दुधातील FAT व SNF वाढविण्याचे तंत्र

पशुपालन व दुग्ध व्यवसाय हा महत्त्वाचा शेतीपूरक जोडधंदा आहे. दूध उत्पादनात भारत देश आघाडीवर असून रोजच्या आहारामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थांना अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे दुधात योग्य प्रमाणात FAT व SNF चे प्रमाण असणे आवश्यक असते.

महाराष्ट्रात दूध व्यवसाय करणारे लोक सर्वात जास्त ग्रामीण भागात आहेत, त्यामुळे त्यांना दुधातील FAT व SNF वाढीच्याअत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव असतो. यामुळेच दुधातील FAT व SNF चे प्रमाण याव‍िषयी फारसे पशुपालकांना ज्ञापन नसते त्यामुळे त्यांना क‍िफायतशीर दूध व्यवसाय करणे कठीण जाते. यामुळे गाय व म्हशीच्या दुधातील FAT व SNF चे प्रमाण समजले तर त्यांना चांगली बाजारात क‍िंमत म‍िळेल व ग्राहकांना उत्तम दर्जेचे दूध उपभोगता येईल.

FAT म्हणजे काय ?

गाय-म्हशीचे दूध हे दैनंद‍िन मानवाच्या आहारामध्ये सर्वात प्रमाणात सेवन केले जाते यामध्ये दुधामध्ये असणारे दुग्धांशाचे प्रमाण म्हणजेच त्यातील दुधातील फॅटची पातळी होय. गायपेक्षा म्हशीच्या दुधात स्ग्निधांशाचे प्रमाण अध‍िक असते त्यामुळे बाजारात गाय पेक्षा म्हशीला दुधाला अध‍िक मागणी आहे. 

SNF म्हणजे काय ?

SNF चा म्हणजे Solid Not Fat असा आहे. दुधाची गुणवत्ता ठरवण्याचे हे एकक आहे. जे बहुतांशी दूध डेअरी मध्ये दुधाचे भाव ठरवण्यासाठी वापरले जाते. दुधात पाणी सोडून किती घटक मूल्ये आहेत हे मोजण्यासाठी SNF मोजणे फायद्याचे ठरते. दुधात केसीन नावाचे प्रोटीन असते तसेच काही व्हिटॅमिन्स, मिनरल्स असतात. यांचे दुधातील प्रमाण SNF द्वारे ठरवले जाते. म्हणजेच दुधाचा घट्टपणा याने मोजता येतो. जेवढा SNF जास्त तेवढी दुधाची गुणवत्ता जास्त असते. SNF मोजण्यासाठी लॅकटोमीटर हे उपकरण वापरतात. 

फॅट (FAT) कसे वाढवावे ?

दुधातील फॅट हे प्रामुख्याने खाद्यातील फॅट, शरीरात साठलेली चरबी व कासेत तयार होणारे फॅट यापासून बनलेले असते. जनावरांना चाऱ्यामध्ये जर उर्जा व तंतुमय पदार्थ जास्त असलेले घटक खायला घातले तर जनावराच्या शरीरात असणाऱ्या उपयोगी सूक्ष्मजीवाची चांगली वाढ होते व ते पुरेशा प्रमाणात फॅट तयार करतात व हे फॅट रक्तामार्फत कासेत येऊन दुधात उतरते.

आता उर्जा आणि तंतुमय पदार्थ म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल, सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एकदल वनस्पती ह्या याचा स्रोत असतात. एकदल वनस्पती ओळण्याची सोपी पद्धत म्हणजे ज्या चारा वनस्पतीचे पान लांब आहे ती एकदल उदा. ज्वारी (कडबा), मका, बाजरी. ह्या वनस्पती पासून बनलेला हिरवा चारा/किंवा याच्या धान्याचा भरडा हे दोन्ही खायला घातले तरी उत्तम FAT व SNF ची गुणवत्ता वाढू शकेल.

SNF (Solid Not Fat) कसे वाढवावे ?

  • दुधातील फॅट सोडून इतर स्थायू घटक (प्रथिने-केसिन, जीवनसत्वे, खनिजे, लॅक्टोज) हे असतात. केसिन हा दुधातील SNF वर परिणाम करणारा मुख्य घटक आहे, याचे प्रमाण जर कमी झाले तर दुधाला SNF लागत नाही. दुधात केसिन मुक्त स्वरुपात न आढळता फोस्फेट व कॅल्शियम सोबत आढळून येतात.
  • दुधातील केसिन म्हणजेच SNF वाढवायचे असेल तर प्रथिने, कॅल्शियम व फॉस्फरस हे तिन्ही घटक जनावरास देणे आवश्यक आहे. यापैकी प्रथिने हे द्विदल वनस्पती मध्ये आढळून येतात द्विदल वनस्पती म्हणजे ज्या चारा वनस्पतीची पाने छोटी असतात अशा वनस्पती उदा. मेथी, नेनिअर घास, चवळी, बरसीम इ.
  • क्षार मिश्रणात कॅल्शियम व फॉस्फरस हे घटक असतात. दुधातील घटक कशापासून तयार होतात ? जनावरास काय द्याल? फॅट तंतुमय/ उर्जा असणारे पदार्थ एकदल (लांब पानाच्या वनस्पती), धान्याचा भरडा SNF प्रथिने, कॅल्शियम व फॉस्फरस द्विदल (लहान पानाच्या वनस्पती) आणि क्षारमिश्रण, खुराक, पाणी मुबलक पाण्याची सोय.
  • मूरघास चारा आधुनिक पद्धतीने तयार करून गाय व म्हशींना ‍दिल्यास सुद्धा दुधातील FAT व SNF चे प्रमाण वाढव‍िता येते.
  • हायड्रोपोनिक्स चारा आधुनिक पद्धतीने तयार करून गाय व म्हशींना ‍दिल्यास सुद्धा दुधातील FAT व SNF चे प्रमाण वाढव‍िता येते. श‍िवाय दुधाची प्रत व दर्जा उत्तम राखला जाईल.

FAT व SNF नियंत्रीत केल्यामुळे होणारे फायदे

  • दुधाची गुणवत्ता व दर्जा उत्तम राहील.
  • दुधास चांगला बाजारभाव मिळेल.
  • दुधाची प्रत उत्तम ट‍िकवली जाईल.
  • उत्तम दर्जेचे दूध ग्राहकांना मिळेल.
  • दुग्धव्यवसायाची उन्नती साधता येईल.

प्रस्तुत लेखातील माह‍ितीच्या आधारे आपण आपल्या जनावराचे चाऱ्याचे व्यवस्थापन चांगल्या रीतीने करू शकता व घरच्या घरी चाऱ्यामध्ये थोडासा बदल करून दुधातील FAT आणि SNF चे प्रमाण नियंत्रण करू शकता व आपल्या दुधाला चांगला दर मिळवू शकेल.

दुधातील FAT व SNF वाढविण्याचे तंत्र हा लेख आपणास आवडला असल्यास Subscribe, लाईक, कंमेट्स आणि शेअर करून सहकार्य करावे. ज्यामुळे आणखीन इतर उपयुक्त लेख तयार करण्यास लेखकाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल.

Prajwal Digital

1 thought on “दुधातील FAT व SNF वाढविण्याचे तंत्र”

Leave a Reply