कर्जमुक्ती प्रोत्साहन अनुदानासाठी 700 कोटी रूपये वितरणास मान्यता

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन अनुदान देण्यासाठी राज्य सरकारने 700 कोटी रूपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. या योजनेतील सात लाख एकोणीस हजार (7,19,000) शेतकऱ्यांना अद्याप प्रोत्साहन अनुदानापोटी 50,000 रूपयांची रक्कम प्राप्त झालेली नाही. राज्य सरकारने 700 कोटी रूपये वितरित करण्यास मान्यता दिली असली, तरी तीन ते साडेतीन लाख (3,50,000) शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे यांनी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रू. 50,000/- इतका प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा करण्यात यापूर्वी आली आहे. यानुसार पात्र शेतकऱ्यांना प्रथम यादी व दुसऱ्या यादी असे जाहीर काही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेच्या प्रोत्साहन भत्ता प्राप्त झालेला आहे. परंतु काही शेतकऱ्यांना अद्याप कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेला नाही. ज्यांचे नाव कर्जमुक्ती पात्र यादीत आहे त्यांनी खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करावी.

ज्यांचे नाव पात्र यादीत आहे त्यांनी काय करावे ?

  • पात्र शेतकऱ्यांचे नाव यादीत येताच संबंधित आधार सेंटरवर प्रमाणीकरणाची प्रक्रिया करून घ्यावी.
  • सध्या एक हजार कोटी रूपयांचे वितरण करण्यात येणार आहे.
  • काही दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर लाभाचे पैसे जमा होतील.
  • उर्वरित लाभार्थ्यांचेही पैसे मिळतील, यात कसलीच साशंकता नाही.
  • चालू आर्थिक वर्षात सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची रक्कम मिळेल.

ज्यांचे नाव पात्र यादीत नाव त्यांनी काय करावे ?

  • अपात्र शेतकऱ्यांचे नाव यादीत नसल्यास जिल्हा बँकेशी संपर्क साधवा.
  • नाव असल्याची खात्री असल्यास आपण संबंधित आधार सेंटरशी भेट द्यावी.
  • ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे परंतु त्यांनी निर्धारित वेळेत चालू बाकी केले नाही त्यांना सदर योजनेचा लाभ मिळणार नाही. असे शासन निर्णयात नमूद आहे.
  • जे शेतकरी कर्ज मुक्ती योजनेत अपात्र आहेत त्यांनी कर्ज मुक्ती योजने निकष पाहावे.
  • अधिक माहितीसाठी संबंधित सोसायटी अथवा बँकेशी संपर्क साधावा.

– अनुप कुमार, अपर मुख्य सचिव, सहकार विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई

Prajwal Digital

Leave a Reply