कुक्कुटपालन व्यवसाय कसा करावा ?

कोंबडी हे अंडी देणारे नैसर्गिक यंत्र आहे; परंतु ते कसे हाताळावे, त्याची निगा कशी राखावी, वगैरेचे ज्ञान व्यवसायिकांना असणे गरजेचे आहे. त्याशिवाय बाजारात मिळणाऱ्या कोंबड्यांच्या जातीविषयी, त्यांच्या रोगाविषयी व प्रतिबंधक उपायांविषयी माहिती असणे जरुरीचे आहे. जर आपणास कोंबडीच्या जातीविषयी कल्पना असेल तर आपल्या फार्मसाठी चांगल्या कोंबड्या निवडून व्यवसाय अधिकाधिक फायदेशीर होईल.

कुक्कुटपालन व्यवसाय कसा करावा या लेखामध्ये आपणास कुक्कुटपालन व्यवसाय करण्याचे उद्देश मा‍ह‍िती होईल. कुक्कुटपालन व्यवसायाचे शास्त्र व कुक्कुटपालन व्यवसायाचे फायदे याबद्दल माह‍िती म‍िळेल.

कुक्कुटपालन व्यवसाय करण्याचे उद्देश

  • कुक्कुटपालन व्यवसायाचे मूळ उद्दिष्ट आहे की, स्वयंपाक घरातील कचरा, पडलेले धान्य, किडे, जंत, मऊ पाने इत्यादी नैसर्गिक अन्नपदार्थांचा अपव्यय घरच्या अंगणातील कुक्कुटपालनाद्वारे पुनर्वापर करणे आणि त्यांचे अत्यंत पौष्टिक अंडी आणि कुक्कुट मांसामध्ये रूपांतर करणे.
  • मानवी अन्न साखळीत प्रवेश करणे आणि प्रथिने कुपोषण कमी करणे आणि /आदिवासी भागात अंडी आणि मांसाची उपलब्धता सुनिश्चित करणे.
  • ग्रामीण भागातील तरूण शेतकरी बांधवांना शेतीपूरक जोडधंदा क‍िंवा शेतीपूरक व्यवसाय न‍िर्माण करण्याची संधी उपलब्ध करणे.
  • ग्रामीण भागातील वाढलेली बेरोजगारी व स्थलांतरीत होण्याचे प्रमाण कमी करणे.
  • शेतीला एक शाश्वत व्यवसाय न‍िर्माण करून कुटुंबाची आर्थ‍िक स्थ‍िती उंचावणे.
  • कुक्कुटपालन व्यवसायासंबंधी असणाऱ्या व‍िव‍िध शासकीय योजनांचा लाभ घेणे.

कुक्कुटपालन व्यवसायाचे शास्त्र काय सांगते?

कुक्कुटपालन व्यवसायात योजनाबद्ध आखणीस फार महत्त्व आहे. कोंबडी 20 व्या आठवड्यात अंड्यावर येते आणि येथून पुढे एक वर्षभर चांगल्या प्रमाणात अंडी देते. त्यानंतर अंडी देण्याचे प्रमाण कमी होते, म्हणून कोंबड्या मांसासाठी विकाव्या लागतात. त्या कोंबड्या विकल्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन कळप तयार ठेवला पाहिजे. यासाठी कोणत्या महिन्यात नवीन कळप तयार ठेवावा, याचा कार्यक्रम आधीच आखून ठेवावा, म्हणजे कमी वेळात आणि कमी भांडवलात जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल. समजा, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात एक दिवसाची पिले आणली तर जुलैपासून अंडीउत्पादन सुरू होईल ते पुढल्या जूनपर्यंत वर्षभर सुरू राहील.

नंतर ह्या कोंबड्या जुलै महिन्यात मांसासाठी विकून टाकाव्या लागतील आणि त्यानंतर स्वच्छतेसाठी ते घर एक महिना मोकळे ठेवल्यावर त्या घरात नवीन कळप ठेवता येईल. त्या वेळी त्या कळपाचे वय पाच महिने असले पाहिजे. म्हणजे ऑगस्टमध्ये त्या कोंबड्या पाच महिन्यांच्या होण्यासाठी त्या वर्षाच्या एप्रिल महिन्यात पिले आणून वाढवावी लागतील. व्यवसाय यशस्वी करण्यासाठी अनुभव असणे आवश्यक आहे. यासाठी सुरुवातीस थोड्या थोड्या कोंबड्या घेऊन मगच हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवावा.

कोंबडीपालन व्यवसायात नोंदवही ठेवणे आवश्यक आहे. पिले विकत आणल्यापासून त्यांची विल्हेवाट लावेपर्यंत आपल्याजवळ नोंद असावी. आपल्या फार्मवर होणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न हे दररोज नोंद करावे. ऋतुमानानुसार मागणी व दर बदलतात. आपल्याकडे उन्हाळ्यात अंड्याला मागणी कमी असते तर हिवाळ्यात अंड्यांची मागणी वाढते. दलाल या परिस्थितीचा फायदा घेऊन उन्हाळ्यात कमी दर असला तरच अंडी उचलतात. म्हणून अंडी मिळण्याचे प्रमाण उन्हाळ्यात कमी तर हिवाळ्यात भरपूर राहील असे नियोजन करणे फायदेशीर ठरेल. नोंदवहीमध्ये कुक्कुटपालनातील मोक्याच्या जागा व अडचणीची माहिती मिळाल्यामुळे अपयश कमी करून नफा निश्चित वाढविता येतो.

कुक्कुटपालन व्यवसायाचे फायदे :

  • लोकांच्या मुख्य अन्नामध्ये प्रथिने (अंडी आणि कुक्कुट मांसाच्या स्वरूपात) उपलब्धता वाढविली जाऊ शकते.
  • अल्प व किमान गुंतवणूकीस कमी खर्चात अतिरिक्त उत्पन्न म‍िळवून देणारा व्यवसाय आहे. 
  • ग्रामीण भागातील तरूण शेतकरी बांधवांना शेतीपूरक जोडधंदा क‍िंवा शेतीपूरक व्यवसायाचर संधी उपलब्ध होते.
  • ग्रामीण भागातील वाढलेली बेरोजगारी व स्थलांतरीत होण्याचे प्रमाण कमी करता येते.
  • कुक्कुटपालन हा शेतीला एक शाश्वत व्यवसाय म्हणून पुढे येत आहे.
  • कुक्कुटपालन व्यवसाय केल्यामुळे व‍िव‍िध शासकीय योजनांचा लाभ घेता येतो.
  • कोंबडीच्या व‍िष्ठेपासून उत्तम दर्जेचे शेतीला खत म‍िळते.
  • अंडी आणि मांसाचे उत्पादन पाश्चात्य आणि विकसित देशांमध्ये व‍िशेष मागणी वाढत आहे.

कुक्कुटपालन व्यवसाय हा आजच्या पर‍िस्थितीत उत्तम प्रकारे रोजगार मिळवून देणारा शेतीपूरक व्यवसाय म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे कुक्कुटपालन व्यवसायात मोठ्या मोठ्या नामांक‍ित कंपन्या सक्रियपणे कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी व व्यवसायिकांना कुक्कुट व्यवसायाचा सल्ला व मार्गदर्शन देण्यात येत आहे. यामुळे कुक्कुटपालन व्यवसायास चालना म‍िळत आहे.

कुक्कुटपालन व्यवसाय कसा करावा ? हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

Prajwal Digital

1 thought on “कुक्कुटपालन व्यवसाय कसा करावा ?”

Leave a Reply