संत्री निर्यात प्रमाणके

लिंबूवर्गीय फळझाडांमध्ये संत्री हे एक महत्त्वाचे फळझाड आहे. संत्रा फळाची लोकप्रियता लिंबूवर्गीय फळात सर्वाधिक मानली जाते. संत्रयाचा रस, स्कॅश, मार्मालेड, सिरप तयार करण्यासाठी वापरला जातो.

संत्रयामध्ये विटॅमीन ए, सी, बी- वन, फॉलिक ॲसिड, फायबर, कॅल्शियम पोटॅशियम आणि फायट्रोन्यूट्रियन्स या आहारमूल्यांचा समावेश असल्याने व्यायामामुळे आणि अधिक श्रमामुळे आलेला थकवा, आळस, मरगळ घालविण्याचे सामार्थ्य या फळात आहे. तसेच संत्रयाचा उपयोग रक्त शोधक पित्तशामक, वातशामक, अत्तरे, साबण, सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी सुगंधी द्रव्ये तयार करण्यासाठी होतो.

संत्रीचे मूळ उगमस्थान दक्षिण चीन आहे. तसेच त्याच्या स्वादामुळे या फळाची लागवड चीन, जपान, भारत व पूर्वेकडील बेटे हे देश करतात. भारतात प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, ओरिसा या राज्यांत लागवड होते. भारतातून संत्रा निर्यात ही प्रामुख्याने बांगलादेश, नेपाळ, यु.एस.ए., कॅनडा व इतर देशांना होते.

संत्रा निर्यातीची मानके :

निर्यातीसाठी संत्रा फळपिकाची मानके खालीलप्रमाणे

संत्रा : मध्यपूर्वेकडील देश

 • नागपूर संत्रा वाणासाठी फळांचा रंग फिक्क्ट पिवळा, फळाचे वजन १५०-१७५ ग्रॅम, व आकार ६५-७०मि. मी.‍ किंवा ४०-४५ मि. मी.
 • पॅकींग आयातदाराच्या मागणीनुसार ६५ मि. मी. आकाराच्या फळांसाठी ७ किलोचे आणि ४० मि. मी. आकाराच्या फळांकरिता २.५ किलो, व ५-७ अंश से. ग्रे. तापमानास साठवणूक व वाहतूक जहाजामार्फत.

संत्रा : नागपूर संत्रा

 • फळाचा व्यास कमीत कमी ६.५ सें. मी. असावा व त्यामध्ये ४०-५० टक्के रस असावा.
 • फळामध्ये शर्करा व आम्लाचे गुणोत्तर १३ ते १५ इतके असावे.
 • फळाचा रंग पिवळसर नारंगी असून स्पर्श मउ असावा.
 • फळांवर कोणत्याही किडीचे, रोगाचे डाग / चट्टे नसावेत.

आव्हान संत्रा निर्यात वाढीचे :

संत्रयाच्या निर्यातीसाठी अपेडाने (APEDA) संत्रा कृषि निर्यात क्षेत्र जाहीर केले आहे. अमरावती, नागपूर, होरींगाबाद, बेतूल या जिल्हयांचा संत्रा निर्यात क्षेत्रात अंतर्भाव आहे. तसेच कृषि निर्यात क्षेत्र संत्रा अंतर्गत निर्यात सुविधा केंद्राची, आष्टी जि- वर्धा येथे उभारणी  (कार्यवाही) चालू आहे.

कृषि निर्यात क्षेत्रराज्यअंतर्गत जिल्हे
संत्रामहाराष्ट्रअमरावती, नागपूर

फळे पिकाचे पॅकींगनुसार खालील बाबी नमूद कराव्या लागतात.

 • फळे व भाजीपाला पिकाचे नाव
 • जात
 • मालाचा दर्जा ( विशेष दर्जा / वर्ग – १ दर्जा / वर्ग -२ दर्जा)
 • आकार
 • लॉटनंबर / बॅच नंबर / कोड नंबर
 • उगमस्थान
 • वजन / नगांची संख्या
 • पॅकींग / निर्यातदाराचे नाव व पूर्ण पत्ता
 • वापराबाबत वैध मदत (जेथे लागू असेल)
 • साठवणुकीच्या सुविधा
 • पॅकींगची तारीख
 • कृषि विपणन सल्लागार, भारत सरकार यांनी वेळोवेळी ठरवू दिलेल्या प्रमाणकानुसार पूर्तता करणे.

कृषिमाल निर्यातीकरिता कागदपत्रे :

 • विहित प्रपत्र -१ मध्ये दोन प्रतींत अर्ज
 • निर्यातदार व आयातदार यांच्यात करण्यात आलेल्या कराराची प्रत
 • प्रोफार्मा इनव्हाइसची प्रत
 • पॅकींग लिस्ट
 • आयात निर्यात कोडनंबरची प्रत
 • कीडनाशक उर्वरित अंश तपासणी अहवाल (आवश्यकतेनुसार)
 • प्रतवारीबाबत ॲगमार्क प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसार)
 • सोर्स ऑफ ओरिजिन (उगम प्रमाणपत्र)
 • विहित केलेली फी भरल्याचे चलन.

वरील सर्व कागदपत्रांची पूर्तता करून सर्व माहितीसाठी संबंति फायटोसॅनिटरी ॲथॉरिटीकडे अर्ज केल्यानंतर कागदपत्रांची छाननी करून, प्रत्यक्ष मालाची पाहणी / तपासणी करून ‍कृषिमालाच्या निर्यातीकरिता संबंधित देशाच्या नावाने फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र दिले जाते. सदरच्या प्रमाणपत्राशिवाय कृषिमालाची निर्यात करता येत नाही.

निर्यातीसंबधी संपूर्ण माहितीसाठी

 1. प्रक्रिया व व्यापारक्षम शेती विभाग, साखर संकुल, पुणे
 2. निर्यात विभाग, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, गुलटेकडी, मार्केट यार्ड, पुणे
 3. कृषि खात्याचे कर्मचारी
 4. महाराष्ट्रातील सर्व (4) कृषि विद्यापीठे.

निर्यातवृद्धीसाठी उपाययोजना :

 • उत्तम प्रतीचा कृषिमाल ‍निर्यातीसाठी कृषिमालाची शास्त्रोक्त आंतरराष्ट्रीय प्रमाणकांनुसार काढणी करणे गरजेचे आहे.
 • कृषिमाल निर्यातीसाठी पॅकहाउस, प्रीकूलिंग केंद्र व शीतगृहे बांधण्यासाठी राष्ट्रीय बागवानी मंडळ, अपेडाकडून भरीव आर्थिक सहायय अनुदानाच्या रूपाने देणे गरजेचे आहे.
 • कृषिमालाची आकारमान, रंग, वजन, जाती, आकर्षकपणा इ. बाबींवरून प्रतवारी करावी.
 • आपल्याकडे अजून कृषिमालाच्या पॅकिंगला विशेष महत्त्व दिले जात नाही. पॅकिंगच्या अभावी वाहतुकीच्या दरम्यान व विक्रीच्या वेळी त्याची फार मोठी नासाडी होते. तसेच बाजारातील पॅकिंग साहित्याचा दर्जा, ‍किंमत व वाहतूक याकडेसुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे.
 • कृषिमालाच्या साठवणुकीसाठी शीतगृहांचा अभाव ही एक महत्त्वाची समस्या आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण माल तयार होईपर्यंत न थांबता काढणीलायक माल ताबडतोब व नियमितपणे काढला ‍ पाहिजे म्हणजे त्याची प्रत चांगली राहते.
 • देशाच्या समुद्र किनारपट्टीवर मालाच्या वाहतुकीसाठी यांत्रिक बोटींची कमतरता, पुर्व ‍शितकरण केलेल्या भाजीपाल्याची वाहतूक करताना इन्शुलेटेड वाहनांची कमतरता ‍ किंवा क्षमता कमी  असणे इ. समस्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही व यामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे.
 • परदेशात पाठविण्याच्या भाज्यांचा दर्जा उत्तम असणे आवश्यक आहे. माल निवडक आणि प्रतवारीप्रमाणे वेगळा करून आयात करणाऱ्या  देशातील विक्रेत्याला हव्या त्या आकाराच्या पॅकिंगमध्ये व्यवस्थि त भरून पाठवावा लागतो. मालाचा उत्कृष्ठ दर्जा आणि मागणीप्रमाणे सतत खात्रीशीर पुरवठा चालू ठेवणे या निर्यातीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या बाबी आहेत.

संत्रा निर्यात प्रमाणकाचे फायदे

 • प्रक्रिया उद्योगाला  चालना  मिळून ग्रामीण, अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होईल.
 • परदेशातील बाजारपेठांतील कृषिमालाची  मागणी, बाजारभाव, आयात ‍निर्यातीबाबत त्या देशाचे धोरण इ. बाबत बागायतदारास वेळोवेळी ‍माहिती मिळेल.
 • जागतिक स्पर्धेत टिकून संत्रयाची निर्यात वाढवायची असेल तर उत्तम प्रतीची, दर्जेदार व चांगल्या गुणवत्तेची फळे निर्माण करावी लागतील आणि तीही कमी  खर्चात उत्पादित केली पाहिजेत. तसेच, उत्पादनवाढीसाठी उत्पादकताही वाढवावी लागेल.
 • निर्यात वाढीसाठी  आणखी  एक गोष्ट करता येईल ती म्हणजे नुसत्या संत्रयाच्या ताज्या फळांच्या निर्यातीवर समाधान न मानता प्रकियायुक्त उत्पादनांचीही निर्यात वाढविणे या दृष्टीने ‍ अधिक व्यापक प्रमाणात प्रयत्न होणे आवश्यक आहे.

डॉ. योगेश सुमठाणे(Scientist Forest Products and Utilization BUAT, Banda)

Prajwal Digital

1 thought on “<strong>संत्री निर्यात प्रमाणके</strong>”

Leave a Reply