सोयाबीन : काढणी व मळणी कशी करावी

सोयाबीन हे गळीतधान्‍यातील महत्‍त्‍वाचे नगदी पीक आहे. सोयाबीन पिकांमुळे देशातील सामाजिक, आर्थिक व औद्योगिक क्षेत्रात आमुलाग्र बदल झालेला आहे. सोयाबीन पिकाचे उत्पादन महाराष्ट्रात बहुतांशी सर्वच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. विशेषत: मराठवाडा व विदर्भातील शेतकरी सोयाबीन पिकाकडे नगदी पीक म्हणून घेत आहेत.

सोयाबीन हे पीक आपल्याकडे 90 ते 95 दिवसांत काढणीस येत असून काढणीपश्चात्त सुधारित तंत्राचा अवलंब न केल्यास सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तसेच शेतकरी बांधवांमध्ये काढणीपश्चात्त सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव असल्यामुळे बऱ्याच प्रमाणात सोयाबीन पिकाचे काढणी, मळणी, साठवणुकीमध्ये नुकसान होत आहे. परिणामी पीक उत्पादन व उत्पादकता कमी येत आहे. सोयाबीन काढणी तंत्रज्ञान हा Video पहा.

याच उद्देशाने लेखकांनी सोयाबीन : काढणी व मळणी कशी करावी हा लेख तयार करून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काढणीची वेळ, पद्धत, मळणी व मळणी करण्याच्या पद्धती तसेच सोयाबीन साठवणूक इत्यादीसाठी ही माहिती उपयुक्त व मार्गदर्शन करणारी आहे. सदर माहितीचा उपयोग करून शेतकरी बांधवांना सोयाबनी काढणी, मळणी व साठवणूक इत्यादी प्रकारचे कामे चांगल्या प्रकारे करावे आणि काढणी अभावी होणारे नुकसान टाळावे.

सोयाबीनची काढणी केव्हा करावी

सोयाबीन हे पीक पेरणीनंतर साधारणतः 95 ते 105 दिवसात काढणीस तयार होते. पीक पक्‍व झाल्‍यानंतर पिकाची काढणी लवकर करणे फार महत्‍वाचे आहे. नाही तर शेंगा तडकून उत्‍पादनात 15-20 टक्‍के घट येते. पीक पक्‍व झाल्‍यानंतर 85-90 टक्‍के पाणी देठासहीत जमिनीवर गळून पडतात. शेंगांचा रंग पिवळा ते काळसर होऊ लागतो. सोयाबीनचे उत्‍पादन व प्रत चांगली ठेवण्यासाठी पावसाचा अंदाज पाहूनच म्‍हणजे पाऊस येणार नाही याची खात्री करूनच काढणी करावी.कारण बियाण्‍याला पक्‍वतेनंतर किंचीत ओलाव्‍याचाही स्‍पर्श झाला तरी बियाण्‍याची उगवणक्षमता कमी होते. सोयाबीन पिकाची काढणी शारीरिक पक्‍वता झाल्‍यावर वेळोवर करावी. बियातील ओलावा 14-15 टक्‍के असला की, कापणीला सुरूवात करावी. वेळीच कापणी केल्यास मळणीत बियांचे नुकसान होत नाही. पिकाची काढणी धारदार कोयत्‍याने जमिनीलगत कापून करावी. झाडे उपटून येणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. सोयाबीन शक्‍यतो मोठे ढीग किंवा गंजी करून ठेवू नये, त्‍यामुळे त्‍यास बुरशी लागून धान्‍याची प्रत निकृष्‍ट होते. काढणी केलेले पीक उन्‍हात पसरून वाळवावे व मळणी करण्‍यास उशीरा होत असल्‍यास अशा वेळप्रसंगी गंजी करूनच ठेवावे.

सोयाबीन मळणी :

सोयाबीन पिकाची मळणी काठीने बडवून, बैलाच्‍या  पायाखाली, ट्रॅक्‍टरच्‍या चाकाखाली किंवा मळणी यंत्राद्वारे करावी. मोठ्या क्षेत्रासाठी या पद्धतीने जास्‍त वेळ आणि श्रम लागत असल्‍यामुळे ही पद्धत योग्‍य ठरत नाहीत. या पद्धतीत बियाण्‍यास मार बसण्‍याची व उगवणशक्‍ती कमी होण्‍याची जास्‍त शक्‍यता असते.अलीकडच्या काळात शेतकरी बांधव सोयाबीन पिकाची मळणी करण्यासाठी शक्यतो मळणी यंत्राचा उपयोग करीत आहेत. त्यामुळे कमी वेळेत व कमी श्रमात चांगल्या प्रकारे मळणी करता येते. तसेच सोयाबीनसाठी मळणी यंत्राचा उपयोग करावयाचा असल्‍यास खालील तक्त्यात दिलेल्या माहितीचा विचार करूनच सोयाबीनची मळणी करावयाची आहे.

सोयाबीन मळणी करण्‍याच्‍या पद्धती, बियांचे नुकसान व उगवणशक्‍ती माहिती तक्ता

अ.क्र.मळणी पद्धतबियांचे नुकसान (टक्‍के)उगवणशक्‍ती (टक्‍के)
1)     काढीने शेंगा बडवून4.578.0
2)     बैलाच्‍या पायाखाली8.567.0
3)     ट्रॅक्‍टरच्‍या चाकाखाली2.582.0
4)     मळणी यंत्राचा उपयोग
5)     मिनीटाला फेरे -5002.8
6)     दर मिनीटाला फेरे – 6007.1
7)     दर मिनिटाला फेरे – 75011.2

सोयाबीन मळणी पद्धती :

) हाताच्या साह्याने :सोयाबीनचे क्षेत्र कमी प्रमाणात असेल किंवा सोयाबीन बियाणे म्‍हणून उपयोगात आणावयाचे असल्‍यास ही पद्धत अधिक फायद्याची आहे. अशा क्षेत्रातील पीक कापून शेतात 4 ते 5 दिवस सुकवायला सोडून देऊन नंतर कोरड्या जागेवर किंवा ताडपत्रीवर छोट्या छोट्या गंज्‍या कडीने किंवा लाकडी दांड्याने ठोकून घ्‍याव्‍यात. या क्रियेमुळे बियाला कमी मार लागून नुकसान कमी होते.

) ट्रॅक्‍टर :ट्रॅक्‍टरच्‍या चाकाखाली मळणी केली असता बियाण्याचे नुकसान कमी होऊन उगवणशक्‍ती कमी राहते. तथापि अशी मळणी सिमेंटच्‍या टणक खळ्यावर करू नये, त्‍यासाठी शेतात ताडपत्री अंथरून त्‍यावर काढलेल्‍या पिकाला जाड थर पसरून किंवा मातीच्‍या खळावर करावी. नुकसान कमी होते.

) मळणी यंत्र :सोयाबीन मळणी यंत्राने मळणी करावयाची असल्‍यास बियाण्‍यातील ओलावा (आर्द्रता) 95 टक्‍क्‍यांपेक्षा कमी नसावी. तसेच मळणी यंत्राने फेरे मिनिटांला 400 ते 500 पर्यंत मर्यादित ठेवावेत. अधून मधून बियाण्‍यांवर लक्ष ठेवून डाळ होण्‍याचे प्रमाणे जास्‍त असल्‍यास वेळ कमी करावा.

) कम्‍बाईनर :अलीकडे काही भागात सोयाबीनची कम्‍बाईनरद्वारे कापणी व मळणी करण्‍यात येते. कापून ठेवलेल्‍या सोयाबीनची देखील कम्‍बाईनरद्वारे मळणी करता येत; परंतु यात सोयाबीन दाळ होण्‍याची शक्‍यता जास्‍त असते. सोयाबीन बियाण्‍याच्‍या कवचाला इजा होऊन त्‍याची उगवणशक्‍ती कमी होते. त्‍यामुळे बिजोत्‍पादनासाठी सोयाबीन वापरावयाचे असेल तर त्‍याची कापणी व मळणी कम्‍बाईन यंत्राद्वारे करू नये.

सोयाबीन साठवण :  सोयाबीन पिकाची मळणी झाल्‍यानंतर झालेल्‍या बियाण्यांची योग्‍य साठवण होणे आवश्‍यक असते. अन्यथा बियाण्‍याच्‍या उगवणशक्‍तीवर विपरीत परिणाम होतो. साठवण करण्‍यापूर्वी बियाणे चांगले वाळवून घ्यावे व 2 ते 3 दिवस ऊन्‍हात वाळवून पोत्‍यात भरून सावलीत कोरड्या जागेत साठवण करावी.सोयाबीन बियाण्याची साठवणूक करताना बियाण्‍यात ओलाव्याचे प्रमाण 10 टक्‍के पेक्षा जास्‍त नसावे. यासाठी बियाणे उन्‍हात व्‍यवस्थित वाळवून तागाचे पोते भरून जास्‍त थर न रचता पोत्यात साठवण करावयची असल्‍यास पोते सरळ जमिनीवर न ठेवता लाकडाच्‍या फळीवर ठेवावे. तसेच जमिनीतील ओलाव्‍याचा सरळ संपर्क येणार नाही किंवा साठवणुकीची जागा कोरडी असावी तसेच किडींचा व उंदीर, खार, घुशी यांसारख्‍या प्राण्‍याचा उपद्रव होऊ नये याबाबत दक्षता घ्‍यावी.

सोयाबीन उत्पादन :सोयाबीन पिकाचे जतीपरत्वेनुसार साधारणपणे 35 ते 40 क्विंटल किंवा 37 ते 42 क्विंटल प्रती हेक्टरी उत्पादन मिळते. परंतु सोयाबीनचे उत्पादन जमीन, हवामान, सुधारित वाण, लागवड पद्धती, कीड व रोग व्यवस्थापन, काढणीपश्चात्त तंत्रज्ञान इ. प्रमुख घटकांवर सुद्धा अवलंबून असते. या घटकांची पूर्तता केल्यास अधिक सोयाबीन उत्पादन मिळू शकते.अशाप्रकारे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना सोयाबीन : काढणी व मळणी कशी करावी याबाबत सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न लेखकांनी केला आहे. या माहितीचा उपयोग शेतकरी बांधवांनी काढणी व मळणीसाठी करावयाचा आहे. तसेच काढणी व मळणी अभावी होणारे नुकसान टाळावयाचे आहे. ज्यामुळे शेतकरी बांधवांना किफायतशीर सोयाबीन उत्पादन घेता येईल.

सोयाबीन काढणी व मळणी केल्याचे फायदे :

  • काढणीपश्चात्त होणारे नुकसान टाळता येते.
  • मुदतीत पिकाची काढणी व मळणी केल्यामुळे अतिरिक्त होणारे नुकसान टाळता येते.
  • मालाची प्रत व गुणवत्ता चांगली राखली जाते.
  • काढणी व मळणीसाठी यंत्राचा केल्यास कमी वेळेत अधिक कामे करता येतात.
  • काढणी व मळणीसाठी मनुष्यबळावर फारशे अवलंबून राहवयाची गरज नाही.

शब्दांकन : किशोर ससाणे, लातूर तथा वेबसाईट ॲडमीन : https://www.agrimoderntech.in/

सोयाबीन : काढणी व मळणी कशी करावी हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribes, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

Read More Article

सोयाबीन प्रक्रिया उद्योग काळाची गरज

सोयाबीन : मूल्यवर्धित पदार्थ

सोयाबीन पिकांवरील किडींचे नियंत्रण

सोयाबीन लागवडीचे सुधारित वाण

वापरा सोयाबीनचे घरगुती ‍बियाणे

Prajwal Digital

Leave a Reply