काढणीपूर्वी कांद्याची प्रक्रिया कशी करावी

कांदा हा आपल्या दैनंदिन आहारात व विविध पदार्थ बनविण्यासाठी वापरला जाणारा महत्त्वाचा घटक आहे. कांद्यामध्ये असणारे विविध गुणधर्म, पौष्टिकता व व्यवसायिक कांदा उत्पादनातील संधी या बाबींचा विचार केल्यास कांदा ‍पिकास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. परंतु कांदा काढणीपश्चात्त प्रक्रिया न केल्यामुळे कांद्याची गुणवत्ता व प्रत खराब होऊन मोठ्या प्रमाणावर कांद्याचे नुकसान होते, परिणामी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना मोठे आर्थिक सहन करावे लागते. सदर नुकसान टाळण्यासाठी कांदा काढणीपूर्व प्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे आहे.

काढणीपूर्वी कांद्याची प्रक्रिया कशी करावी या लेखामध्ये आपणासकांद्यावर काढणीपूर्व कोणत्या प्रक्रिया कराव्या लागतात याची माहिती मिळेल. काढणीपूर्व प्रक्रिया केल्याने कांद्याच्या दर्जावर आणि साठवणक्षमतेवर काय परिणाम झाला याची माहिती मिळेल. काढणीपूर्व प्रक्रिया ही कांदा पिकासाठी आर्थिकदृष्ट्या कशी फायदेशीर आहे हे समजेल.

कांदा काढणीपूर्व प्रक्रिया का करावी?

कांद्याची वर्षभर गरज भासत असल्याने साठवण करून कांद्याचा पुरवठा सातत्याने होणे आवश्यक आहे. कांद्यामध्ये काळजी घेतली नाही तर काढणीनंतर कांदे खराब होऊन साठवणीत अधिक नुकसान होते. पर्यायाने आर्थिकदृष्ट्या नुकसान होते. एकदा कांदे काढले की त्यांची सुकवणी महत्त्वाची असल्याने सहसा काढणीपूर्वीच प्रक्रिया करून कांद्याचे साठवणीनंतर होणारे नुकसान कमी करता येते. यासाठी खालील प्रमाणे काढणीपूर्व प्रक्रिया करावी.  

  • काढणीच्या 10 व 20 दिवस अगोदर 0.1% कार्बेडेझीम या बुरशीनाशकाची फवारणी साठवणीतील सड कमी करण्यासाठी करावी.
  • काढणीच्या 15 दिवस अगोदर माना पडायला सुरवात झाल्यावर 2,500 पीपीएम तीव्रतेचे मॅलिक हायड्रेझाईड फवारल्याने साठवणीत मोड येण्यास विलंब होतो आणि मोड येण्याचे प्रमाण कमी होते.
  • काढणीच्या 10 – 15 दिवस अगोदर पाणी देणे बंद केल्याने कांद्याच्या माना बारीक होतात, कांदे पक्व होतात. कांद्याचे वरचे आवरण घट्ट बनते. कांदे काढल्यानंतर माती निघून जाते. मुळया कमजोर होऊन पडतात, आणि कांद्यांना चांगला रंग येतो व असे कांदे साठवणीत अधिक चांगले टिकतात.
  • कांद्याची काढणीपूर्व प्रक्रिया केल्याने कांद्याचा दर्जा सुधारून साठवणीतील मोड येण्यामुळे, सडीमुळे आणि वजनातील घट यांमुळे होणारे नुकसान कमी करण्यात मदत होते.

कांदा प्रक्रियेचे आवश्यक साहित्य

कांद्याचे शेत, फवारणीचा पंप, बाविस्टीन बुरशीनाशक, सँडोव्हिट स्टिकर, मॅलिक हायड्झार्डड, पाणी, मोजण्याची साधने, कांदे साठवणीसाठी प्लॅस्टिकच्या क्रेट्स्, वजने करण्यासाठी तराजू आणि वजने इत्यादी.

कांदा काढणीत्तर प्रक्रिया कशी करावी?

  • कांद्याची लागवड केल्यानंतर 3 महिन्यांचे पीक निवडावे. पिकामध्ये कंदांची वाढ चांगली झाली आहे याची खात्री करून घ्यावी. अशा पिकाचे 100 वर्गमीटरचे दोन भाग निवडावे.
  • पिकाचे निरीक्षण करून माना पडण्यास सुरुवात झाली आहे काय याचे निरीक्षण करावे.
  • लागवडीची तारीख कोणती आहे हे पाहून त्यानुसार काढणीची अपेक्षित तारीख ठरवावी. 100 वर्गमीटरच्या एका भागावर या तारखेच्या 20 दिवस अगोदर सायंकाळच्या वेळी 0.1% बाविस्टीनचे द्रावण फवारावे. यासाठी दर 10 लीटर पाण्यात 10 ग्रॅम बाविस्टीन व 6 मिली. सँडोव्हिट चिकटद्रव्य मिसळावे. 100 वर्गमीटरच्या दुसऱ्या भागावर फवारणी करू नये.
  • 5 दिवसानंतर फवारणी केलेल्या भागामधील पिकावर 2,500 पीपीएम तीव्रतेच्या मॅलिक हायड्झाईडची फवारणी करावी. यासाठी 10 लीटर पाण्यात 25 ग्रॅम मॅलिक हायड्झाईड व 6 मिली. स्टिकर मिसळून फवारावे.
  • आणखी 5 दिवसांनतर परत 0.1% बाविस्टीनची फवारणी करावी आणि पिकाला पाणी देणे बंद करावे.

कांदा काढणीपूर्व प्रक्रिया केल्यामुळे होणारे फायदे

  • कांदा काढणीपूर्व बुरशीनाशकाची प केल्यामुळे साठवणुकीत कांदा कमी प्रमाणात सडतो.
  • कांदा साठवणीत मोड येण्यास विलंब होतो आणि मोड येण्याचे प्रमाण कमी होते.
  • काढणीपूर्व पाणी देणे बंद केल्याने कांद्याच्या माना बारीक होतात.
  • कांदे चांगल्या प्रकारे पक्व होतात.
  • कांद्याचे वरचे आवरण घट्ट बनते.
  • कांद्यांना चांगला रंग येऊन कांदे साठवणीत अधिक चांगले टिकतात.
  • कांद्याची काढणीपूर्व प्रक्रिया केल्याने कांद्याचा दर्जा व गुणवत्ता सुधारतो.
  • कांदा साठवणुकीत मोड, सड आणि वजनातील घट यांमुळे होणारे नुकसान कमी होते.
  • बाजारा कांद्याची आवक व दर वाढण्यास मदत होते.
  • कांदा प्रतवारी करण्यास सुलभ होतो.

काढणीपूर्वी कांद्याची प्रक्रिया कशी करावी हा लेख आपणास आवडला असल्यास लाईक करावे व आपल्या जवळील मित्रांपर्यंत शेअर करून सहकार्य करावे.

Prajwal Digital

2 thoughts on “काढणीपूर्वी कांद्याची प्रक्रिया कशी करावी”

Leave a Reply