ब्रुसेल्स स्प्राऊट उत्पादन तंत्रज्ञान

स्प्राऊट म्हणजे फुटवे, फुटव्यांपासून तयार झालेले पानांच्या बगलेतील अनेक गड्डे. मधल्या गड्याव्यतिरिक्त बगलेत बरेच गड्डे ब्रुसेल्स स्प्राऊट मिळतात. कोबीवर्गीय पिकांमध्ये ब्रुसेल्स स्प्राऊट या पिकांची नुकतीच भारतात लागवड करायला सुरुवात झाली आहे; तीही मोठ्या शहरांना आणि मोठ्या हॉटेल्सला पुरवठा करण्यासाठी. सर्वसामान्य लोकांमध्ये अजून या भाजीविषयी आवड निर्माण झाली नाही.

प्रस्तुत लेखामध्ये आपणास ब्रुसेल्स स्प्राऊट भाजीपिकाच्या लागवडीची माहिती होईल. या पिकाच्या जातींची माहिती होऊन, आपल्याकडे आर्थिक उत्पादनाकरिता कोणत्या योग्य जातींची लागवड करावी हे समजेल.

ब्रुसेल्स स्प्राऊटचे महत्त्व

कोबीवर्गातील ब्रुसेल्स स्प्राऊट ही पिक नुकतीच भारतात लागवडीखाली आली आहे. तीही मोठ्या शहरातील हॉटेल्सची मागणी पूर्ण करण्यासाठी. या भाज्यांमध्येसुद्धा कोबीवर्गातील इतर पिकांसारखे पोषक अन्नघटक आहेत. ब्रुसेल्स स्प्राऊट या भाजीची झाडे 2-3 फुटांपर्यंत सरळ वाढतात. लांब देठाच्या पानांच्या बगलेतील डोळ्यांचे लहान गड्यांत रूपांतर होते. याच लहान लहान गड्यांची भाजी करतात. याच गड्याची भाजी करतात. हा मधला गड्डा काढल्यानंतर पानांच्या बगलेत परत लहान लहान गड्डे धरतात.

ब्रुसेल्स स्प्राऊट हवामान कसे असावे ?

कोबीवर्गातील पिकासारखेच या भाजीपिकांना थंड हवामान चांगले मानवते; म्हणून ब्रुसेल्स स्प्राऊट या  पिकाची लागवड हिवाळ्यात करतात. गड्डे पोसण्याच्या काळात चांगले थंड हवामान आवश्यक आहे.

ब्रुसेल्स स्प्राऊट जमीन कशी असावी ?

या पिकासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी पोयट्याची सुपीक जमीन निवडावी. हलक्या जमिनीत लागवड करायची झाल्यास सेंद्रिय खाते वापरावीत.

ब्रुसेल्स स्प्राऊटचे उन्नत वाण

ब्रुसेल्स स्प्राऊटमध्ये खूप प्रकार आहेत. शेतकरी आवडीनुसार त्यांची लागवड करतात. मुख्यत्वे बुटक्या आणि उंच जाती असे दोन प्रकार प्रचलित आहेत.

1) बुटक्या जाती : बुटक्या जातींची उंची 50-60 सेंमी. आसपास असते. यात लवकर येणारा इंग्रव्हड लाँग आइसलँड हा वाण बराच लोकप्रिय आहे. अर्ली मॉर्न, ड्वार्फ इंप्रुव्हड, क्विक, फ्रीअर हे इतर लवकर येणारे वाण आहेत. बुटक्या जातींमध्ये बगलेतील गड्ड्यांमधील कमी अंतरामुळे काढणीस त्रास होतो. जॉडे क्रॉस आणि जॅपनीज एफ – 1 हे संकरित वाण लवकर, अधिक उत्पादन देणारे तसेच एका काढणीतच पूर्ण पीक निघण्यासाठी प्रचलित आहेत.

भारतात लागवडीसाठी दोन वाणांची शिफारस केली आहे. यांपैकी हाईडस् आईडोअल जातीची उंची 50 ते 60 सेंमी. असून प्रत्येक झाडापासून 45-55 घट्ट गड्डे (स्प्राउट), व्यास 78 सेंमी., चांगला स्वाद असणारे, 115 दिवसांत तयार होतात. हा वाण 3-4 तोडे देतो. बियांचे उत्पादन हेक्टरी 4 ते 5 क्विंटल मिळते. दुसरी जात ब्रुसेल्स ड्वार्फची उंची 50 सेंमी., लवकर येणारी आणि ज्या ठिकाणी योग्य हवामान कमी कालावधीसाठी मिळते तिथे लागवडीसाठी योग्य जात आहे. एका काढणीतच बहुतेक पूर्ण पीक निघते.

2) उंच जाती : या जाती इंग्लंडमध्ये जास्त लावल्या जातात; कारण तिथे लागवडीचा हंगाम मोठा असतो. यांचे सगळे वाण बाहेरील आहेत. अशा आयरिश एलेगन्स, शेरारडीअन (आयरिश जाती), केंब्रिज – 1 या सर्व मोठ्या गड्यांच्या जाती आहेत. युरोपमध्ये लहान गड्यांच्या, 4 सेंमी. व्यासाच्या, जशा ब्रेडा (नेदरलँड), वेबुलस रॅपिड (स्वीडन), विल्हेमबर्ग (जर्मनी) आणि फिक्कट हिरव्या गड्ड्यांच्या जाती आहेत. युरोपमध्ये सध्या सर्वच कंपन्या संकरित वाण जसे जाडे क्रॉस (जपान), डोरमन, अल्काझार, मेरलॉन, पोस्टर, रॅम्पार्ड, फॉस्ट्रेस सोनोरा, बाडोसा यांचा प्रसार करीत आहेत.

ब्रुसेल्स स्प्राऊट रोपे कसे तयार करावे

इतर कोबीवर्गीय पिकासारखेच ब्रुसेल्स स्प्राऊट यांचे बी गादीवाफ्यावर पेरून रोपे तयार करतात. गादीवाफ्यावर रोपे फुलकोबीच्या रोपासारखीच काळजी घेऊन तयार करतात. 4 ते 6 आठवड्यांची रोपे पुनर्लागवडीसाठी वापरतात.

ब्रुसेल्स स्प्राऊट हंगाम, बियाण्याचे प्रमाण किती ठेवावे ?

उत्तर भारतात ब्रुसेल्स स्प्राऊटचे ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये पेरतात. रोपे 4 ते 6 आठवड्यांची झाली म्हणजे पुनर्लागवड करतात. ब्रोकोलीचे लागवडीसाठी हेक्टरी 300-400 ग्रॅम बियाणे लागते. पेरणीपूर्वी एक किलो बियाण्यास 2 ग्रॅम थायरम हे औषध लावावे.

ब्रुसेल्स स्प्राऊट लागवडीचे अंतर किती ठेवावे ?

ब्रुसेल्स स्प्राऊटची रोपे 60 ते 70 X 60 ते 70 सेंमी. अंतरावर लागतात. उंच आणि मोठ्या गड्यांच्या जाती जास्त अंतरावर म्हणजे 90 X 90 सेंमी. लावतात.

ब्रुसेल्स स्प्राऊट लागवड पद्धत

तयार केलेल्या शेतात सरी-वरंब्यावर फुलकोबी पिकासारखीच लागवड करतात.

ब्रुसेल्स स्प्राऊटचे खते आणि पाणी व्यवस्थापन कसे करावे ?

ब्रुसेल्स स्प्राऊट या पिकास फुलकोबीप्रमाणेच हेक्टरी 30-40 टन शेणखत, 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे. शेणखत जमिनीमध्ये मशागतीच्या वेळी मिसळावे. स्फुरद व पालाशाची पूर्ण मात्रा रोपलागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी बांगडी पद्धतीने देऊन लगेच पाणी द्यावे. जमिनीचा प्रकार, हंगाम लक्षात घेऊन 6 ते 8 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

ब्रुसेल्स स्प्राऊटची आंतरमशागत कधी करावी ?

ब्रुसेल्स स्प्राऊटची नियमितपणे तण काढून शेत स्वच्छ ठेवावे. पहिली खुरपणी 3-4 आठवड्यांनी करावी. नंतर आवश्यकतेनुसार खुरपण्या कराव्यात. पिकांची मुळे उघडी पडत असल्यास खुरपणीच्या वेळी मातीची भर द्यावी. तणांच्या बंदोबस्तासाठी रासायनिक तणनाशकांचा वापर करावा. लागवडीपूर्वी शेतात हेक्टरी 2 किलो बासालीन हे तणनाशक जमिनीवर फवारावे.

ब्रुसेल्स स्प्राऊटची काढणी कधी करावी?

ब्रुसेल्स स्प्राऊटिंग मध्ये जातीनुसार गड्डे 15 ते 25 सेंमी. आकाराचे तर वजनाने 250 ते 500 ग्रॅमपर्यंत असतात. पुनर्लागवडीनंतर 45-55 दिवसांत गड्डे काढणीस तयार होतात. गड्डा घट्ट असतानाच डोळे फुटायच्या आत ते काढावेत अन्यथा गड्डयातून डोळे फुटून फुटवे बाहेर येतात.  

ब्रुसेल्स स्प्राऊटमध्ये बी लागवडीपासून जातीनुसार 100 ते 120 दिवसांत गड्डे काढणीस तयार होतात. याच वेळी गड्डे विशेषत: सर्वांत खालचा गड्डा विशिष्ट आकाराचा आणि घट्ट असतानाच काढावा. बुटक्या आणि लवकर येणाऱ्या वाणांमध्ये दोन तोडे तर उंच जातींमध्ये बरेच दिवसांपर्यंत तोडे मिळत राहतात. गड्डे नेहमी घट्ट असताना, हिरवे आणि त्यांच्या वरची पाने गुंडाळलेली असतानाच काढावीत. फिक्कट हिरवी वा पिवळी आणि वरची पाने उमललेले, मोकळे असलेले गड्डे कमी प्रतीचे समजले जातात. 2.5 ते 5 सेंमी. आकारचे गड्डे लुसलुशीत कोवळे आणि चांगले समजले जातात.

ब्रुसेल्स स्प्राऊटचे उत्पादन ब्रुसेल्स स्प्राऊटचे हेक्टरी उत्पादन 50 ते 100 क्विंटल मिळते.

डॉ. योगेश सुमठाणे, (Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda), Mob.No. 8806217979

ब्रुसेल्स स्प्राऊट उत्पादन तंत्रज्ञान हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

Prajwal Digital

Leave a Reply