व्याज सवलत योजना (ISS) पुन्हा लागू

डॉ. योगेश सुमठाणे, (Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda), Mob.No. 8806217979

तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज वेळेत फेडणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने अखेर मागे घेतला आहे. आता दोन टक्क्यांऐवजी दीड टक्क्यांपर्यंत व्याज सवलत देण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

व्याज सवलत योजना बंद करण्यात येत असल्याचे केंद्राने काही महिन्यापूर्वी घोषित केले होते. त्यामुळे वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के दरात तीन लाखांपर्यंतचे देता येणार नाही, असे देशातील जिल्हा बँकांच्या लक्षात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुधारित व्याज सवलत योजनेस मान्यता दिली गेली. 2022 ते 2025 या कालावधीसाठी अल्पमुदत शेतीकर्ज पुरवठ्यासाठी 34,856 कोटी रूपयांचा व्याज सवलत मिळणार आहे. मात्र ही सवलत दोन ऐवजी आता केवळ दीड टक्के मिळेल.

केंद्राच्या योजनेची कोणती वैशिष्ट्ये…

  • तीन लाखांपर्यंतचे अल्पमुदत पीककर्ज वेळेत फेडल्यास दीड टक्का व्याज सवलत.
  • व्याज सवलत योजनेचे (ISS) नाव आता सुधारित व्याज सवलत योजना असेल.
  • ही कर्ज योजना पशुसंवर्धन, डेअरी, मत्स व कुक्कुट उद्योगातील शेतकऱ्यांना लाभ होईल.
  • व्याजाचा दर सात टक्के असेल. मात्र त्यात 3 टक्के तत्काळ परतफेड सवलत असेल. म्हणजेच वेळेत कर्ज फेडल्यास फक्त 4 टक्के दराने कर्ज उपलब्ध होईल.

व्याज सवलत योजनेचे फायदे :

या निर्णयाचा लाभ सार्वजनिक-खाजगी क्षेत्रातील बँकांना होणार आहे. लहान पतपुरवठा बँका, क्षेत्रीय ग्रामीण बँका, सहकारी बँक आणि संगणीकृत प्राथमिक कृषी पतपुरवठादार संस्थांमार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणार अहे.

(टीप : सदर व्याज सवलत योजनेतील सविस्तर वैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित आपल्या सोसायटी अथवा बँकांशी संपर्क साधावा.)

डॉ. योगेश सुमठाणे, (Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda), Mob.No. 8806217979

वाचा :

Prajwal Digital

Leave a Reply