50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी जाहीर

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनुदान मिळणार आहे. 2019-20-21 या तीन वर्षातील किमान 2 वर्षे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे.

तरी शेतकरी बाधंवानी खालील माहितीच्या आधारे आपले नाव महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या यादीत समाविष्ट आहे का नाही याची खात्री करावी. ज्या शेतकऱ्यांचे नाव दुसऱ्या यादीत नसणार आहे त्यांच्यासाठी कर्जमाफी योजनेच्या लाभार्थ्यांची जिल्हानिहाय तिसरी यादी शासन स्तरावरून प्रसिद्ध करण्यात येईल.

महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत नियमित कर्जमाफी योजना रू. 50,000/- अनुदान योजना दुसरी यादी दि. 05/11/2022 रोजी जाहीर झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे रू. 50,000/- अनुदान योजनेच्या पहिल्या यादीमध्ये नाव आलेली नव्हते, अशा शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची रू. 50,000/- अनुदान योजना दुसरी यादी कशी डाउनलोड करायची? याविषयी विस्तृत माहिती आपण आजच्या या पोस्टमध्ये आपण घेऊया.

50 हजार प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी जाहीर

 • रू. 50,000/-  हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी ऑनलाईन प्रकाशित करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये अनेकांना यावर यादी दिसणार नाही. ज्याचं कारण म्हणजे कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहे. काही दिवसात महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्याची नावे प्रसिद्ध करण्यात येतील.
 • त्याचप्रमाणे हळूहळू इतर जिल्ह्यांच्या याद्या देखील या CSC पोर्टलवर प्रकाशित होत आहे. मात्र काही जिल्ह्यांच्या याद्या प्रकाशित झाल्या नाहीत त्या शेतकऱ्यांना (Department of Agriculture) अद्याप दिसणार नाहीत. यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागेल.

कशी पाहायची ऑनलाईन लाभार्थी यादी?

 • CSC च्या पोर्टलवर त्याच शेतकऱ्यांना याद्या पाहता येतील ज्या शेतकऱ्यांचे CSC पोर्टलवर अधिकृतता (Authorization) असेल.
 • आपणास CSC पोर्टलवर कर्ज सर्च करावं लागेल.
 • आपणास महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची लिंक दिली जाईल. यावर क्लिक करावे लागेल.
 • यानंतर तुम्ही त्या पोर्टलवर जाल. त्यावर आपणास लिस्ट हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करावे.
 • यानंतर आपणास तेथे जिल्ह्याचे नाव टाकावे लागेल.
 • तालुका निवडल्यानंतर तुम्हाला गावांची नावे दिसतील.
 • आपण ज्या गावातील असाल त्या गावाची लाभार्थी यादी पाहू शकता.
 • A पासून Z पर्यंत तालुक्यांची नावे दिली जातील.
 • आपणास केवायसी साठी सूचना करण्यात येतील.
 • जर यावर तुमची माहिती चुकीची असल्यास बँकेत आक्षेप नोंदवावा.

शेतकऱ्यांना 50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानासाठी KYC प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. आता या दुसऱ्या यादीत तुमचं नाव आल्यानंतर तात्काळ खालील किंवा संबंधित आपले सरकार केंद्र  किंवा CSC सेंटरशी संपर्क साधून KYC प्रक्रिया करून घ्यावी. तरचं शेतकऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान मिळू शकते.

काही कारणास्तव काही शेतकऱ्यांची नावे पात्र यादीत समाविष्ट आहेत परंतु प्रथत यादी व दुसऱ्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट नसल्यास त्यांनी संबंधित बँक किंवा आपले सरकार केंद्र  किंवा CSC सेंटरशी संपर्क साधून खातर जमा करावी.  

टीप : सदर कर्जमाफी योजनेची माहिती ही शेतकऱ्यांनी व्यवस्थित समजून घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करावी. यामध्ये कसल्याही प्रकारची फसवणूक अथवा नुकसान झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाहीत याची नोंद घ्यावी. कोणत्याही गैरप्रकारास आम्ही समर्थन देत नाही. फक्त शेतकऱ्यांना याबद्दल माहिती मिळावी या उद्देशाने सदर लेख तयार केलेला आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

श्रध्दा ई सर्व्हिसेस, श्रध्दा डिजिटल फोटो स्टुडियो व आपले सरकार सेवा केंद्र

कोरे गार्डन कार्नर, कन्हेरी रोड, लातूर, महाराष्ट्र *

श्री. चक्रधर खाडप, Mob. No. 9923762134.

Prajwal Digital

Leave a Reply