शेती ही भारतीय लोकांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असल्यामुळे शेती हा भारताचा आत्मा आहे, असे महात्मा गांधींनी सांगितले होते. सध्या शेती क्षेत्रावरील वाढता भार, रासायनिक खतांचा अतिरेकी वापर आणि कमी होत जाणारी शेतीची उत्पादकता यामुळे शेतजमिनीचा कस कमी होऊ लागला आहे. त्यासाठी एकमेव उपाय म्हणजे “सेंद्रिय शेती” पद्धतीचा अवलंब करणे होय.
वाचा- सेंद्रिय शेती काळाची गरज
भारत हा कृषिप्रधान अर्थव्यवस्था असलेला देश आहे. आज उत्पादन वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा अवलंब केला जात आहे यामुळे पिकांवर व मानवी आरोग्यावर याचा विपरित परिणाम होत आहे. आज गरज आहे सेंद्रिय उत्पादनाची, मात्र त्यापेक्षा शेतातील पिकांची सेंद्रिय पद्धतीने कशी लागवड करता येईल याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. कारण आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान युगात सेंद्रिय शेतीचा अवलंब कसा होईल त्यासाठी एकमेव पारंपरिक पद्धत म्हणजे सेंद्रिय शेती होय.
सेंद्रिय शेतीतून उत्पादने तयार होण्यास विशेष घटक म्हणजेच शेतकऱ्यांमध्ये शेतीविषयक ज्ञानाचा अभाव, वाढता असंघटितपणा, वाढते तुकडीकरण, पावसाचे दिवसेंदिवस कमी होणारे प्रमाण आदी घटकांमुळे शेती व्यवसाय दिवसेंदिवस तोट्यात जात आहे. अशा परिस्थिती कमीत कमी उत्पादन खर्चात अधिकाधिक उत्पादन घेऊन शेतकऱ्यांचे आर्थिक स्वावलंबन होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ‘सेंद्रिय शेती’ पद्धतीचा अवलंब करणे क्रमप्राप्त आहे.
वाचा- सेंद्रिय शेती : प्रमाणीकरण व मानके


सेंद्रिय शेती का करायची ? Why do organic farming?
- जमिनिचा नैसर्गिकरित्या पोत सुधारतो, उत्पन्न वाढते, खर्च कमी होतो. विषमुक्त अन्न मिळते,ज्यामूळे धोके टळतात,आजारपण कमी येते. मालाला भाव चांगला भेटतो.
- पाण्याची ५० % बचत होते .
- सर्वच प्रकारच्या जीवजंतुंची जमिनीत झपाटयाने वाढ होते .
- जमिनीची सुपीकता वाढते .
- जमिनीचा पोत सुधरतो़
- हवेतील ओलावा ओढून घेते.
- नत्र उपलब्ध होते.
- प्रथिनांचे प्रमाणानुसार कुजण्याचा ‘वेग वाढतो.
- सजिवता वाढते .
- पक्व वनस्पती आच्छादनाबरोबर तरूण वनस्पती आच्छादनाचे लवकर विघटन होते.
- जमिनीत संजिवकांची निर्मिती होते .
- जमिनीत नविन घडण होते .
- पिकांच्या वाढीला आवश्यक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.
- स्थिर कर्ब जमिनीत स्थिरावतो.
- आंतरकाष्टांगजन्य विघटन.
- मर प्रतिबंधकता पिकात प्राप्त होते.
- सर्वच रासायनिक क्रिया -प्रक्रियांचे नियंत्रण होते .
- जमिनीत वेगाने ह्युमसची निर्मिती होते.
- कर्ब- नत्र गुणोत्तर कमीत कमी होते.
- एकदल-द्विदल आंतरपिकांचे आच्छादन मायेचा पदर असतो .
- जमिनीतील बंदिस्त अन्नद्रव्ये उपलब्ध होतात .
- मातीची धूप थांबून पाणी जिरते.
- आच्छादनाने देशी गांडूळे चमत्कार करतात.
- जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.
- आंतरपिकांची मुळे कुजवून जमिनीस पहेलवान बनवण्याचे कार्य करते.
- जमिनीत मुबलक सुर्यशक्ति साठविली जाते.
- पिकाचा अन्न तयार करण्याचा वेग वाढतो.
- पिकांत साखरेचे प्रमाण, उत्पादन वाढवते.
- पिक -प्रती- पिक उत्पादन वाढतच राहते.
- बियाणांची उगवण व वाढीसाठी आवश्यक उष्णतामान मिळवून देते .
- उन्हाळ्यात व दुष्काळात फळझाडे व पिकांना जिवंत ठेवून जगवते.
- जिवाणू संख्या वाढतच राहते प्रकर्षाने जाणवणाऱ्या रोगांना आळा बसतो.
- जलधारणाशक्ती वाढते.
- जमिनीचा सामू नियंत्रित होतो.
- खारे पाणी सुसह्य होते.
- फळझाडांना भरपूर आधारमुळे फुटतात.
- जमिनीतील व हवेतील उष्णता ह्यांचे मधील परस्पर अदलाबदली रोखली जाते.
- जमिनीला अतिनील किरणांपासून वाचविते.
- जमिनीत शक्ती संतुलन बनते.
- जमिनीत जैवगतीशास्त्राला चालना मिळते.
- वैश्विक किरणांना पकडून फळे व पिकांची प्रत सुधारते.
- पिकांची व फळांची चव तर वाढतेच शिवाय टिकाऊपणा पण वाढतो .
- हवेतील आर्द्रता वेळप्रसंगी मुळयांना व जिवाणूंना पुरवली जाते .
- जमिन क्षारपड होण्यापासुन वाचते.
- जमिनीवरिल वातावरण खेळते राहते.
- जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक नियंत्रित होतो.
- जमिनीचे शुद्धिकरण होऊन पिकांत प्रतिकारशक्ति निर्माण होते .
- जमिनीत गुरुत्वाकर्षण व केशाकर्षण शक्तींचे संतुलन साधले जाते .
- सर्वात महत्वाचे म्हणजे जमिन पूर्वरत स्थितीत राहते.
प्रस्तुत लेखातील उपयुक्त माहितीचा आधार घेऊन शेतकरी जागा होईल. त्यांच्या शेती पद्धतीत बदल करण्यास मदत होईल. रसायनविरहित व दोषमुक्त उत्पादने घेता येतील. कमी खर्चात अधिक उत्पादन सेंद्रिय शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून घेता येईल. सेंद्रिय उत्पादनास हमीभाव तर मिळतो परंतु इतर उत्पादनाच्या बाजाराभावापेक्षा अधिकचा दर मिळतो. यामुळे शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात स्थिरता आणता येईल व त्यांचे उत्पन्न दुप्पट करणे सेंद्रिय शेती पद्धती आधारे शक्य होईल. म्हणूनच देशातील विशेषत: महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेती करण्याकडे वाटचाल करणे क्रमप्राप्त आहे.
सेंद्रिय शेती का करायची? Why Organic Farming? हा लेख आपणास आवडला असल्यास जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावा. नवीन पोस्टची चालू अप्डेट ई-मेल किंवा Push Notification द्वारे मिळविण्यासाठी Modern Agrotech ला सब्सक्राईब करावे.
प्रा. गोविंद अंकुश, निवृत्त प्राध्यापक, कृषि महाविद्यालय, लातूर