेतीवर अवलंबून होते, त्यांच्या आर्थिक क्षमता शून्यावर आल्या होत्या. एकात्मिक शेती पद्धतीच्या प्रारुपानुसार 20 ते 30 टक्क्यांनी उत्पन्न वाढत असल्याचे पुढे आले आहे.

वाचा :

आदर्श कृषि सेवा केंद्राची निवड

प्लँट लायब्ररी – Plant Library

गटशेतीचे प्रभावी व्‍यवस्‍थापन तंत्र

जागतिक पातळीवरील एकात्मिक शेती :

जगातील व‍िकस‍ित व व‍िकसनशील देशात एकात्म‍िक शेती पद्धतीचा अवलंब केला जात आहे. अनेक युरोपियन आणि आशियायी देशांमध्ये एकात्मिक शेती पद्धती विकसित झाल्या आहेत. त्यातील अनेक पद्धती सद्य:‍स्थ‍िती आणि भविष्यात येऊ घातलेल्या हवामान बदलाच्या संकटामध्ये अधिक लोकसंख्येसाठी अन्नधान्य उत्पादनाच्या अनुषंगाने उपयुक्त ठरणार आहेत. आशिया आणि आफ्रिकेतील शेतकऱ्यांनी पशुपालनाची सांगड शेतीशी घातली आहे. त्यातून त्यांच्या उत्पन्नामध्ये शाश्वत वाढ झाली आहे.

सर्वसाधारणपणे एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब केल्यानंतर दोन ते तीन वर्षांमध्ये मातीची सुपीकता वाढून उत्पादनामध्ये वाढीला सुरुवात होते. त्याची बाजारपेठेशी सांगड घातल्यास कुटुंबाच्या उत्पन्नांमध्ये वाढ होते. पोषकतेची गरज चांगल्या प्रकारे भागू शकते.

एकात्मिक शेतीची वैशिष्टये :

 • स्थाननिहाय पर्यावरणपूरक बदल
 • संवर्धन प्रणाली
 • जैविक खतांचा वापर
 • पीक बदल
 • शून्य मशागत तंत्र
 • रासायनिक खते, कीटकनाशकांचा किमान किंवा शून्य वापर.

एकात्मिक शेतीची फायदे :

 • शाश्वत व‍िकास होण्यास मदत होईल.
 • एकापेक्षा जास्त मार्गाने उत्पन्न म‍िळव‍िणे शक्य होईल.
 • शेतीपूरक उद्योग व व्यवसायास चालना मिळेल.
 • लागवडीअयोग्य जमिनीचा वापर उत्पादनासाठी होऊ शकेल.
 • ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी न‍िर्माण होतील.

संदर्भ :- सकाळ ॲग्रोवन, शनिवार 16 जानेवारी 2021

श्री. वाणी एन., (एसबीआय-आर.बी., हैद्राबाद येथे संशोधन  व्यवस्थापक आहेत.)

Prajwal Digital

Leave a Reply