गहू उत्पादकता वाढीचे तंत्र

देशाच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता कमीत कमी क्षेत्रावर अधिक उत्पन्न कसे वाढवावे यासाठी विद्यापीठ स्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत. देशाची अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी ज्वारी, बाजरी, मका व गहू  या अन्नधान्य पिकांवर अवलंबून राहावे लागते. ही गरज पूर्ण करण्यासाठी इतर अन्नधान्य पिकांच्या तुलनेत गहू पिकाचे उत्पादन वाढविणे अत्यंत गरजेचे झालेले आहे.

महाराष्ट्रात गव्हाच्या अधिक उत्पादनासाठी वेळेवर पेरणी, योग्य वाणांचा वापर, योग्य पेरणीची पद्धत, खतांचा समतोल वापर, योग्य पाणी व्यवस्थापन व पीक संरक्षण या बाबींचा अवलंब करून गव्हाचे प्रती हेक्टरी उत्पादन व उत्पादकता वाढविणे आपल्या समोर मोठे आव्हान निर्माण झालेले आहे. 

वाचा : गहू कमी उत्पादकता, कारणे आणि उपाय

प्रस्तुत गहू उत्पादकता वाढीचे तंत्र हा विषय महत्त्वपूर्ण असल्याकारणाने तसेच महाराष्ट्र रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर गव्हाची लागवड केली जतात असल्याने या पिकाची उत्पादन व उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे.ज्यामुळे देशाच्या अन्नधान्य उत्पन्नात गहू पिकाचा वाटा अधिक महत्त्वाचे ठरेल आणि शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी गव्हाची उत्पादकता वाढविण्यासाठी मदत होईल.

गहू लागवडीचे क्षेत्र आणि उत्पादन

गहू जगातील प्रमुख अन्‍नधान्‍य पीक आहे. महाराष्ट्रात तांदळाच्या तुलनेत गव्हाचे उत्पादन कमी आहे. सन 2019-20मध्ये राज्यात 68670मे. टन गव्हाचे उत्पादन झाले तर सन 2021-22 मध्ये राज्यात 74643मे. टन गव्हाचे उत्पादन झाले होते. देशात गव्हाखाली असलेल्या एकूण क्षेत्राच्या अवघे 3.44 टक्के क्षेत्र महाराष्ट्रात असून राष्ट्रीय पातळीवरील एकूण गहू उत्पादनात राज्याचा वाटा अवघा 1.47 टक्केच्या आसपास आहे.

महाराष्ट्रात सन 2021-22 मध्ये गव्हाचे क्षेत्र 1.9 लाख हेक्टर असून उत्पादन 16.6 लाख टन इतके आहे. आपल्या भारत देशात गव्ह्याखाली 11.3 दशलक्ष हेक्टर क्षेत्र असून उत्पादन 15.91 दशलक्ष टन आहे. भारतातील गव्हाची सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टरी 30.61 क्विंटल इतकी असून महाराष्ट्रात 15.21 क्विंटल इतकी आहे.

वाचा : गहू पिकाचे संकरित वाण * गहू पिकाचे सुधारित वाण

गहू उत्पादकता वाढीचे तंत्र

महाराष्ट्रातील गव्हाची उत्पादनक्षमता ही देशाच्या उत्पादन क्षमतेपेक्षा खूप कमी आहे. महाराष्ट्रातील उत्पादकता कमी असण्याची बरीच कारणे आहेत. पूर्वी महाराष्ट्रात गव्हाचे बागायती क्षेत्र खूप कमी होते. परंतु आता बागायती क्षेत्र बरेच वाढलेले आहे. गव्हाच्या पिकाखालील बागायती क्षेत्रात जसजर्सी वाढ होत गेली तसतसे एकूण उत्पादन आणि सरासरी उत्पादकता वाढलेली आढळून आली आहे. यामध्ये अधिक उत्पादन देणाऱ्या गव्हाच्या वाणांचा प्रमुख वाटा आहे.

  • गहू पिकाची भारी व मध्यम प्रकारच्या जमिनीत लागवड करावी.
  • कृषि विद्यापीठे किंवा कृषि संशोधन केंद्राने शिफारशीत केलेल्या वाणाची निवड करावी.
  • पेरणीपूर्व बियाण्यास बुरशीजन्य व जीवाणू औषधांची बीजप्रक्रिया करावी.
  • 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत गव्हाची पेरणी करावी किंवा त्यापेक्षा विलंब झाल्यास उत्पन्नात घट येते.
  • पेरणीसाठी सुधारित बहुपीक टोकण किंवा ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राचा वापर करावा.
  • पेरणीचे बियाणे जमिनीत योग्य खोलीवर पडेल याची काळजी घ्यावी.
  • अधिक उत्पादनासाठी जैविक व रासायनिक खतांचा संतुलित वापर वापर.
  • गहू पिकासाठी शिफारशीत पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
  • हवामानातील वाढत्या प्रादुर्भावामुळे येणाऱ्या कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन करावे.
  • गव्हाचे काढणीपश्चात्त सुधारित तंत्राचा अवलंब करावा. उदा. कंबाईन हार्वेस्टर
  • काढणीनंतर धान्य दोन ते तीन दिवस चांगले वाळवून पोत्यात भरून ठेवावे.

गहू उत्पादकता वाढीचे तंत्र हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावा. नवीन पोस्टची चालू अप्डेट ई-मेल किंवा Push Notification द्वारे मिळविण्यासाठी Modern Agrotech ला सब्सक्राईब करून सहकार्य करावे. धन्‍यवाद !

Prajwal Digital

Leave a Reply